Submitted by _हर्षा_ on 20 January, 2015 - 00:49
नात्यांच्या बोथट जाणीवा
भरकटलेलं वाळवंटी आयुष्य
आपलाच तोल सावरत असतो आपण
आणि जाणीव होते मैत्रीची
कुठेतरी दूर दूर जाणारी माणसे
कुठलं नातं कुठे जोडु?
आपल्याच मनाची धडपड
आणि लाभते खास संगत मैत्रीची
कोवळ्या उन्हाची वाट बघताना
क्षणात सगळं रखरखीत होतं
आणि हात पसरुन वाट पहात असते
एक सुगंधी फुलबाग तीही मैत्रीचीच
आयुष्यात काय कमावलं
काय गमावल, अनेक विचार
सगळं काही विसरायला लावतो
एक विश्वास तो ही मैत्रीचाच
कसल्याशा मोठ्या वादळात
विस्कटलेलं मन सावरायला
उबदार स्पर्शाची जाणीव
"मी आहे ना?" ची साद तीही मैत्रीचीच
अगदी आत्तापर्यंत कायम
माझ्याबरोबरच आहे
तुमच्याच मैत्रीचं कोंदण
तुमच्याच मैत्रीचं कोंदण
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास
झकास
जमलिये
जमलिये
कविता
कविता
खुप सुन्दर कविता हर्षे!
खुप सुन्दर कविता हर्षे! अजिबात नवखेपणा जाणवला नाही.
<<कोवळ्या उन्हाची वाट बघताना
क्षणात सगळं रखरखीत होतं
आणि हात पसरुन वाट पहात असते
एक सुगंधी फुलबाग तीही मैत्रीचीच<<
अप्रतिम जमलय!
छान!!!
छान!!!
धन्स, कोक्या, रीया, केदार
धन्स, कोक्या, रीया, केदार
पण आज ही इकडे टाकली. धन्स गो!
आर्यातै, पहिलाच प्रयत्न नाहीये हा
धन्स नरेश माने.
मस्तं! आवडली!
मस्तं!
आवडली!
छानच, आवडली!!
छानच, आवडली!!
अप्रतिम, वाटत नाही दूसरीच
अप्रतिम, वाटत नाही दूसरीच कविता असेल अशी
आवडेश
आवडेश
स्पार्टा, चाफ्या ___/\___
स्पार्टा, चाफ्या ___/\___ धन्स!!!
आसा, अंकु धन्स!
हर्षे, मस्त जमलेय. आता थांबू
हर्षे, मस्त जमलेय.:स्मित:
आता थांबू नको. येऊदेत नवीन नवीन कविता.
अप्रतिम ! खुपच छान
अप्रतिम ! खुपच छान
चांगली जमलीये....
चांगली जमलीये....
आदी, सही ! सुपर्ब ! झकास !
आदी, सही ! सुपर्ब ! झकास !
दुसरीच कविता ना, पण चांगली जमली आहे. पहिल्या कवितेतेपेक्षा ही जास्त मॅच्युअर्ड वाटते. दोन कवितेत एवढी प्रगती? मग लिहित रहा.
शो तै, पवित्रा, सुश्या खुप
शो तै, पवित्रा, सुश्या खुप खुप धन्स!!!
ही त्या दुसरीच्या आधी लिहिलेली आहे खरतरं म्हणजे पहिलीच
इथे थोडी सांधुन मग टाकलीये.
मने, धन्स