घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2015 - 15:21

..

या शनिवारची ऑफिसमधील चर्चा!

मद्यप्राशनाचा विषय निघाला, कोण किती पिते आणि घरी आपल्या बायकांच्या आपल्या या व्यसनाबद्दल काय रिअ‍ॅक्शन असते वगैरे..

एक विवाहीत महिला सहकर्मचारी, जी माझी एक चांगली मैत्रीण देखील आहे, जिला दोन लहान मुले आहेत, ती मोठ्या कौतुकाने सांगू लागली,
"आमच्या यांना मी घरातच पिण्याची परवानगी देते. सोबत चकणा म्हणून मस्तपैकी त्यांच्या आवडीची कांदाभजी करून देते. जवळच्या मित्रांची मैफिल जमवायची परवानगीही दिली आहे. त्यामुळे बाहेरून पिऊन येत नाहीत. उगाच आपण बंधने टाकली तर पिणे वाढतेच.. वगैरे वगैरे .. वगैरे वगैरे.."

आणखी एकदोघांनी या पद्धतीला संमती दिली आणि पहिलाच विचार माझ्या मनात आला तो असा,. मुलांसमोर पिणे कसे चालते?? त्यांच्यावर चुकीचा परीणाम नाही का होणार, त्यांना चुकीचा संदेश नाही का जाणार??

आणि मी तसे तिला सर्वांसमक्ष बोलूनही दाखवले..
तसेच माझ्यासाठी हा धक्काच असल्याने आणि मला हे व्यक्तीश: जराही न पटल्याने माझ्या बोलण्याचा टोनही किंचित निषेध व्यक्त केल्यासारखा वा जाब विचारल्यासारखा जरा कडकच होता.

त्यामुळे ती बावरली, समर्थन देणारेही पटकन काही बोलले नाहीत, पण मग तिने सारवासारव सुरू केली,...

१) मुलांना काही समजत नाही !

माझे उत्तर - कमाल आहे, इतरवेळी तुम्हा सर्वांची मोठ्या कौतुकाने चर्चा चालू असते की आमच्या मुलांना लहान वयातच हे समजते आणि ते समजते, नव्हे आजची पुर्ण जनरेशनच स्मार्ट आहे, वगैरे वगैरे गप्पा असतात. तर मग नेमके हेच का समजत नाही? ते तसे तुमच्या सोयीचे आहे म्हणून? थोडक्यात तुम्ही स्वताला डिफेंन्ड करत आहात.

२) तसेही हि आताची पिढी मॉडर्न आहे. पुढे जाऊन आणखी काय कशी होणार, हे आपण काय सांगणार !

माझे उत्तर - दारू पिणे आणि आधुनिकता यांचा काहीही संबंध नाही, मद्यप्राशन पुरातन काळापासून चालत आले आहे आणि ते वाईटच समजले गेले आहे. तुझ्या नवर्‍यालाही कबूल असणार की दारू हि वाईटच आहे, त्यामुळे पित असला तरी त्याचा अतिरेक तरी तो टाळतच असणार. पण लहान वयातच मुलाच्या मनावर बिंबले की दारू म्हणजे काही वाईट वगैरे नसते, बरेच जण पितात, आपले बाबाही पितात, बस्स काही जणांना तिची चव वगैरे आवडत नसल्याने पित नाही इतकेच. तर मग ते सहजपणे वाहावत नाही का जाणार? पण याउलट मन संस्कारक्षम असेल तर त्याला मर्यादा तरी राहतील.

३) जे पित नाहीत त्यांना (म्हणजे इथे मला) दारू म्हणजे खूप वाईट वगैरे आहे असे वाटते. त्यामुळे असे विचार आहेत तुझे. तसेही रोज रोज नाही पित, दर आठवड्यालाही नाही पित, ओकेजनली ड्रिंक घेतो.

माझे उत्तर - तो काय किती पितो ते तुलाच ठाऊक, आणि किती वेळा हे घडल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होणार हे देखील तूच ठरव. पण आम्ही रोज रोज नाही पित, ओकेजनली घेतो, वा आम्ही बेवडे नसून लिमिटमध्येच पिणारे आहोत हा सर्रास सर्वच मद्यपींचा युक्तीवाद असतो. पण तो आपल्या नवर्‍याला डिफेंड करायला तू करत आहेस हे मात्र खूप चूकीचे आहे.

४) निदान बाहेरून ढोसून घरी येण्यापेक्षा घरीच पिणे चांगले नाही का?

माझे उत्तर - अच्छा, मग त्याने बाहेर ऑफिस आणि मित्रांच्या पार्ट्या मध्ये पिणे सोडले आहे का? अर्थात नाहीच! म्हणजे ते देखील ओकेजनली चालूच आहे, तर ज्या कारणासाठी तू घरी पिण्याची परवानगी दिली आहेस असे तू सांगत होतीस ते कारणही तसेच आहे.

५) पण तुला काय त्रास होत आहे? आमचे आम्ही बघून घेऊ ..
(माझ्या वरच्या एकाही उत्तराला प्रत्युत्तर करता न आल्याने मला थेट चर्चेतूनच तोडून टाकायचा प्रयत्न झाला, पण मी एकदा सुरू झालो की माझे मला स्वत:लाही थांबवता येत नाही)

मी म्हणालो - प्रश्न तुझ्याच मुलांचा नाही. तू जसे हे कौतुकाने सांगत आहेस ते ऐकून इथले इतरही पालक प्रभावित होतील. प्रश्न समाजाचाही आहे. त्यात कुठलीही चुकीची विचारसरणी रुजली नाही पाहिजे. उद्या माझी मुलेही याच समाजात वाढणार आहेत, त्यामुळे मला बोलायचा हक्क आहेच..

या शेवटच्या काही वाक्यांना माझा आवाज नकळत उपदेश करत असल्यासारखा गंभीर होत त्याला एक धार आली... आणि... तिचा बांध फुटला!
तिला डोळे टिपताना पाहून मलाही माझी चूक माझ्या ध्यानात आली. जोशमध्ये जरा जास्तच बोलून गेलो होतो. नेहमी तिची मस्करी मस्करीत थट्टा करायचो पण यावेळी अचानक सिरीअसच झालो, वा तसा आव तरी आणला. सर्वांसमोर तिच्या खाजगी बाबींवर उगीच वाद घातला.

असो,
ते प्रकरण तात्काळ माफी मागत मिटवून टाकले. दुपारी आम्ही जेवायलाही बाहेर जाऊन आलो. भांडणे आणि पुन्हा एक होणे माझ्या नजीकच्या लोकांसाठी नवीन नाही. तर ते सोडा..

पण यावरूनच हा प्रश्न इथे घेऊन आणायचे सुचले ! इथे मात्र आधीच माफी मागत सांगतो, जे असे करतात त्यांना धारेवर धरायचा हेतू नाही. बस यावर आपले विचार जाणून घ्यायचे आहेत. काही वेगळे द्रुष्टीकोनही समजतील, पटले तर स्विकारले जातील.

तर शिर्षक हाच एक प्रश्न - पुन्हा एकदा लिहितो - घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकतर मद्य घेत नाही म्हणजे मागास किंवा मद्य घेतात म्हणजे व्य्सनी, आता मर्कटलीला बघा अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया पहायला मिळतात. <<
एक्झॅक्टली.
लोकांना उगाच जज करण्यात काय हौस असते कुणास ठाऊक.

ज्यावेळेला जसा मूड असेल त्याप्रमाणे न पिणारे लोक किंवा दारू यातले एक काहीतरी निवडायचे. कॉम्बो करायचे नाही असे आता ठरवले आहे. उगाच निर्बुद्ध इरीटेट करत रहातात. अर्थात याला अपवाद असतातच.

आमच्या ग्रुपमधे अर्धे पिणारे आणि अर्धे न पिणारे आहेत आणि सुदैवाने कोणीच कोणाला त्यावरून जज करत नाही.

एक ग्लास दोन तीन तास पुरवत पिणारा माणूस आणि १० मिनिटात क्वार्टर खल्लास करणारा माणूस यांच्यात फरक आहे हे समजायची क्षमताच नसते बहुतेक यांच्यात.
>>>>>>>

सहमत आहे.
पण बरेचदा असेही असते की एखाद्याला एखाद दुसर्‍या पेग मध्येही चढते तर काही टाकी असतात, खंबा आत टाकतात पण ढिम्म हलत नाहीत. त्यामुळे कोण किती पितेय यापेक्षा कोणाला किती झेपतेय हे ही महत्वाचे.

बाकी न पिणार्‍यांकडून दारूचे प्रमाण आणि परीणाम यांबद्दल योग्य माहिती असण्याची अपेक्षाही ठेऊ शकत नाहीच. कारण काही जण शुद्ध शाकाहारी असतात तसे काही जण शुद्ध निर्व्यसनीही असतात, जे बारमध्ये कोल्ड्रींक प्यायलाही जात नाहीत, त्यांच्या ग्रूपमध्ये पिणारे नसतात, दारू पिणारा म्हटले की त्यांच्या डोळ्यासमोर थेट शराबी चित्रपटातील अमिताभ किंवा देवदासमधील शाहरूखच येतो, त्यामुळे दारूचा ग्लास हातात धरलेला प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी बेवडाच असतो. Happy

अवांतर - धन्यवाद ईब्लिस Happy

तुम्ही दारू कशी पिता या धाग्यावरून माझा प्रतिसाद ईथे कॉपीपेस्ट

------------------

मूलं बघत असतात. अनुकरण करत असतात. एकीकडे आपण मुलांना चांगले वळण शिस्त लावावे यासाठी जागरूक असतो. त्यांना मारावे की टाईम ऑट करावे यावरून तावातावाने वाद घालतो. तर दुसरीकडे अश्या कृत्याचे समर्थन कसे करू शकतो Sad
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 21 October, 2022 - 20:42

पर्रफेक्ट आपण कोणीच नसतो. पण निदान चुकीच्या गोष्टीला चुकीचे तरी म्हणायला हवे.
या दिवाळीला फटाक्यांची दारू असो वा अल्कोहोलची दारू, दोघांनाही दूर ठेऊया Happy

दारू पिणे चुकीचे हाच बेस गंडला आहे.
>>>

छे दारू पिणे चुकीचे बिलकुल नाही
उगाच सरकार त्यावर निर्बंध लावते.
उगाच त्याच्या जाहीरातींवरही बंदी असते.
उगाच लहान मुलांच्या शाळांशेजारी दारूच्या गुत्याची परवानगी नसते.
उगाच सरकारी कर्मचार्‍यांना ऑन ड्युटी दारू प्यायला मनाई असते.
उगाच आपल्याकडची भोळीभाबडी माणसे लग्न ठरवताना मुलगा/मुलगी दारू पितो का हा प्रश्न हमखास विचारतात.
आणि पिणाराही मग अट्टल बेवडा असला तरी हळूच म्हणतो, छे हो. ओकेजनली ड्रि़ंक घेतो Happy

सरकार त्यावर निर्बंध लावते. >> चूक. सरकारला महसूल मिळतो.
उगाच आपल्याकडची भोळीभाबडी माणसे लग्न ठरवताना मुलगा/मुलगी दारू पितो का हा प्रश्न हमखास विचारतात. >> एकमेकांना सोबत देऊ शकतील का? असा विचार असू शकेल. स्त्री-पुरुष भेदभाव टाळणे, हा विचार असू शकेल.

महसूल मिळतो... पण निर्बंध आहेतच ना. दाखवता का दारूच्या जाहीराती?

एकमेकांना सोबत देऊ शकतील का? असा विचार असू शकेल. >>>>> असू शकेल, पण तसे नसते ना. हा प्रश्न विचारण्यामागे जोडीदार दारूडा आहे का, आणि असल्यास दारूच्या किती आहारी गेला आहे का नाही हेच तपासले जाते.

दाखवता का दारूच्या जाहीराती? >> कुणी काय नियम करावेत, हा ज्या त्या सरकारचा प्रश्न आहे. त्याबद्दल काय बोलणार? तुम्हाला दारु विक्री आवडत नसेल तर सरकारकडे जाऊन दारुबंदी करून घ्या.

उबो आणि कॉमी.
उगाच काहीतरी युक्तीवाद करत आहात.

हा धागा वर आणण्याचा उद्देश माहीत आहे. तो प्रबोधन अथवा गांभीर्याने चर्चा करण्याचा नसून अर्ग्युमेंट जिंकण्याचा आहे.
तेव्हा थांबतो.

घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
प्रमेय : घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
उत्तर : बरोबर
प्रमेयाची सिद्धता : ज्या अर्थी दारु पिली जाते त्या अर्थी पिणार्‍याच्या मते तिच्यात काही वाईट नसणार. शिवाय घरात पिली जाते त्याअर्थी ती पिणार्‍याच्या मते नक्कीच चांगली गोष्ट असणार. वाईट गोष्टी कोणी आपल्या घरात करणार नाही. मुलांसमोर पिली तर मुलांनाही
लहानपणापासून एका नवीन गोष्टीची ओळख होईल. किंबहूना लहान वयात गोष्टी शिकल्या तर मोठेपणी आपण त्यात एक्सपर्ट बनू शकतो.
तस्मात : वरील प्रमेयाचे उत्तर "बरोबर" हे आहे.
Happy

उच्च आर्थिक गटातील वर्गात मुलगा किंवा मुलगी 16 ते 17 वर्षाची झाली की घरात च दारू पिण्यास शिकवले जाते.
अशी नवीन परंपरा चालू झाली आहे
पार्टी, काहीही साजरे करण्याची उच्च परंपरा आज ची आहे .
आणि अशा ठिकाणी दारू must.
ती पिता आलीच पाहिजे.
जसे किती uncomfortable वाटले तरी मसाला डोसा हा काटा चमच वापरून च खाल्ला जातो .
तशी ही बिनडोक पद्धत आहे

IF घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ? == चूक THEN
Goto तुम्ही दारू कशी पिता?
IF तुम्ही दारू कशी पिता?== मुलांसमोर THEN
Goto घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
ENDIF
ENDIF

हा धागा वर आणण्याचा उद्देश माहीत आहे. तो प्रबोधन अथवा गांभीर्याने चर्चा करण्याचा नसून अर्ग्युमेंट जिंकण्याचा आहे.
तेव्हा थांबतो.
Submitted by मानव पृथ्वीकर on 21 October, 2022 - 22:20
>>>>

माझ्या हेतूवर शंका असल्यास तुम्ही वेगळा धागा काढू शकता.

मी माझगावच्या चाळीत वाढलोय. दारूने होणारे मृत्यु जवळून पाहिले आहेत. शेजारचेही सोडा, आमच्या घरात माझ्या चार काकांपैकी दोघे काका दारूच्या व्यसनाने गेले. एक काका वेळीच सुधारले, कायमची सोडली आणि वाचले.
आणि हो, देशी गावठी दारू नाही तर बीअर, व्हिस्की आणि विदेशी दारूवालेच होते हे. बरेचदा हा सुद्धा एक मुद्दा असतो म्हणून क्लीअर केले.

उच्च आर्थिक गटातील ................
>>>>>

@ हेमंत, हो खरे आहे. हल्ली तर ऊंची दारू पिणे स्टेटस सिंबॉल झाले आहे.

मला यावर एक शाळेतला किस्सा आठवतो. मित्रांमध्ये कोणाचे वडील दारू पितात याची चर्चा चालू होती. एक मित्र म्हणाला त्याचे वडील दारू पित नाहीत. मग त्यावर दुसरा म्हणाला की तुझे वडील काम काय करतात. ऑफिसर वगैरे नाहीत का? ऑफिस पार्ट्यांमध्ये प्यावेच लागते. नाही बोलता येत नाही...

हे असे विचार त्या मित्राचे त्या काळी होते. अर्थात हे विचार घरूनच रुजले असणार. घरूनच आपल्या पिण्याचे समर्थन करायला असे असे दारू प्यावेच लागते म्हणून विचार मुलाच्या डोक्यात भरले होते. मला तर तेव्हाही ते त्या वयात खटकले होते. कारण खरे तर माझेही वडील दारू प्यायचे. पण ती वाईट आहेच हेच माझ्या मनावर बिंबवलेले. एकदा माझ्या काकांनी त्यांच्या पोराला, म्हणजे माझ्या चुलतभावाला आणि मला व्हिस्कीची बाटली आणायला पाठवलेले. आम्ही शाळकरी वयात असू. तेव्हा माझे वडील काकांना फार ओरडलेले. तुला अक्कल नाही का, पोरांना या कामासाठी पाठवतात का.. त्यामुळे भले घरात दारू पिणारी जनता असली तरी दारू ही वाईटच हे मनावर बिंबवलेले. पुढे मग पोरांना अक्कल आल्यावर तिच्या आहारी जायचे की नाही हा त्यांचा निर्णय. पण निदान घरातून तरी दारूचे उदात्तीकरण नको एवढीच ईच्छा.

विष पिले की लगेच माणूस मरतो.
साप चावला की लगेच मरतो.
वाघ,सिंह माणसाचे काय करतात हे सर्वांना माहीत आहे.
त्या मुळे ह्या सर्व पासून माणूस प्रचंड दूर असतो.
कारण रिझल्ट लगेच असतो.
दारू, पिला की लगेच माणूस मरत नाही किंवा कोणत्या रोगाला बळी पडत नाही
ती वेळ येण्यास पंधरा,वीस वर्ष जावी लागतात.
त्या मुळे दारू मुळे मृत्यू येतो हे काही लोकांच्या डोक्यात घुसत नाही.

शेजारचेही सोडा, आमच्या घरात माझ्या चार काकांपैकी दोघे काका दारूच्या व्यसनाने गेले. एक काका वेळीच सुधारले, कायमची सोडली आणि वाचले. >> उत्तम.

राधानिशा यांच्या पोस्ट दारू कशी प्यावी या धाग्यावरून कॉपी पेस्ट करत आहे

×××××××××××××

तुषार नातू यांनी एका केस बद्दल लिहिलं होतं . एक यशस्वी व्यावसायिक , समाजात प्रतिष्ठा असलेले गृहस्थ अनेक वर्षं दर शनिवार रविवार मर्यादित प्रमाणात दारू घ्यायचे , कधीही दारूच्या नशेत गैरवर्तन वगैरे प्रकार नाही , घरी काही त्रास देणे नाही . व्यसन त्यांच्या ताब्यात असलेलं .

त्यांच्या मुलाच्या 21 व्या वर्षीच्या वाढदिवशी त्यांनी स्वतः त्याला दारू पाजली . आता तू मोठा झालास वगैरे सांगून , सेलिब्रेशन म्हणून . जसा आपल्या दारूमुळे आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला नाही तसाच मुलाच्याही येण्याचं काही कारण नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटलं होतं .

मुलगा तेव्हापासून अधूनमधून पिऊ लागला आणि काही दिवसात पक्का दारुबाज झाला .. झिंगून घरी येण्यापासून नशेत राडे करण्यापर्यंत प्रकार करून झाले .. दारू सुटावी म्हणून व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याची वेळ आली . त्यावेळी त्याचे वडील म्हणाले की मी इतकी वर्षं पितो आहे , माझ्यावर असा परिणाम झाला नाही कधीच , कंट्रोलच्या बाहेर कधी गेलो नव्हतो मी .

त्यावेळी तुषार नातू यांनी दारू ही प्रत्येक माणसावर सारखाच परिणाम करेल असं नाही आणि प्रत्येक माणसाची व्यसन पचवण्याची क्षमता वेगवेगळी असते वगैरे वगैरे त्यांना सांगितलं . एक जण आहारी न जाता सहज राहू शकेल , कोणी महिनोन महिने न पिता राहू शकेल तर कोणी त्याच्या पार आधीन होऊन जाईल .

एरवी मर्यादेत किंवा क्वचित पिणारे आयुष्यात काही संकट किंवा टेन्शनची परिस्थिती आली की पिण्याकडे खेचले जाण्याची शक्यताही असतेच .

असो . ज्यांचा स्वतःच्या कंट्रोलच्या क्षमतेवर दांडगा विश्वास आहे त्यांचे ते स्वतंत्र आहेतच प्यायला .

वडील फक्त विकेंड्सना ड्रिंक घेतात , आई सांगते त्यांना ऑफिसमध्ये टेन्शन असतं ना म्हणून ते पितात . दहावीच्या परीक्षेच्या वेळी मुलगा विचार करतो , आपल्यालाही टेन्शन आहे तर पिऊन बघायची का ... पण धीर होत नाही . पण कॉलेजमध्ये गेल्यावर आधी सिगरेट मग त्यातून चरस वगैरे ओढून पाहण्याचे प्रयोग आणि पक्का नशेबाज होणं मग पुढे खूप प्रयत्नांनी व्यसनातून बाहेर पडणं अशी उदाहरणं अनिल अवचटांच्या मुक्तांगणबद्दलच्या पुस्तकात आहेत .

न पिणाऱ्यांची मुलं पितच नाहीत असं नाही पण आकडेवारी पाहिली तर ज्या घरी पिणारे वडील किंवा नातेवाईक असतात अशी मुलं दारू आणि इतर व्यसनांना ट्राय करून पाहण्याचं प्रमाण जास्त आहे असंही ते म्हणतात .

अलीकडे फेसबुकवर लिहित्या असणाऱ्या एका गृहस्थांना जबरदस्तीने उचलून मुक्तांगणमध्ये की दुसऱ्या कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रात नेल्याचं कळलं , हरहुन्नरी - बुद्धिमान मनुष्य , ह्यांनी लिहिलेलं वाचण्यासाठी यांना फेसबुकवर फॉलो करणारे काही हजार लोक होते .

धंद्यात खोट आल्याचं निमित्त झालं की यांचं पिणं वाढत गेलं , निर्णय चुकले आणि धंद्यात खोट आली माहीत नाही . असो , हेच सद्गृहस्थ वर्ष दोन वर्षांपूर्वी कौटुंबिक समुपदेशन वगैरे सुरू करण्याचा प्लॅन करत होते , आपण नुसते सल्ले देऊन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकू असा कॉन्फिडन्स यांना होता... पिण्या बिण्याच्या आधीन होणारे आपण नव्हे असाही कॉन्फिडन्स असेल कदाचित ..

तरीही पिणाऱ्यांना एकत्र येऊन त्यातल्या आनंदावर चर्चा करावीशी वाटली तर त्यावर बोलूच नका असं म्हणणंही त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं वाटतं . इथलं सुरेख लज्जतदार वगैरे वर्णन वाचून एखादा न पिणारा प्यायला लागेल आणि व्यसनी होईल अशी शक्यता फार नसावी .. उद्या एखाद्या चरस कोकेन मर्यादेत घेणाऱ्याने त्याच्या लज्जतीचा आणि येणाऱ्या अवर्णनीय आनंदाचं वर्णन करणारा धागा काढला तर दारू पिण्याच्या लज्जतीचं वर्णन करणारे चिडतील की आपण हे ट्राय करून बघितलं पाहिजे एकदा तरी असं त्यांना वाटेल ? देवच जाणे .

Submitted by radhanisha on 26 May, 2023 - 09:58
अवचट यांच्या मुक्तांगणची गोष्ट या पुस्तकातून -

आणखी एक घटक राहिलाच. मुलं. त्यांच्यावर तर वडलांच्या व्यसनाचा सर्वांत वाईट परिणाम होत असावा. बायकोला कसं, त्रास आहे, पण तो माहेरच्यांशी, मित्र-मैत्रिणींशी बोलता येतो. त्याचं ओझं कमी होऊ शकतं. इथं ही मुले म्हणजे मुके प्राणी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यांच्याकडे बघूनच पोर आपली वाढ करून घेत असते. एक वेळ वडील नसते तरी ते बरं वाढलं असतं. पण दारू पिऊन घराबाहेर धिंगाणा करणारे, हात उगारणारे, मारणारे वडील...त्या पोराच्या कोवळ्या मनाचा कसा कुस्करा होत असेल!
अशा मुलांसाठी काही तरी करायचं ठरवलं.

एरवी बायकांशी बोलता येतं, त्यांचं कौन्सेलिंग करता येतं. पण मुलांच्या बाबतीत? ते शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत. ते बोलून मोकळे होऊ शकत नाहीत. सोसावं तर लागतं, तेही सतत. काहींच्या मनावर उमटलेले ओरखडे जन्मभर त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन राहतात.

आम्ही पेशंट मित्रांच्या मुलांबरोबर बोलायचा प्रयत्न करू पाहत होतो. पण जे भोगलेलं, दुःसह असं काही बोलणं त्यांच्या त्या कोवळ्या मनाला झेपेल का? की मोकळं होण्याऐवजी जास्त मोडतोड, नुकसान होईल? एक मुलगा एवढंच म्हणाला होता, “मला शेजारच्यांसारखं घर का नाही मिळालं?” या एका वाक्यात त्याच्या जीवनाचं जसं दाहक सत्यच सामावलेलं. तो त्याच्या वडिलांविरुद्ध बोलू शकत नव्हता. त्या असुरक्षित भयानक रात्रींविषयी बोलायला त्याच्याकडे शब्द नव्हते. पण त्याला जाणवत होतं, जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा शेजारच्यांकडे वेगळं आहे. आपल्याकडचं जे आहे ते असंच असायला हवं असं काही नाही. मग त्याला दिसतं ते शेजार्‍यांचं घर. त्याला हेवाही वाटत असेल त्या घरातल्या मुलांचा. ती मुलं याला खेळायला घेत असतील का? की कधी याच्या मर्माला टोचत असतील? कोण जाणे!

पहिली काही वर्षे पु. ल., सुनीताबाई मुक्तांगणच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला नेहमी यायचे. बरोबर मुख्यमंत्री शरद पवारांनाही घेऊन आलेले. त्या कार्यक्रमात एका पेशंट मित्राची छोटी मुलगी बोलली. काय बोलली ती? केवढं शहाणपण! जेमतेम दहा-बारा वर्षांची पोर ती. तिनं ‘पूर्वी आणि आता’ अशी दृश्येच उभी केली. “पूर्वी बाबांच्या व्यसनाच्या काळात मैत्रिणींना घरी बोलावू शकत नसे. आता सगळ्या आमच्याच घरी असतात. खेळायला, अभ्यास करायलाही. पूर्वी बाबा घरी येणार याची भीती वाटायची. आल्यावर काय काय होईल याची कल्पना नसायची. आता बाबांची मी वाट पाहत असते.” एवढं सांगून तिने समोर बसलेल्या आमच्या मित्रांना सांगितलं, “तुम्ही पीत असता तेव्हा तुम्हाला घरचे लोक टाकून बोलतात. तुम्हाला वाटत असेल, घरच्यांना तुम्ही आवडत नाही. पण सगळ्या काकांनो, खरं सांगू? तुम्ही आम्हाला हवे असता...”

ऐकताना पु.लं.चे डोळे डबडबले. त्या वेळच्या व्हिडिओमध्येसुद्धा ते आले आहे. नंतरही म्हणत होते, “काय रे, किती लहान पोर ती! किती शहाण्यासारखं बोलली! काय तिचा गुन्हा रे?” शरद पवार एवढे जाड त्वचेचे राजकारणी, पण तेही हलले. मला नंतर ना. धों. महानोर सांगत होते, “पुढे २-३ दिवस मी पवारसाहेबांबरोबर होतो. प्रत्येक सभेत त्यांनी त्या मुलीचं उदाहरण दिलं. आपल्या पोरांवर अशी वेळ आणू नका, असं वारंवार सांगत होते.”

__________

दारू लीगल आहे यात सरकारला लोकांचं व्यक्तीस्वातंत्र्य जपायचं आहे हे कारण नाही तर महसूल हे कारण आहे . सर्वोच्च न्यायालयाने रमी ह्या खेळातील यश हे लक ( नशिबावर ) अवलंबून नसून स्किल्स वर अवलंबून आहे , त्यामुळे तो जुगार नाही त्यावर बंदी घालता येणार नाही , असा निर्णय दिला आहे त्यामुळे ऑनलाइन रमी ही कायदेशीर आहे .

थोडा शोध घेतला तर ऑनलाइन रमी मुळे झालेल्या कर्जातून आत्महत्येच्या बातम्या सहज सापडतात . पण सरकारला फक्त कराशी देणंघेणं आहे , आपले नागरिक मरेनात का तिकडे ... अजून अफूदी ड्रग कायदेशीर करत नाहीत , तेही लोक रोषाच्या भीतीपोटी नाहीतर तेही करायला त्यांनी मागेपुढे पाहिलं नसतं . स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण हाच एक मार्ग आहे . कोणत्याही व्यसनाच्या बाबतीत . केवळ स्वतःसाठी नाही , आजूबाजूच्या लोकांना , आपल्या मुलांना एक आदर्श घालून देण्यासाठी . असो , शेवटी ज्याचं त्याचं आयुष्य आहे , प्रौढ , सुशिक्षित , सुविद्य लोक आहेत .. आपल्याला कोणाला फुकटचे सल्ले देण्याचा काय अधिकार आहे !

Submitted by radhanisha on 26 May, 2023 - 10:13

राधानिशा यांच्या पोस्ट आवडल्या म्हणून ईथे कॉपीपेस्ट केल्या.

आजच्या काळात पालक फार जागरूक झालेत. आपल्या मुलांचे योग्य संगोपन कसे होईल याचा ते विचार करू लागलेत. मुलांना मारावे की फक्त ओरडावे की आणखी कसे समजवावे? त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास व्हावा म्हणून त्यांना कुठल्या ॲक्टीव्हिटीजना टाकावे? मुले आपले अनुकरण करतात तर आपणही त्यांच्यासमोर कसे वागावे? मुलांचे मन कसे समजून घ्यावे यासाठी चाईल्ड सायकॉलॉजीही जाणून घेण्यात रस दाखवतात....

पण तेच पालक या बाबतीत मात्र चलता है असा सोयीचा विचार करतात हे बघून खेद वाटतो.

वरच्या पोस्टमध्ये जे किस्से आहेत तसे काही छे आपल्या घरात घडणार नाही असे जर आपल्याला वाटत असेल तर तो आपला फाजील आत्मविश्वास आहे. किंवा आपली सोय बघून केलेला स्वार्थी विचार आहे.

एखादी गोष्ट वाईट आहे आणि आपले आईवडील ते करत नाहीत किंवा त्याला वाईट समजतात
ह्याचा इफेक्ट मुलांच्या मनावर जास्त खोलवर होतो कदाचित यालाच संस्कार म्हणतात

पहिल्यांदा घेण्याची जेंव्हा वेळ येते, हीच मुले किमान तीनचार वेळा तरी फक्त चाखणा खाऊन माघारी येतात आणि हे मोहाचे क्षण टाळले गेल्यामळे ५०% तरी कधीच घेत नाहीत.

आपल्या भारतीय समाजात व्यसनाचे प्रमाण वाढते असूनही अजूनही पाश्चात्य समाजापेक्षा कमी आहे त्याचे कारण हे असू शकते !

चोरटा व्यापार,बिल च न बनवणे, बेकायदेशीर विक्री ह्या मुळे रोज भारतात किती ltr दारू लागते ह्याचे खरे आकडे बाहेर येत नसावे त.
बाकी भारतात पण दारू पिणाऱ्या लोकांची संख्या खूप प्रचंड आहे.
लहान वयात दारू ,सिगारेट ह्याचे व्यसन असण्याचे प्रमाण पण प्रचंड आहे

न पिणाऱ्यांची मुलं पितच नाहीत असं नाही पण आकडेवारी पाहिली तर ज्या घरी पिणारे वडील किंवा नातेवाईक असतात अशी मुलं दारू आणि इतर व्यसनांना ट्राय करून पाहण्याचं प्रमाण जास्त आहे असंही ते म्हणतात . >>>>दारू पिणाऱ्या बापाच्या घरी मुली पण असतात ना मग त्या सुद्धा पितात का ? एक इन जनरल प्रश्न।

दारू पिणाऱ्या बापाच्या घरी मुली पण असतात ना मग त्या सुद्धा पितात का ?
>>>

खूप छान मुद्दा.

व्यसनाबाबत ईनजनरलच मुलींना वेगळे नियम वेगळे निकष असतात. मुलांनी व्यसने केलेली जितके नॉर्मल समजले जाते तितके मुलींबाबत समजले जात नाही. त्यामुळे व्यसनेच्छुक मुलींना व्यसनाकडे वळणे तितके सोपे नसते. जरी यात त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य मरत असले तरी एका अर्थी हे त्यांच्या भल्याचेच होते असेही म्हणू शकतो.

याच लाईनवर असे म्हणून शकतो की ज्या मुलांच्या घरात घरीच दारू प्राशन होते त्या घरातील मुलांना या व्यसनाकडे वळणे तुलनेत सोपे होते.

आता आपणच ठरवायचे आहे की आपल्याला मुलांना ही वाट सोपी करून द्यायची आहे की अवघड

वाईट

हे असे काही नसते.
अगदी शुध्द शाकाहारी रोज देव पूजा करणाऱ्या daru काय नॉन veg पण ग्रहण न करणारा बाप असला तरी त्याचा मुलगा पक्का दारुडा होवू शकतो.
आणि पक्का दारुडा बाप असला तरी मुल निर व्यवस्नी असू शकतात.
मुली व्यसन करत नाहीत ह्या भ्रमात राहू नका.
मुलींना जास्त सज्जन समजू नका त्या व्यसन करू लागल्या की पुरुषांच्या पुढे दोन पावले असतात.
शहरात सहज दारू पिणाऱ्या मुली दिसतात.

संस्कार म्हणजे काय असते?
पक्का व्यसनी माणूस पण मुलांना दारू पिण्यास प्रोत्साहन देत नाही.
उलट मुलांनी व्यसन करू नये असेच त्याचे मत असते.
संस्कार म्हणजे काय असते ते.
तसा काही प्रकार एका वाक्यात सांगता येणार nasto.
अनेक सवयी मिळून संस्कार तयार होतात.
१) पैशाची किंमत मुलांना कळलीच पाहिजे.
हल्ली आई वडील कमावते अस्तातात पैसे बर्या पैकी घरात असतात
एकलुती एक मुल असतात.
वाटेल तितका पैसा त्यांना दिला जातो.
फालतू सवयी साठी पालक च पैसे पुरवतात.
हॉटेलिंग,मोबाईल,गाड्या ह्या मुलांना कमी वयात पुरवल्या जातात
त्या मुळे ह्या मुलांना पैशाची किंमत नसते.
१००० रुपयाचा पिझ्झा मागवून फक्त रंग पसंत नाही म्हणून पण ही मुल तो कचऱ्यात टाकू शकतात.
जे एक उदाहरण .
अशा अनेक फालतू सवयी मुलणा लागतात.
मग व्यसन लागायला जास्त वेळ लागत नाही.

व्यसनी व्यक्ती म्हणजे काय?
जो सकाळी झोपेतून उठला की दारू पितो आणि रात्री झोपी जाये पर्यंत दारू पीत च असतो.
अशा लोकांची संख्या दारू पिणाऱ्या लोकांच्या संख्ये च्या प्रमाणात खूप कमी आहे.

दारु पिणारा प्रतेक व्यक्ती मुलांसमोर दारू पीत नाही.
ऋनमेष हा फरक समजून घे

Pages