उमजत नाही!

Submitted by रेकु on 3 February, 2015 - 01:43

काळजातल्या प्रचंड लाटा, तुझ्या मनाच्या असंख्य वाटा
अडवू म्हणता अडत नाहीत, चालू म्हणता संपत नाहीत!
स्पर्शामधली अतर्क्य कळकळ, ह्रदयामधली अमूर्त तळमळ,
जाणिवांना झेपत नाही, स्पंदनांना उमजत नाही!
श्वासांश्वासांमधले अंतर, संवादाचा सूरही कातर,
मिटवू म्हणता मिटत नाही, समेस टाळी वाजत नाही!
शब्द गोजिरे,सुंदर,हळवे, भाव मनीचे गुढ अन गहिरे,
अर्थ मनाला उमगत नाही, अन्वय त्यांचा लागत नाही!
ह्रदयामधली अशक्य खळबळ, असमर्थततेची हळवी हळहळ,
शमवू म्हणता शमत नाही, लपवू म्हणता लपत नाही!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान