चोराच्या उलट्या .....

Submitted by उडन खटोला on 16 January, 2015 - 02:47

माझ्या एका मित्राने ...मोबाईल चोरताना रंगेहाथ एका चोराला पकडला ट्रेन मध्ये, मग हिरो स्टाइल त्याला घेवून दोघे तिघे पोलिस स्टेशन मध्ये गेले .....अपेक्षा हि, कि आता त्याला ताबडतोब आत टाकतील आणि चोप चोप चोपतील.
ड्यूटी ऑफिसर शांत पणे म्हणाला, तुमच्या पैकी फिर्याद जर कोणी नोंदवली तरच आम्ही यावर कारवाई करू किंवा याला सोडून देवू ....कामाचा खाडा कोण करेल म्हणून बरोबरचे, निघून गेले.
मित्राचा ! स्वतःचा फोन असल्यामुळे आणि तो ही महागडा, त्याने सगळी कारवाई पूर्ण केली आणि साहेबांना विचारले, माझा फोन आता मी नेवू शकतो का ?
साहेब म्हणले ! येडा झाला का तू ....आता तो कोर्टात सादर करावा लागेल पुरावा म्हणून
तुला तुझा फोन हवा असेल तर, एफीडेवीट करून आण....
दुसर्या दिवशी वकिलाला ३०० रु देवून मित्र एफीडेवीट करून पोलिस स्टेशन मध्ये गेला मोबाईल आणायला.
हवालदार साहेब म्हणले ! साहेब तुमचा फोन घेवून लग्न निमित्त गावाला गेलेत, तुमचा लेटेस्ट पीस होता ना, साहेबाना खूप आवडला ४ दिवसांनी येवून घेवून जा .....
दरम्यान चोर महाशय, त्याच दिवशी जामिनावर सुटले असेही कळले आमच्या मित्रवर्यांना.............!

सन्दर्भ- विकास वडनेरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणूनच बहुधा पब्लिक अश्या लोकांना पोलिसांकडे न्यायचे सोडून स्वतःच हात धुवून घेतात आणि त्यांना बडवतात. Happy

(ह्यात चोराच्या उलट्या बोंबा काय आहे पण?)

साहेब तुमचा फोन घेवून लग्न निमित्त गावाला गेलेत, तुमचा लेटेस्ट पीस होता ना, साहेबाना खूप आवडला Lol

ह्यात चोराच्या उलट्या बोंबा काय आहे पण?
>>>
त्यांनी बोंबा कुठे म्हटलेय, फक्त उलट्या ... जेलचे जेवण पचले नसावे त्याला Wink

बाकी खरेच हे चोराचे उलट्या नसून चोर सोडून सन्याशालामधला प्रकार आहे.. Happy