साल्हेरगड विजयदिन : ५ जानेवारी २०१५

Submitted by मी दुर्गवीर on 19 January, 2015 - 11:18

“३४४ वर्षानंतर साल्हेर गडावर दुर्गवीर प्रतिष्ठान, तर्फे साल्हेर विजय दिन उत्साहात साजरा”

" शिवराय असे शक्तिदाता" हेच लक्षात घेऊन आम्ही दुर्गवीरांनी साल्हेर विजय दिन साजरा करण्याचे ठरवले.दर रविवारी साल्हेर वरील पाण्याचे टाके साफ सफाई करण्याचे काम चालूच आहे,त्याच जोडीला साल्हेर विजय दिन आम्ही साजरा केला. योगायोग म्हणजे ५ जानेवारी १६७१ ला पौष पोर्णिमा होती आणि ५ जानेवारी २०१५ ला सुद्धा पौष पौर्णिमाच होती. या वेळी संपूर्ण गडावरील सर्व ७ दरवाज्यांवर झेंडूंच्या फुलांचे तोरण लावण्यात आले, पताका तसेच चमेली आणि शेवंतीच्या माळा लावण्यात आले. प्रत्येक दरवाज्यांवर , बुरुजांवर , तटबंदीवर झेंडूच्या माळा आणि झेंडे लावण्यात आले. पहिल्या द्वारा जवळील पाण्याच्या टाक्या जवळील सूर्याजी काकडेंची समाधी पाण्याने स्वच्छ धुवून झेंडूंच्या फुलांनी सजवण्यात आली, गंगासागर तलाव, गंगा-जमुना टाके, महादेव टाक्या जवळील वाळलेले झुडुपे काढून परिसर स्वछ करण्यात आला.किल्यावरील गुहांना तोरण लावून सजवण्यात आले. रेणुका मंदिर, परशुराम मंदिर सजवण्यात आले. पूर्ण गड सजवल्यानंतर जणू आपण शिवशाहीत असल्याचीच जाणीव होत होती, संपूर्ण गड आनंदाने डोलत होता, भगवे झेंडे उत्साहाने फडकत होते, या संपूर्ण कार्यक्रमात साल्हेर येथील स्थानिक आणि दुर्गवीर बहुसंखेने उपस्थित होते, ह्या गड किल्ल्यांच्या संवर्धनात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे हीच इच्छा… !
साल्हेरगड विजयदीन

५ जानेवारी १६७१ - साल्हेरची लढाई ... !
५ जानेवारी १६७१ - मराठे आणि मुघल यांच्यात साल्हेर येथील
महत्वाची लढाई मराठ्यान्नी फत्ते केली.
नाशिक पूर्व - पश्चिम मधील अनेक किल्ले सर केल्यावर
मराठा फौजेने खान्देशातील बुरहारपुर ही मुघल पेठ लूटत 'साल्हेर'
या महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्याला वेढा घालून तो जिंकला.
त्यावेळी दख्खनेचा मुघल सुभेदार 'दाउदखान' साल्हेर पासून २२
किमी वर होता. किल्लेदार फत्तेहुला खान
किल्ला लढवताना मारला गेला.
ऐतिहासिक माहिती साभार :(http://marathahistorycalender.blogspot.in/)
याच महत्वपुर्ण दिनाच्या स्मरणात दुर्गवीर शिलेदार तर्फे साल्हेरगडावर तोरण बांधून तसेच टाके स्वच्छता करुण साजरा करण्यात आले .

IMG_1960.JPG10172565_832688713443474_3318724442842337541_n.jpg10388186_832452450133767_2383083464464197253_n.jpg10924694_832688896776789_2356982988212953194_n.jpg10891535_832688803443465_7053503154657619645_n.jpg10891972_832452366800442_390454106601113157_n.jpg10407646_832453323467013_7214608991032902010_n.jpg10906154_832688736776805_8554627394982361285_n.jpgk.jpg10891842_832688800110132_4162838609728870797_n.jpg10917387_832688860110126_7354957183779415974_n.jpg10891883_832452776800401_2638603071176435436_n.jpg10393868_832452470133765_2550550948303670841_n.jpg994468_833392050039807_8137740076956784476_n.jpg10917335_832688696776809_5460935101719368494_n.jpg

FACEBOOK : https://www.facebook.com/media/set/?set=a.832452233467122.1073741922.453...

धन्यवाद ___/\___
''दुर्गवीर''नितीन देविदार पाटोळे : 08655823748
www.durgveer.com
durgveerpatole@gmail.com
durgveer.com@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐ शाब्बास !
टाके साफ केलेत म्हटल्यावर माझा कंठ खरेच दाटून आला.

तुम्हा सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद आणि अभिनंदन!!

सामान्यांना तिथवर पोहोचता येईल अशी सोय होईल तेव्हा लोकांना ह्याचे महत्त्व लक्षात येईल,
तोपर्यंत असंख्य दुर्गवीरांना शुद्ध पेयजलप्राप्तीची सोय झाली आहे. खरेच मोलाचे काम आहे हे!