घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2015 - 15:21

..

या शनिवारची ऑफिसमधील चर्चा!

मद्यप्राशनाचा विषय निघाला, कोण किती पिते आणि घरी आपल्या बायकांच्या आपल्या या व्यसनाबद्दल काय रिअ‍ॅक्शन असते वगैरे..

एक विवाहीत महिला सहकर्मचारी, जी माझी एक चांगली मैत्रीण देखील आहे, जिला दोन लहान मुले आहेत, ती मोठ्या कौतुकाने सांगू लागली,
"आमच्या यांना मी घरातच पिण्याची परवानगी देते. सोबत चकणा म्हणून मस्तपैकी त्यांच्या आवडीची कांदाभजी करून देते. जवळच्या मित्रांची मैफिल जमवायची परवानगीही दिली आहे. त्यामुळे बाहेरून पिऊन येत नाहीत. उगाच आपण बंधने टाकली तर पिणे वाढतेच.. वगैरे वगैरे .. वगैरे वगैरे.."

आणखी एकदोघांनी या पद्धतीला संमती दिली आणि पहिलाच विचार माझ्या मनात आला तो असा,. मुलांसमोर पिणे कसे चालते?? त्यांच्यावर चुकीचा परीणाम नाही का होणार, त्यांना चुकीचा संदेश नाही का जाणार??

आणि मी तसे तिला सर्वांसमक्ष बोलूनही दाखवले..
तसेच माझ्यासाठी हा धक्काच असल्याने आणि मला हे व्यक्तीश: जराही न पटल्याने माझ्या बोलण्याचा टोनही किंचित निषेध व्यक्त केल्यासारखा वा जाब विचारल्यासारखा जरा कडकच होता.

त्यामुळे ती बावरली, समर्थन देणारेही पटकन काही बोलले नाहीत, पण मग तिने सारवासारव सुरू केली,...

१) मुलांना काही समजत नाही !

माझे उत्तर - कमाल आहे, इतरवेळी तुम्हा सर्वांची मोठ्या कौतुकाने चर्चा चालू असते की आमच्या मुलांना लहान वयातच हे समजते आणि ते समजते, नव्हे आजची पुर्ण जनरेशनच स्मार्ट आहे, वगैरे वगैरे गप्पा असतात. तर मग नेमके हेच का समजत नाही? ते तसे तुमच्या सोयीचे आहे म्हणून? थोडक्यात तुम्ही स्वताला डिफेंन्ड करत आहात.

२) तसेही हि आताची पिढी मॉडर्न आहे. पुढे जाऊन आणखी काय कशी होणार, हे आपण काय सांगणार !

माझे उत्तर - दारू पिणे आणि आधुनिकता यांचा काहीही संबंध नाही, मद्यप्राशन पुरातन काळापासून चालत आले आहे आणि ते वाईटच समजले गेले आहे. तुझ्या नवर्‍यालाही कबूल असणार की दारू हि वाईटच आहे, त्यामुळे पित असला तरी त्याचा अतिरेक तरी तो टाळतच असणार. पण लहान वयातच मुलाच्या मनावर बिंबले की दारू म्हणजे काही वाईट वगैरे नसते, बरेच जण पितात, आपले बाबाही पितात, बस्स काही जणांना तिची चव वगैरे आवडत नसल्याने पित नाही इतकेच. तर मग ते सहजपणे वाहावत नाही का जाणार? पण याउलट मन संस्कारक्षम असेल तर त्याला मर्यादा तरी राहतील.

३) जे पित नाहीत त्यांना (म्हणजे इथे मला) दारू म्हणजे खूप वाईट वगैरे आहे असे वाटते. त्यामुळे असे विचार आहेत तुझे. तसेही रोज रोज नाही पित, दर आठवड्यालाही नाही पित, ओकेजनली ड्रिंक घेतो.

माझे उत्तर - तो काय किती पितो ते तुलाच ठाऊक, आणि किती वेळा हे घडल्याने मुलांवर चुकीचे संस्कार होणार हे देखील तूच ठरव. पण आम्ही रोज रोज नाही पित, ओकेजनली घेतो, वा आम्ही बेवडे नसून लिमिटमध्येच पिणारे आहोत हा सर्रास सर्वच मद्यपींचा युक्तीवाद असतो. पण तो आपल्या नवर्‍याला डिफेंड करायला तू करत आहेस हे मात्र खूप चूकीचे आहे.

४) निदान बाहेरून ढोसून घरी येण्यापेक्षा घरीच पिणे चांगले नाही का?

माझे उत्तर - अच्छा, मग त्याने बाहेर ऑफिस आणि मित्रांच्या पार्ट्या मध्ये पिणे सोडले आहे का? अर्थात नाहीच! म्हणजे ते देखील ओकेजनली चालूच आहे, तर ज्या कारणासाठी तू घरी पिण्याची परवानगी दिली आहेस असे तू सांगत होतीस ते कारणही तसेच आहे.

५) पण तुला काय त्रास होत आहे? आमचे आम्ही बघून घेऊ ..
(माझ्या वरच्या एकाही उत्तराला प्रत्युत्तर करता न आल्याने मला थेट चर्चेतूनच तोडून टाकायचा प्रयत्न झाला, पण मी एकदा सुरू झालो की माझे मला स्वत:लाही थांबवता येत नाही)

मी म्हणालो - प्रश्न तुझ्याच मुलांचा नाही. तू जसे हे कौतुकाने सांगत आहेस ते ऐकून इथले इतरही पालक प्रभावित होतील. प्रश्न समाजाचाही आहे. त्यात कुठलीही चुकीची विचारसरणी रुजली नाही पाहिजे. उद्या माझी मुलेही याच समाजात वाढणार आहेत, त्यामुळे मला बोलायचा हक्क आहेच..

या शेवटच्या काही वाक्यांना माझा आवाज नकळत उपदेश करत असल्यासारखा गंभीर होत त्याला एक धार आली... आणि... तिचा बांध फुटला!
तिला डोळे टिपताना पाहून मलाही माझी चूक माझ्या ध्यानात आली. जोशमध्ये जरा जास्तच बोलून गेलो होतो. नेहमी तिची मस्करी मस्करीत थट्टा करायचो पण यावेळी अचानक सिरीअसच झालो, वा तसा आव तरी आणला. सर्वांसमोर तिच्या खाजगी बाबींवर उगीच वाद घातला.

असो,
ते प्रकरण तात्काळ माफी मागत मिटवून टाकले. दुपारी आम्ही जेवायलाही बाहेर जाऊन आलो. भांडणे आणि पुन्हा एक होणे माझ्या नजीकच्या लोकांसाठी नवीन नाही. तर ते सोडा..

पण यावरूनच हा प्रश्न इथे घेऊन आणायचे सुचले ! इथे मात्र आधीच माफी मागत सांगतो, जे असे करतात त्यांना धारेवर धरायचा हेतू नाही. बस यावर आपले विचार जाणून घ्यायचे आहेत. काही वेगळे द्रुष्टीकोनही समजतील, पटले तर स्विकारले जातील.

तर शिर्षक हाच एक प्रश्न - पुन्हा एकदा लिहितो - घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती , सुमुक्ता +१

नातेवाईकांत दारूच्या व्यसानापायी उध्वस्त झालेल एक कुटुंब पाहिलेल आहे . तेव्हापासून दारु नामक प्रकार डोक्यात गेलाय . Angry

इब्लुशा. मायबोलीवर सुद्धा १०० क्लब , ५०० क्लब असे धागे सुरु झाले का?

सुरु बाईम्चा पहिलाच धागा डीडीएल़्जे च्या क्लबात गेला हे आक्रीतच ना १

कमीत कमी वेळात सगळ्यात जास्त धागे काढणारा मायबोलीकर म्हणून ऋन्मेऽऽष ला एक दारूचा प्याला
( अर्थातच रिकामा जो त्याने कधीही भरू नये ) भेट द्यावा का ?

ऋन्मेष च्या विषयाशी मिळते-जुळते विषय घेउन ऋन्मेष ची copy करनारे आयडी पण आहेत की.

जगाच्या ठाण्या, दुकानदारान्च्या लाभी
देह पोखरिती रात्रन्दिनी....

कल्याण ऐवजी ठाणे हा बदल केलाय.

नातेवाईकांत दारूच्या व्यसानापायी उध्वस्त झालेल एक कुटुंब पाहिलेल आहे .
>>>>>>>>>>
फक्त एक!
नशीबवान आहात,
नातेवाईकांत, मित्रपरीवारात कित्येक आयुष्य उध्वस्त होताना पाहिलेत. चांगल्या मित्राचे ग्रूप फुटलेले पाहिलेत, मारामार्‍या अनुभवल्यात.
याउलट दारू पिऊन भले मात्र कोणाचे झालेले पाहिले नाही.

ऋन्मेऽऽष,

>> याउलट दारू पिऊन भले मात्र कोणाचे झालेले पाहिले नाही.

काय सांगता? लोकांनी भरपूर दारू प्यायली की गुत्तेवाल्याचं भलं होतं की!

आ.न.,
-गा.पै.

नाही हो गापै,
लोकांचे शिव्याशाप आणि तळतळाट लागतातच,
गुत्तेवाल्याची पोरेही बेवडे होण्याचे फुल्ल चान्सेस असतात,
बदनामी तर व्यवसायाला चिकटलेली असतेच,
गुत्तेवाल्यांना गावातील बायकांनी मिळून चोप दिल्याच्या बातम्याही अधूनमधून पेपरात येतात,
या पोलचा निकाल बघता, दारू म्हणजे वाईट समजणारा एवढा मोठा समाज असता गुत्तेवाल्यांना समाजात उजळ माथ्याने फिरणेही जरा कठीणच,
यांच्या पोरांची लग्ने जमणेही कठीणच असते..

टोचा, कबूल केलेप्रमाणे आज दोन दिवसांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो. स्विकारावीत. पटली तर लाईक जरूर ठोका Happy

ऋन्मेऽऽष - तुमची गर्लफ्रेंड गायब आहे ह्या लेखातुन. तिचे काय मत आहे ह्या बद्दल? तिचे एकुणच दारु पिण्याबद्दल काय मत आहे?
>>>>>>
तिला माझ्या निर्व्यसनी असण्याचे फार कौतुक आहे. जेव्हा माझी माझ्या मित्रांबरोबर पार्टी असते आणि त्यात पिण्याचा प्रोग्राम असतो तेव्हा मला चुकूनही बहकून पिऊ नकोस असे बजावत असते.

तुमच्या इतक्या नजिक ची मैत्रिण असुन सुद्धा तिच्या नवर्‍याच्या घरी पिण्या बद्दल तुमच्यात आधी कधीच काही बोलणे का झाले नव्हते.
>>>>>
तिचा नवरा पितो हे माहीत होते. पण घरी पितो हे माहीत नव्हते. तसेच या गोष्टीचे ती समर्थन करते हे मुळीच माहीती नव्हते. हे जास्त खटकले.

तुम्ही दरवेळेला नजिक च्या लोकांना उपदेशाचे ढोस पाजता का?
>>>>>
हो.
नजीकच्या माणसांचे भले व्हावे हि इच्छा माझी नेहमीच असते.
परक्यांनाही पाजू शकतो, पण ते त्यांनी सकारात्मक नाही घेतले तर परीणाम उलट होऊ शकतो आणि मला सर्वांचे चांगलेच झालेले आवडते.

तुमची मैत्रिणी बरोबरची नजिकता तिच्या नवर्‍याचे दारु पिण्याचे कारण आहे का?
>>>>>
तसे नक्कीच नसावे, कारण माझ्या माहितीप्रमाणे आमच्या मैत्री वा ओळखी अगोदरपासूनचे त्याचे व्यसन आहे.

पुढचा लेख तुम्ही स्त्री आणि पुरुष कलिग मधे कीती नजिकता असावी असा काढणार आहात का? आणी असाल तर पोल कसा असेल?
>>>>>>
तुमच्या या प्रश्नांना उत्तर द्यायला दोन दिवस उशीर केला आणि तेवढ्यात माझे दोन धागे निघाले. ते धागे म्हणजेच आपल्या प्रश्नाचे उत्तर.

मात्र आपण सुचवलेला विषय चांगला आहे. कारण माझ्या आणि माझ्या मैत्रीणीमधील निखळ मैत्रीच्या संबंधांबद्दल आपण वर जे प्रश्न उत्पन्न केलेत ते पाहता आजचा समाज कामानिमित्त एकत्र येत निर्माण होणार्‍या स्त्री-पुरुष मैत्रीच्या नात्याबद्दल नेमका कसा विचार करतो हे जाणून घ्यायचा मोह उत्पन्न झाला आहे. सवडीने धागा टाकेनच. सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

भारी रे ऋन्मेष!
सगळी उत्तरे आवडली.
ज्या शांत आणि समंजसपणे दिली आहेस ते पाहता आता आम्हाला तुझ्याकडे क्लास लावायला यावे लागणार.
Wink

घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
बरोबर

घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ?
चूक

हंगामा है क्यों बरपा, थोडीसी जो पिली है
डाका तो नही डाला, चोरी तो नही की है
हंगामा है,,,......

असं पिणारे म्हणतील, मी नाही.:फिदी::दिवा:

सहज गाणे आठवले म्हणून लिहीले, कृ.ग़ै. न.

दारूचे उदात्तीकरण करणारे शेरो-शायरी-गझल-कथांवर पहिला बंदी आणायला हवी.. लोक उगाच रसिक बनायला बघतात.

बाळ ऋन्मेष, ते मी गम्मत म्हणून लिहीलेय, मी घेत नाही. बाय द वे, तुझ्या लाडक्या शाखानेच एक दारुची जाहीरात केलीय, जमल्यास त्याला मेल करुन बघ.

धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल ़ ़ मी व नवरा दोघेहि घेत नाहि ़घेणार्यांबद्दल माला काहिच म्हणायच नाहिये पण हल्ली घेणार्यांनाच माझ्याबद्दल प्राॅब्लेम आहे ़ माझे मित्र मैत्रिणी कलिग्ज नातेवाईक सर्व जण बायकांसकट घेतात व आम्हि अमेरिकेत असुन पण किती मागासलेले आहोत हे ऐकवतात ़ Sad मला वाटायला लागले होते कि जगात फक्त आम्हिच न पिणारे उरलो आहोत ़

रश्मीताई तुमची आणि त्या वरची आणखी एक कवितेची पोस्ट फक्त निमित्तमात्र, तुम्हाला उद्देशून असे नव्हते Happy

बाकी शाहरूखने दारूची जाहिरात करणे चांगलेयच की, तो न आवडणारेच जास्त असल्याने त्या जाहिरातीचा उलटा इफेक्ट होऊन लोक पिणे बंद करतील.. Happy

ईनोची,
हे असे न पिणार्‍या मुलांबाबतही होते. खास करून माझ्यासारखे ज्याचे फ्रेंडसर्कल टवाळ असते ते न पिणार्‍याला दूध पिणारा बच्चा म्हणून हिणवायला बघतात. अर्थात सारेच असे नसतात ती गोष्ट वेगळी.
पण असो, अश्यांसमोर दबते न घेता आपण निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगावा, आणि तो त्यांना बोलून वा देहबोलीतून दाखवावा. त्यांनाही अखेर मनोमन काय चांगले आणि काय वाईट हे ठाऊक असतेच.

घरात मुलांसमोर मद्य प्राशन केले काय किंवा बाहेर केले काय मुळात तुम्ही मद्य का घेता, घेण्याचा पॅटर्न, हॅन्गओवर वगैरे कसे हाताळता, जोडीदाराशी मद्य घेण्यावरुन भांडण होते का? मद्य पिऊन वाहन चालवणे वगैरे बर्‍याच गोष्टींचा परीणाम मुलांवर होतो. आम्ही मुलांसमोर मद्य घेत नाही असे म्हणून जबाबदारी संपत नाही. ८-९ वर्षाच्या मुलांना जरी पालकांचे प्रत्यक्ष मद्य पिणे दिसत नसले तरी त्यासंबंधी इतर वर्तन दिसत असतेच, प्रश्न पडतातच. त्यापेक्षा सर्वच पालकांनी स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे बद्दल ८-९ वर्षापासुन मुलांशी सातत्याने संवाद ठेवल्यास सकारात्मक परीणाम होतो.

अवांतर : मुलांसमोर सिगरेट ओढणारे आणि मुलांना सेकंड हँड स्मोकची भेट देणारे पालक जेव्हा आम्ही मुलांसमोर पित नाही असे सांगतात तेव्हा हसावे की रडावे ते कळत नाही.

दबते न घेता आपण निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगावा, आणि तो त्यांना बोलून वा देहबोलीतून दाखवावा. त्यांनाही अखेर मनोमन काय चांगले आणि काय वाईट हे ठाऊक असतेच. >> +१

अवांतर :

रिया : टेक्स्टच्या आधी < center > विदाऊट स्पेस
आणि नंतर < /center > विदाऊट स्पेस असं टाक

उदा:< center>ड्रिमगर्ल < /center> (स्पेस काढ)

ड्रिमगर्ल

.

दारु परवडते त्यांनी प्या ज्यांना नाही परवडत त्यांनी नका पिउ

इथे आता चाचणी सुरु आहे Rofl आता हे शोधा

सेकंड हँड स्मोक म्हणजे काय स्वाती२?
>>>
पासिव स्मोकिंगला सेकंड हेन्ड स्मोक असेही म्हणतात Happy

पासिव स्मोकींग हा शब्द माहीत असेलच, म्हणजे माझा मित्र सिगारेट ओढतोय आणि नाईलाजाने तो सोडणारा धूर श्वासोच्छवासामार्फत मलाही गिळावा लागतोय Sad

;

मी व नवरा दोघेहि घेत नाहि ़घेणार्यांबद्दल माला काहिच म्हणायच नाहिये पण हल्ली घेणार्यांनाच माझ्याबद्दल प्राॅब्लेम आहे ़ माझे मित्र मैत्रिणी कलिग्ज नातेवाईक सर्व जण बायकांसकट घेतात व आम्हि अमेरिकेत असुन पण किती मागासलेले आहोत हे ऐकवतात

------ तुमच्या न घेण्याच्या निर्णयावर ठाम रहा.
घेण्याचा आणि प्रगत असण्याचा सम्बन्ध असेल तर पिल्यावर नाल्यात लोळणारे लोक जास्तच प्रगत म्हणायला हवे.

>>मी व नवरा दोघेहि घेत नाहि ़घेणार्यांबद्दल माला काहिच म्हणायच नाहिये पण हल्ली घेणार्यांनाच माझ्याबद्दल प्राॅब्लेम आहे ़ माझे मित्र मैत्रिणी कलिग्ज नातेवाईक सर्व जण बायकांसकट घेतात व आम्हि अमेरिकेत असुन पण किती मागासलेले आहोत हे ऐकवतात>>

अमेरिकेत मद्य घेणे शिष्ठ संमंत आहे याचा अर्थ सरसकट सगळे घेतात आणि असे न करणे म्हणजे मागासपणा असा सोइस्कर अर्थ लावून हसणारे देशी मलाही भेटले. अशा लोकांना मी स्पष्टच सांगते- ' मद्य पिणे शिष्ठ संमंत असलेल्या कुटुंबात मी वाढलेय. माझ्यासाठी मद्य ही नविन गोष्ट नाही. मद्य न घेणे हा माझा स्वतःचा चॉइस आहे. मद्य घेत नाही म्हणून हसणे, घेण्यासाठी आग्रह करणे शिष्ठाचाराला धरुन नाही. अल्कोहोलिक ड्रिंक्सच्या जोडीला नॉन अल्कोहोलिक ड्रिक्सची सोय करणे आणि आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या चॉइस नुसार पेय देणे हा शिष्ठाचार आहे. अमेरीकन घरातील पार्टीलाही हा शिष्ठाचार पाळतात. ' मंडळी वरमतात.

न पिणारी मंडळी खूप असली आणि पिणारे अल्पसंख्येत की भयानक प्रकार सुरू असतो.
पिणारी मंडळी अर्ध्या घोटातच फुल्ल टाइट होऊन माकडचाळे सुरु करणार अशी काहीतरी यांची समजूत असते. आणि मग तुम्ही पहिला घोट घेऊन ग्लास खाली आणताय तोच हे सगळे लोक आता हा/ ही काय गंमत करणार अश्याप्रकारे तुमच्याकडे बघत असतात.
नंतर मग तुम्ही तुमच्या नेहमीच्याच पद्धतीने जोक मारला/ प्रश्न विचारला वगैरे तरी हे लोक एकमेकांकडे बघून ’चढलीये हां!’ अश्या प्रकारचे हसून तुमच्याकडे मनोरंजक वस्तूसारखे बघू लागतात. आणि आपल्याआपल्यातच काहीतरी मंद विनोद करून तुमच्या पिण्यावर हसत बसतात.
हा निर्बुद्धपणा फार जास्त चालतो. एक ग्लास दोन तीन तास पुरवत पिणारा माणूस आणि १० मिनिटात क्वार्टर खल्लास करणारा माणूस यांच्यात फरक आहे हे समजायची क्षमताच नसते बहुतेक यांच्यात.

याच्या करता (मुलं समोर नसताना) डायरेक्ट क्वार्टर तोंडाला लावून १ मिन्टात रिकामी करायची, अन मग या न पिणार्‍यांची गम्मत पहायची ही आयडिया जास्त भारी आहे. मी असेच करतो. Wink

याच्या करता (मुलं समोर नसताना) डायरेक्ट क्वार्टर तोंडाला लावून १ मिन्टात रिकामी करायची, << रोगापेक्षा इलाज भयंकर असलं झालं हे प्रकरण.

नंतर मग तुम्ही तुमच्या नेहमीच्याच पद्धतीने जोक मारला/ प्रश्न विचारला वगैरे तरी हे लोक एकमेकांकडे बघून ’चढलीये हां!’ अश्या प्रकारचे हसून तुमच्याकडे मनोरंजक वस्तूसारखे बघू लागतात. आणि आपल्याआपल्यातच काहीतरी मंद विनोद करून तुमच्या पिण्यावर हसत बसतात.>>> सीरीयसली!!! त्यातही तुम्ही प्यायलात म्हणजे काहीही बोललात तरी ते "बरळणेच" अस्तं असा काहीतरी समज करून जे काय आचरट प्रकार घडतात ते अशक्य असतात.

>>>>नंतर मग तुम्ही तुमच्या नेहमीच्याच पद्धतीने जोक मारला/ प्रश्न विचारला वगैरे तरी हे लोक एकमेकांकडे बघून ’चढलीये हां!’ अश्या प्रकारचे हसून तुमच्याकडे मनोरंजक वस्तूसारखे बघू लागतात. आणि आपल्याआपल्यातच काहीतरी मंद विनोद करून तुमच्या पिण्यावर हसत बसतात.>>>
हे मी देखील पाहीले आहे. त्यात भर म्हणजे एका ठिकाणी होस्ट फॅमिलीतले सदस्यच आता गंमत बघ असे सांगून गैरसमज पसरवण्यात आघाडीवर होते. एकतर मद्य घेत नाही म्हणजे मागास किंवा मद्य घेतात म्हणजे व्य्सनी, आता मर्कटलीला बघा अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया पहायला मिळतात. आम्ही अशा पब्लिकला नवखे म्हणतो. पार्टी आहे, सगळे अ‍ॅडल्ट आहेत, आनंदाने खा-प्या, तर नाही. असे न तसे जज करत बसतात. फार कंताळवाणे असते. सध्याचा नवा ग्रुप छान आहे. सर्वांना सामावून घेणारा आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर असलं झालं हे प्रकरण.
<<
अहो, मुलांसमोर न पिण्याचं पुण्य, प्लस चिंग होण्याचं सुख. ते ही एका मिण्टात. और क्या चैय्ये भाई.
Wink ती पिवळी टिकली विनोददर्षी म्हणून टाकली आहे, हेवेसांनल.

रच्याकने, हा १००वा प्रतिसाद होता. Wink हबिणंडण!

Pages