मी तुझी कल्पना झालो ..

Submitted by सुशांत खुरसाले on 27 January, 2015 - 22:56

ना भूमिका इथे काही, का तरी हालता झालो
हा रंगमंच कोणाचा ज्याचा मी पडदा झालो

तू माझे वास्तव होणे, हे शक्य कधी नसल्याने
मी तुझ्या कल्पना केल्या,मी तुझी कल्पना झालो

जे दुखणे कोणालाही दुनियेत जाहले नव्हते
त्या एका दुखण्यावरचा मी सुन्न उतारा झालो

फुटणारच नव्हत्या केव्हा या एकांताला वाटा
मी केली गर्दी माझी , माझाच घोळका झालो

मी अजूनही फडफडतो तू विस्मरल्या वार्यांनी
मी तुझे शब्द लिहिलेला काळाचा तुकडा झालो

तितक्याला तितके उरले जगण्याचे प्रश्न निरंतर
ती तितकी अवघड झाली,जितका मी सोपा झालो

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि भूषण एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतोय.
आमच्यात अनेक वादविवाद झालेत.<<< हे असले हवाले का देत असता आपण बेफीजींच्या बाबतीत माहीत नाही
आणि तुम्हचा त्यांचा परिचय आहे आणि माझा तुमचा माझा त्यांचा नाही असे काही आहे काय ?बर मी वाद विवाद आपणासोबत करूच नयेत से आपले म्हणणे आहे काय ??

मला एक मत आहे की समोरचा माणूस काय बोलला ह्याच्यापेक्षा तो कोण आहे त्याचा राग माणसाला जास्त येतो आपल्याला कोणी असे म्हटले तरी चालेल पण अमुक तमुकाने म्हटलेले खपणार नाही असा माणसाचा हेका असतो !!

मलाही तोच मुद्दा justify करावयाचा आहे . की आकलन म्हणजे तरी काय ! मग लिहीलं गेलं ते अनाकलनीय , गूढ वगैरे आहे की काय ?
वैभवजी ! मला वाटते, आकलन हे व्यक्तीसापेक्ष आहे.कोणाला लगेच समजेल, कोणाला थोडा उशीर होईल.. इतकेच ना! द्राक्षाचे खूळ मध्येच कशाला आणलेत ! लेखन आकलन सुलभ असण्याचा मी निषेध थोडाच केला.एखाद्या मतास पाठींबा देणे म्हणजे मी दिलेली टीप वाचून तरी माझा उद्देश आपल्या लक्षात यायला हवा होता. असे करून आपण मूळ चर्चेला बगल दिल्याचेच जाणवते.

सुशांत,

शेवटचा शेर आवडला.

उर्वरितपैकी काही सपाट वाटले आणि काही कळलेच नाहीत.

शेवटचा आवडला, तरी बेफीजींनी म्हटल्याप्रमाणे त्यात क्लिष्टता वाटली. त्यांच्या दिलदार स्वभावानुरूप त्यांनी निरीक्षण मांडले. मी तक्रार मांडतो आहे.

पाटील साहेब घाई करताय मते देण्याची आधी चांगले शेर करा काही मग अवलोकन करा स्वतःचे मग बोला !

तुमचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे कोल्ह्याला आंबट झालेली द्राक्षे नाहीत ना हे तपासून पहाल काय पाटील साहेब
>>>>>>>>इति वै व कु
वैभवजी, मुद्दा द्राक्षाचा नव्हे, गोड की आंबट ते आणखी ठरायचे आहे. मलाही हाच मुद्दा justify करावयाचा आहे की हे आकलन म्हण्जे तरी नेमके काय ? आणि जे सहजी आकलन होत नाही ते अनाकलनीय ,गूढ वगैरे म्हणावे का?आणि असे लिहीणारे mystic म्हणावेत का ? मला वाटते आकलन हे व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाला ते प्रथमदर्शनी आकलन होईल तर कोणाला ऊशीरा, एवढेच ना !
समीरजीच्या मतास पाठींबा दिल्याने लेखन हे आकलनास सुलभ असावे या मताचा निषेध थोडाच होतो.आपण हे द्राक्षाचे खूळ मध्येच कशास्तव काढले ! असे करून आपण मी टीपेमध्ये म्हटल्याप्रमाणे जी चर्चा अपेक्षित होती त्या मूळ चर्चेस बगल दिल्याचेच जाणवते.असो !
मी पाठींबा देताना विनाशर्त हा शब्द लावतो म्हणजे उगी थोडाच लावतो.

वैवकु | 2 February, 2015 - 01:38
पटील साहेब घाई करताय मते देण्याची आधी चांगले शेर करा काही मग अवलोकन करा स्वतःचे मग बोला !

तुमचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे कोल्ह्याला आंबट झालेली द्राक्षे नाहीत ना हे तपासून पहाल काय पाटील साहेब
>>>>>>>
वैभवजी, इथे मुद्दा द्राक्षाचा नाही, लेखनाच्या आकलनाचा आहे. मी ज्या उत्सुकतेपोटी चर्चेत मला योग्य वाटलेल्या मतास पाठींबा देवून चर्चेची अपेक्षा केली होती ती बाजुलाच राहीली असे जाणवते.मला हे समजून घ्यायचे होते की हे आकलन म्हणजे तरी नेमके काय? माझ्या मते ते व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाला प्रथमदर्शनी समजेल तर कोणाला थोडे उशीरा , एवढेच ना ! सहज आकलन होत नाही ते लेखन मग अनाकलनीय , अगम्य , गूढ वगैरे आहे का? आणि लिहीणारा mystic ठरवायचा का? मी एखाद्या मतास पाठींबा दिला तोही विनाशर्त म्हणजे माझा प्रश्न त्या मुद्द्याभोवतीच म्हणून ! पण म्हणजे लेखन आकलनास सुलभ असावे या मताचा तो निशेध ठरत नाही.टीपेमध्ये ज्या चर्चेची अपेक्षा ठेवली तीला म्हणजे मूळ मुद्द्यालाच बगल दिल्याचे जाणवले.द्राक्षे मध्येच आले विनाकारण, असे वाटले ,असो!!

पाटील साहेब आपले हे प्रतिसाद लिहिणे चालू असतान मी आपल्याला फोन केला होता आणि आपली मनमोकळी चर्चाही झाली आहे म्हणून इथे आपल्या प्रतिसादांवर बोलत नाही जास्त
आपल्याला एकमेकांचे म्हणणे त्यामागच्या भावना एकमेकाना समजल्या आहेत आता तुमच्या भावना मला पटल्या आहेतच आणि माझ्याही तुम्हाला पटल्या असावात अशी अपेक्षा करतो

बाकी चर्चेला बगल देण्याचा कसलाही हेतू / प्रयत्न नाहीच

मी किती समजावतो आहे चला समजून घ्या
शब्द वेडे वाटले तर "मामला" समजून घ्या Wink

ती तिखट भाषा मलाही सोसवत नाही जरी
मी जरा रागावलो होतो मला समजून घ्या _/\_

धन्यवाद Happy

मी अजूनही फडफडतो तू विस्मरल्या वारयांनी
मी तुझे शब्द लिहिलेला काळाचा तुकडा झालो
हे सर्वात आवडलं ! छान गझल.

वैवकु | 2 February, 2015 - 01:38

पटील साहेब घाई करताय मते देण्याची आधी चांगले शेर करा काही मग अवलोकन करा स्वतःचे मग बोला !

तुमचा बिनशर्त पाठिंबा म्हणजे कोल्ह्याला आंबट झालेली द्राक्षे नाहीत ना हे तपासून पहाल काय पाटील साहेब
>>>>>>>>>
वैभव्जी ! द्राक्षे गोड की आंबट हा विषयच नाही इथे ! ते अजून ठरायचे आहे. विषय होता गझलेच्या आकलनाबाबतचा . मलाही तोव्ह मुद्दा justify करायचा होता की हे आकलन म्हणजे तरी असे काय आहे! मला वाटते आकलन हे व्यक्तिसापेक्ष आहे. कोणाला प्रथमदर्शनी कळेल, कोणाला ऊशीरा .इतकेच ना ! आकलनास सहज सुलभ नाही असे लिखान मग अनाकलनीय, गूध, अगम्य (संत मुक्ताईचे काही अभंग साहित्यिक मंडळींनी जसे त्यांना आकलन न झाल्यामुळे कूट ठरवले) ठरवायचे का? आणि असे लिखाण करणारा मग mystic म्हणावा का? समीर्जींच्या मताला मी ठामपणे अनुमोदन दिले कारण मला तो मुद्दा पडताळून पहायचा होता. खरे तर मी टीपेमध्ये म्हटल्याप्रमाणे चचेची अपेक्षा ठेवली होती जेणेकरून मार्ग मिळेल. पण आपण द्राक्षे मध्येच आणून मूळ विषयाला बगल दिल्याचेच जाणवले, असो!

Pages