रेशम रेशम लायो....

Submitted by प्रमोद देव on 24 January, 2015 - 23:46

https://www.youtube.com/watch?v=IVuCE3vwR5I
महाजालावर ही एक छानशी कविता वाचली आणि ती ठुमरीच्या अंगाने 'चाल'वावी असे वाटले म्हणून केलेला हा एक प्रयत्न.
(मी गाण्याचे रीतसर शिक्षण कुठेही घेतलेले नाही....पण आजवर नियमितपणे आणि निष्ठेने विविध प्रकारचे गायन प्रकार ऐकत मात्र आलोय...त्यातूनच जे काही वेडेवाकुडे स्फुरते ते आपणासमोर मांडत असतो..तसाच हा एक प्रयत्न.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव काका, प्रयत्न फार चांगला आहे.
मला ऐकताना कोणत्या तरी गाण्याची आठवण येत होती...रागसाधर्मयामुळे असेल.
फक्त हे ठुमरीसारखे न वाटता गाण्यासारखेच वाटले.
तुमच्या उत्साहाला मात्र सलाम आहे!

देव काका...मस्त मस्त .. मी आपल्या posts, FB वरील comments नेहमी वाचते, .. अलका ही माझी भावजय आहे .....तिला मा बो वर येणे अजुन जमले नाही आपण तिला गाईड केलेत तर बरे होईल .
<<< तुमच्या उत्साहाला सलाम आहे>>>> +१

चैतन्य, सुहास्य, भुईकमळ आणि काऊ, आपण सर्वांनी आवर्जून गाणं ऐकलंत आणि अभिप्रायही दिलात. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!
ठुमरीचा बाज त्यात म्हणावा तसा येत नाहीये असं मलाही कुठे तरी वाटत होतं...तरीही कुणा जाणकारांकडून त्याबाबतची प्रतिक्रिया हवी होती...तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियेने मला पुढची अशी रचना करतांना, आता त्या दृष्टीने अधिक डोळसपणे विचार करायला नक्कीच मदत होईल...

सुहास्य, अलकाजींना नक्की सांगेन मी.