श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सव, सनीवेल, कॅलिफोर्नीया अमेरिका

Submitted by सोनपरी on 15 January, 2015 - 23:57
ठिकाण/पत्ता: 
सनीवेल, कॅलिफोर्नीया

॥ गण गण गणात बोते ॥

श्री गजानन महाराज अमेरिका परिवारातर्फे श्री गजानन महारा़ज भव्य प्रगट दिन उत्सवाचे आयोजन केले आहे. हा उत्सव सनीवेल, कॅलिफोर्नीया येथे १४ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ साजरा केला जाईल. श्री गजानन महाराज परिवारातर्फे ह्या उत्सवाचे आपणा सर्वांना मनापासून निमंत्रण आहे. ह्या उत्सवाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे श्री महाराज पालखी सोहोळा, 'पादुका-दर्शन' (श्री पुंडलीक भोकरे ह्यांना दिलेल्या पादुकांची प्रतिकृती) आणी 'नामस्मरण सत्र'. उत्सवाची सांगता भंडार्‍याने होईल. बे एरीयातील भक्तगणांकडून जमवलेल्या 'शिध्यातून' महाप्रसाद रांधला जाणार आहे. बे एरीयात प्रथमच 'श्री महाराज प्रगट दिन' आयोजीत केला आहे. आपणा सर्वांच्या उत्साही आणी सक्रिय सहभागाने हा उत्सव यशस्वी आणी स्मरणीय होईल. कृपया खाली दिलेल्या दुव्यावर नाव नोंदणी करा.

RSVP LINK : http://tinyurl.com/gajanan2015

॥ जय गजानन ॥

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 14, 2015 - 13:00 to 17:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व श्री गजाननमहाराज भक्तांना श्री असे अनेक उत्सव करण्याची प्रेरणा देवोत ही प्रार्थना.

पुण्यातल्या सार्वजनीक पारायण सोहळ्यात ( ९ मे २०१० रमणबाग) येथे श्री शंकराचार्य उपस्थीत होते. यांनी दिलेला संदेश आठवतो आहे. ते म्हणाले श्री गजानन महाराजांनी आपल्या चरीत्रात उष्टे जेवल्याचा उल्लेख आहे. अन्न हे परब्रम्ह आहे. सार्वजनिक सोहळ्यातच काय महाराजांच्या भक्तांनी संपुर्ण आयुष्यात अन्नाची नासाडी टाळायला हवी.

हे आठवण्याचा उद्देश असा की जेथे जेथे महाराजांचा उत्सव होतो तिथे किंवा शेगावला सुध्दा याची काळजी घेतली जाते. तशी प्रेरणा सर्व भक्तांना महाराज सर्वकाळ देवोत.

मी मिडवेस्टमध्ये आहे..तिथे असते तर येऊ शकले असते.

असो. श्री गजानन महाराजांना प्रणाम आणि सोहळयाला शुभेच्छा. श्री गजानन विजय पोथी वाचणार आहात का कोणी?

॥ गण गण गणात बोते ॥ श्री गजानन महारा़ज प्रगट दिन उत्सव १४ फेब्रुवारी ला का करणार आहात. प्रगट दिन ११ फेब्रुवारी ला आहे ना.

॥ गण गण गणात बोते ॥ श्री गजानन महारा़ज प्रगट दिन उत्सव १४ फेब्रुवारी ला का करणार आहात. प्रगट दिन ११ फेब्रुवारी ला आहे ना.>> इथे (युएस मधे) सगळेच सणवार जर विकडेज मधे असतिल तर त्या सणानतर येणार्‍या किन्वा आधिच्या विकएन्डलाच साजरे होतात.स्पेशली जर तो मोठा सोहळा वैगरे असेल तर नक्किच!