My Confession

Submitted by Çhetan Thakare on 28 January, 2015 - 02:59

My Confession

तो वार रविवार, सप्ताहाचा शेवट चा वार असल्याने त्या दिवशी सर्व दुकाने सहसा बंदच होती. रस्त्यावर वर्दळ तशी कमीच होती कारण घनदाट भरून आलेल्या आभाळाने आपल्या गरुडा सारख्या ढगांनी सुर्याला झाकून घेऊन जमिनीवर असह्य पणे सरी कोसळत होत्या. जणू तो जमिनीवर त्या दिवशी रागच काढत होता. पावसा पासून वाचण्यासाठी मी बसस्टोप चा आधार घेतलेला होता आणि तोच मला एक आधार होता, कारण पंचवटी कडे जाणारी बस ही त्या थांब्यावर थांबूनच जाणार होती आणि एखादा मुलाने भूक लागल्यावर जेवणाची वाट पहावी तशी मी त्या बस ची वाट पाहत होतो.

पाऊस त्याचा धारा जरा जास्तीच वेगाने जमिनीवर ओसरत होता जणू तो जमिनी ला दाखवून देत असावा कि तू कितीही प्रयत्न केले तरी तुला माझ्या छत्र छाये खालीच वावरावे लागतील कोण जाणे, मनात चित्र-विचित्र कल्पना येत होत्या आणि तेवढ्यात स्वत:ची ओढणी सावरत एक तरुणी सुद्धा त्या स्टोप वर आली. माझे मन त्या बस ची चातका प्रमाणे वाट पाहत होते. मी त्या विचारात खूप मग्न होऊन गेलेलो होतो, आणि मग पावसाचा वेग पुन्हा वाढत होता, ढग फुटावे अशी कल्पना मनात यावी असा तो जमिनीवर बरसत होता.

रस्त्यावर पाळणाऱ्या पावसाच्या धारा आता माझ्या पायांना स्पर्श करू लागल्या होत्या आणि त्या पाण्यातील गारवा मला जणू थंड पाण्यात मी पाय टाकावा असा भ्रम करून देत होता. पाण्याची धार मात्र वाढत चाललेली होती आणि माझा बाजूला असणारी तरुणी सुद्धा चिंतेन घायाळ झाली असावी. पाण्याची धार जशी वाढत होती तशी ती स्वत:ला सावरत होती आणि तिची ही कसरत चाललेली मी पाहत होतो. अश्या परस्त्री बद्दल कुतूहल होते पण मी पण हताश होतो. मी तिला मागे होण्यास सांगितले. तिचा चेहरा मी अजून पाहिलेला नव्हता आणि तिने सुद्धा माझा चेहरा पाहिलेला नव्हता.

पाऊस हळू हळू कमी झाला आणि तो थांबून गेला. ढग सुद्धा पुढे सरकत चाललेले होते आणि पडद्या आड लपून जसे कुतूहलाने पहावे तसे सूर्य त्या ढगां मधून पाहत होता आणि आणि झाडां मधून वाट सावरून जशी किरणे धरतीला आलिंगन देण्यासाठी धाव घेत असतात तशी ती किरणे जमिनीवर पडत होती. निसर्गाचा एक वेगळा अवतार मी त्या दिवशी अनुभवत होतो आणि तो दृष्टीहीन करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. तेवड्यात कुठून वाऱ्याने वेग धरला आणि तो एका पतंगा सारखा सैरा वैरा धावत होता. समोर जे काही येईल त्याला तो चिरून पुढे पळत होता आणि तेवढ्यात धाडकन आवाज आला आणि त्या वाऱ्याने आमचे छपर स्वतःमध्ये विलीन करून घेतले आणि जांभूळ खावून त्याच बी कस फेकाव तसे ते छत त्या वाऱ्याने फेकून दिले होते. या सर्व प्रकारा मुळे ती तरुणी खुपच घाबरलेली होती. तिचे अंग थरथरत होते. तेवढ्यात काना जवळ जोरात कोणी ढोल वाजवावे असा कर्णाला भिन्न करणारा आवाज आला. आणि पाहतो तर काय, तर समोरच्या झाडावर वीज ककोसळलेली होती. तो आवाज एवढा कर्कश्य होता कि एका सर्पाने आपले भक्ष कसे सेकंदात पकडावे तसे त्या तरुणीने मला घट्ट मिठीत घेतले. ती मिठी एवढी घट्ट होती कि तिच्या हातातले कांगण माझ्या पाठीत रुतत होते. ती खूप थरथरत होती आणि मी ते जाणवू शकत होतो. डोक्यावरचे छप्पर उडून गेले होते आणि सूर्याची किरणे आमच्यावर झरयासारखी ओसरीत होती. पाऊस मंद गतीने आमच्यावर बरसत होता आणि त्या तरुणी ला आपल्या पासून कसे लांब करावे हे मला उमजत नव्हते. तरीही मी मनाशी निष्ठा केली आणि सावरण्यासाठी मी तिच्या खांद्यांवर हात ठेवले आणि तिला हळुवार पणे लांब करण्याचा मानस केला, तिला सावरताना नकळत माझी नजर तिच्या त्या निरागस चेहऱ्याकडे गेली. एखाद्या उमलणाऱ्या गुलाबावर उगवणाऱ्या सूर्याने कशी उष्णतेची पाझर सोडावी तशी तिच्या चेहरयावर त्याने त्या ढगांना भेदून ती सुवर्ण किरणे तिच्या चेहऱ्यावर पडलेली होती. आणि त्या किरणांमुळे ती न्हावून निघालेली होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते दवबिंदू एखाद्या संथ नदीवर पडणारे सूर्यकिरण जसे त्या शांत पाण्यावर मोती तयार करतात आणि ते मोती त्या पात्राची शोभा वाढवतात तशी ते तिच्या निरागस चेहऱ्याची शोभा वाढवत होते. तिचे डोळे जसे माजवून निघालेला समुद्र जसा शांत होतो तसे तो पाणीदार डोळे. आणि त्या शांत सागरात जसा सूर्यराज कसा चमकतो तसे ते तिचे बुबुळ चमकत होते आणि त्या डोळ्यांची शोभा वाढवावी तशी तिच्या भुवया होत्या त्या इतक्या सुरेख होत्या कि इंद्र देवाने जसा त्याचा सप्तरंगी धनुष्य पृथ्वी तालावर सोडवा तसा त्या अर्ध वर्तुळाकार.

त्या भुवया आणि तिचे ओठ जसे नुकतेच तरुण वयात आलेला गुलाब जसा गुलाबी असतो तसे ते कोमल होते आणि ते ओठ जेव्हा बंद होत असे वाटे कि सूर्य आणि जमिनीचे मिलन व्हावे, असे त्या निरागस चेहऱ्यात एवढी शक्ती होती कि मी माझ्या डोळ्यांना तिच्या चेह्र्यापासून सावरू शकत नव्हतो आणि माझी त्यांना सावरण्याची इच्छा पण नव्हती तेवढ्यात एका शांत पाण्यात कोणी दगड मारून शांतता भंग करावी अश्या तिच्या आवाजाने माझ्या मनातल्या फुलपाखराला तिने छेडले. आणि मला सत्य परिस्थितीत आणले आणि ती जास्त काही न् बोलता सोरी म्हणून माझ्या पासून थोडी लांब झाली. मी तिच्याकडे जाणार तेवढ्यात आईचा आवाज आला उठ रे उठ किती झोपतोस उठ ग्यास संपलाय नंबर लावून दे उठ आणि अश्या स्वप्नाचा त्या दिवशी असा निर्दयी अंत झाला. !!

: चेतन ठाकरे ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दबंबाळ झालंय राव फारच !!!
>>उपमा खाऊन खाऊन अंमळ अजीर्ण व्हावे तसे वाटले या उपमा वाचून<< हा हा हा अगदी अगदी !!
सोपे लिहण्याचा प्रयत्न करा !!

पु.ले.शु.

झेब्र्याच्या पाठीवर पांढर्‍या पार्श्वभुमीवर काळे पट्टे असतात त्याप्रमाणे निरभ्र अंबरासारख्या पांढर्‍या शुभ्र स्क्रीनवर आपण टंकलेली काळीभोर अक्षरे वाचता वाचता सोमरसाचे प्राशन अति झाल्यावर दुसर्‍या दिवशी देवळातील अतिभव्य घंटेचा नाद करण्यासाठी जसे जोराने ठोके द्यायला लागतात त्याप्रमाणे जसे डोक्यात घण पडू लागतात तसे डोके घणघणू लागले..

वाह जबरीच ! Happy
उपमा जास्त असल्या तरी असे लिहिता येणे वाटते तितके सोपे नाही.
@चेतन : शिर्षक मराठी देता आले असते असे वाटले.

जावेद अखतरांच गाणं आठवलं :

जैसे संदलती आग
जैसे सुबह का रूप, जैसे सर्दी की धूप
जैसे बीना की तान, जैसे रंगों की जान
...
जैसे मंदीरमे हो कोइ जलता दिया .....