सह्याद्रीतला सोबती ...

Submitted by वेडसह्याद्रीचे on 15 January, 2015 - 03:23

आपल्या ह्या धगधगत्या , राकट, कणखर सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून, कसलेल्या पायमोडी वाटेतून निवांत मुशाफिरी करताना , चढ उतार करताना , एक सोबत नक्कीच आपल्याला लाभते , लाभलीच असेलच तुम्हाला ?
ह्या सह्याद्रीत कुठे ना कुठे , कधी ना कधी , केंव्हा ना केंव्हा , किंव्हा प्रत्येक क्षणी हि म्हणा ट्रेक दरम्यान ...बिना कूच बोले ... कहे ...पीछे पीछे ..पीछे -पीछे ..मुकाट्याने ...

ओळखतं का ? कोण ते ?
शेपूट झुलवीत , जिभली बाहेर काढत पाठीमागून माग काढणारा ..

अहो..ओळखलंच असेलच एव्हाना... होय ना ?

अहो...माणसांची, आपल्या धन्याशी निष्ठेने वागणारा....असं आपण म्हणतोच कि ..

ओळखलंत ना 'पाळीव कुत्रा 'हो ( कुत्रा , ह्याला पर्यायी नाव सुचवा , एखाद, श्वान वगैरे अजून काही... )

ट्रेक दरम्यान ह्यांची भेट होतेच होते . नुसती भेट नाही, तर ते आपल्यासंगे डोंगर दरयांची चढ उतार हि अगदी उत्साहपूर्ण करतात. ओळख पालख नसूनही ..बिनधास्त अगदी ..

सिद्धगड- भीमा शंकर करतेवेळी असंच, गणेश घाटाने आम्हाला उतरायचं होत . त्यावेळेस मंदिराच्या येथूनच आम्हाला रामू भेटला (असं कुणी एखादं भेटला तर नामकरण तर होतंच होत. आम्ही त्यास रामू अस नामकरण करून मोकळे झालो. ) अन तो चक्क 'खांडस' गावा पर्यंत आम्हाला सोबत करत आला.

पुढचा प्रवास चारचाकी ने असल्याने तिथेच त्याला बाय बाय कराव लागलं. . पण त्या तेवढ्या वेळेत त्याने आमच्या हृदयी कप्यात जागा मिळवली होती. अन ती विरह संवेदना (प्राणी असला म्हणून काय झालं ) त्या वेळेस मनास नक्कीच छळत होती.

असंच कळसुबाई ह्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च शिखरावर चढ - उतार करतेवली तोच अनुभव आला. तिथे हि आम्हाला रामू भेटला (सिद्धगड -भीमाशंकर ट्रेकची , त्या रामूची आठवण म्हणून ह्याच हि नाव आम्ही रामू ठेवलं ) तो हि आम्हाला सोबत करत आला .
422031_365897070099876_1970130726_n.jpg

धोडप च्या किल्ल्यावर तर नुकताच जाउन आलो. तिथे हि तसाच प्रकार .
तिथे तर गोंडस लहानगं पिल्लूच होत ते , भुकेने व्याकूळ झालेलं. झाडीत बसून राहिलेलं .
त्याला पाठीवरल्या पाठ पिशवीतून काही बिस्कुट खाऊ घातली तर तो चक्क पाठी पाठीच येऊ लागला. धोडप माची पासून ते थेट हट्टी गावा पर्यंत. त्याने साथ दिली . त्याच नाव मी प्रेमाने सोनू ठेवलं .
वाटलं त्याला हि सोबत करून घरी आणावं. ..पण कसल..काय .. हो ..असो.

ट्रेक दरम्यान खेड्या पाड्यात , प्रेमाने ओतपोत जशी माणसं भेटतात तशी लळा लावणारी हि अशी मुकी प्राणी हि भेटतात.
त्यांना कधी सोबत हवी असते. इकडून तिंकडे जाण्यासाठी तर कधी आपल्या प्रेमापोटी हि ते आपल्या सोबत ,मागे येऊ लागतात.

सह्याद्रीत अश्या बरयाच गोष्टी आहेत. ज्याचा लळा अन गोडी न लागो तर नवलच ...

तुम्हाला हि आलाच असेल असा अनुभव, असेल तर शेअर करा.

संकेत पाटेकर
http://sanketpatekar.blogspot.in/2015/01/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे एक विलक्षण प्रकरण आहे सह्याद्रीमधले. सर्वांनाच हा अनूभव येतो. आपल्याला काही खायला मिळेल ही साधी अपेक्षा श्वानाची असली तरी त्याकरिता मैल अन मैल सोबतीला यायचे हे पटत नाही.

मी माझ्या सप्तशिवपदस्पर्श मालिकेमध्ये लिहिल्याप्रमाणे एक श्वान तब्बल ७ दिवस आमच्या बरोबर होता. राजगड ते रायगड. शेवटी आम्हाला त्याला सोडावे लागले त्याने आमची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. Sad