Submitted by वीणा सुरू on 20 January, 2015 - 11:01
डोळ्यात होते वात्सल्य
बाळाकडे पाहताना
तो खुदकन हसला
त्याचे केस उडताना
बाळ हसले खळीदार
तेव्हां हरखून गेला तो
आणि टचकन पाणावले
दोन्ही डोळे
त्या अनाथ असहाय्य बाळासाठी
रस्त्यात उभे राहून शोधत होता
टाकून जाणारा बाप
असहाय्य आई
आणि
थोडीशी माणुसकी
ते उघडं नागडं गोंडस बाळ
आणि
टक्क झोपलेली माणुसकी
माणसं विरळल्यावर
जड पावलं उचलत तो उठला
जाण्यासाठी
आणि समोरून
बाटलीत दूध घेऊन येणारा
मनुष्य दिसला
बहुतेक बाळाचा बाबा
दंगलीत लपूनछपून
स्वत:ला वाचवत
बाळासाठी जीव टाकत आलेला
बाळाच्या आईला शोधणारा
याने त्याचं नाव विचारलं
त्याने सांगितलं
आणि कमरेची तलवार उपसत
याच्या कपाळीची शीर उभी राहीली
पशू जागा झाला होता, पुन्हा एकदा
ग्रो अप बेबीज !
खरंच म्हणावं का असं ?
वीणा सुरू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा