प्लुटो चा घोळ

Submitted by Mandar Katre on 17 January, 2015 - 07:03

अगदी 21व्या शतकात देखील वैज्ञानिक अन शास्त्रज्ञांची गणिते अन कयासदेखील चुकू शकतात हे सिद्ध झाले . 7/8 वर्षापूर्वी प्लूटो या ग्रहाचा सूर्यमालिकेतील ग्रहाचा दर्जा रद्द करण्यात आला होता, त्यानुसार जगभरातील भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातून प्लूटो संबंधी माहिती वगळण्यात देखील आली, आणि कालच पुन्हा एकदा तो ग्रह असल्याचे सिद्ध झाले. आता मधल्या काळात चुकीचे विज्ञान शिकवले गेले त्याला जबाबदार कोण ?

http://time.com/3429938/pluto-planet-vote/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार, एखादे नक्षत्र ग्रह असायला तो सुर्याभोवती प्रदक्षिणा करत असायला हवा आणि दुसरे म्हणजे तो आकाराने त्रिमितीय गोल असायला हवा. प्लुटो सुर्याभोवती फिरतो आणि तो आकारानी चेंडूसारखा गोल आहे हे अजून सिद्ध झाले नाही तेंव्हा आपण मुलांना जे शिकवतो ते अजूनही योग्यच नाही का???!!!!!

चुभुदेघे!

Harvard scientists want Pluto to be a planet again - and if they get their way it could mean new school text books for everyone

Back in the game? Harvard-Smithsonian want Pluto to be a planet again
Scientists at Harvard University have argued that Pluto is, in fact, a planet, after being downgraded to the status of 'minor planet' by the IAU in 2006.

In a move that will have high school science teachers throughout the world worrying if they'll have to order ANOTHER new set of text books, the Harvard-Smithsonian Center for Astrophysicists have argued that the current classification is baffling (and they're an authority on the matter - geddit?!).

http://www.mirror.co.uk/news/world-news/pluto-planet-again-apparently---...

बी | 17 January, 2015 - 04:32 नवीन
मंदार, एखादे नक्षत्र ग्रह असायला तो सुर्याभोवती प्रदक्षिणा करत असायला हवा आणि दुसरे म्हणजे तो आकाराने त्रिमितीय गोल असायला हवा.
>>>

बी प्लुटो सुर्याभोवती फिरतो आणि तो जवळ जव्ळ त्रिमितिय गोलही आहे. माला आठवते त्याप्रमाणे त्याने कुइपर बेल्टचे इतर वस्तुमान दुर केले नाही या कारणास्तव त्याला ग्रहत्व नाकारले आहे. मला ते तसे योग्यच वाटले कारण प्लुटोचे वस्तुमान त्याच्या कक्षेत फिरणार्या इतर पदार्थाच्या १ % पण नाही यामुळे जर प्लुटो ग्रह झाला तर काही काळात मुलांना शम्भर एक ग्रह शाळेत लक्षात ठेवावे लागतील.

आता मधल्या काळात चुकीचे विज्ञान शिकवले गेले त्याला जबाबदार कोण ?
>>>>>>
यात चुकीचे वा बरोबरचे विज्ञान असे काही नाही, फक्त त्याला ग्रह बोलायचा की नाही एवढाच मुद्दा उलटपुलट होणार, बाकी प्लूटोचे सारे गुणधर्म तसेच राहणार.

उलट या घडामोडींनी ग्रह हि संकल्पना नक्की काय असते याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होत त्यांचे ज्ञानवर्धनच होईल.

बाकी तुम्ही ग्रह बोला किंवा नका बोलू, प्लुटोलाही काही फरक पडत नसावा Wink

नेपच्यूनच्या गतीवर परिणाम करतो म्हणून तो ग्रह आहेच.<<<

नेपच्यूनच्या गतीवर परिणाम करतो की नेपच्यूनची कक्षा(सुद्धा) भेदतो म्हणून?

माझ्या माहितीप्रमाणे नेपच्युनच्या कक्षेचे निरीक्षण करताना शास्त्रज्ञांना तिच्यात अनियमितता आढळली आणि त्यातुनच नेपच्युनच्या पुढे एखादा ग्रह असावा आणि त्याच्या गुरूत्विय बलामुळे नेपच्युनची कक्षा अशी अनियमित असावी असे अनुमान काढले गेले. पुढे प्लुटोचा शोध लागला, पण प्लुटोचे आकारमान, वस्तुमान आणि गुरूत्विय बल पाहता शास्त्रज्ञ चकित झाले. त्यांचे अनुमान एका मोठ्या ग्रहाचे होते पण प्लुटो त्यामानाने खुपच लहान होता.

अमेरिकेचे एक यान ह्यावर्षी साधारण जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत प्लुटो जवळ पोहचणार आहे. विशेषतः प्लुटो आणि त्याच्या चंद्राचे अवलोकन करण्यासाठीच ते पाठविण्यात आले आहे त्यावेळी प्लुटो बद्दल अधिक माहिती मिळेल.