होय श्रद्धा महागली आहे

Submitted by वैभव फाटक on 20 January, 2015 - 22:52

भेटवस्तूत तोलली आहे
होय, श्रद्धा महागली आहे

ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे

गुंफ शेरास तू शिताफीने
तोकडी ही लगावली आहे

तू तिथे गाळलेस अश्रू अन
वीज येथे कडाडली आहे

आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे

वैभव फाटक, वापी ( ०७-०१-२०१५)

http://vaibhavphatak12.blogspot.in/2015/01/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजवर जी पहातही नव्हती
आज ती चक्क लाजली आहे<<< थेट उर्दू ढंगाचा. आवडला. Happy

ठेव विश्वास आज त्याच्यावर
आज हातात बाटली आहे<<< हाही तस्साच, हाही आवडल Happy

आवडली