गारूड

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 January, 2015 - 14:27

उद्विग्न आठवांनो ताणू नकात धागे
सच्छिद्र काळजाचे नाजूक फार तागे

शोधू कुठे विसावा धावू किती नि कुठवर
आधीच पाय तुटका त्यातून वाघ मागे

भर तापल्या दुपारी हा किलबिलाट कसला
पक्षी उडून गेले वणवा उरात जागे

अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे
प्रत्येकजण स्वतःच्या मस्तीत धुंद वागे

जाणून फायदे घे मागे रहावयाचे
हो मागचा शहाणा पुढच्यास ठेच लागे

मग एवढ्याचसाठी छळ मांडते स्वत:चा
येईल तो अश्याने भरण्यास फ़क्त रागे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे
प्रत्येकजण स्वतःच्या मस्तीत धुंद वागे<<< वा वा

जाणून फायदे घे मागे रहावयाचे
हो मागचा शहाणा पुढच्यास ठेच लागे<<< छान

मग एवढ्याचसाठी छळ मांडते स्वत:चा
येईल तो अश्याने भरण्यास फ़क्त रागे<<< चांगला शेर

अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे
प्रत्येकजण स्वतःच्या मस्तीत धुंद वागे

व्वा.
बनारस मध्ये मला हा नेहमी अनुभव येतो. फायद्याचा शेरही उत्तम.
मत्ला तडजोडीचा वाटला.

धन्यवाद.

भाषेवरची उत्तम पकड आज जाणवली ही बाब खूप आवडली !!
ह्या आपल्या रचनेत आपल्या मनाला नेमकेपणे व्यक्त होता आले आहे असे जाणवले
अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे >> काय ओळसुचलीये राव आहा !!!! >>अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे >>वाह !!

संपूर्ण गझलच तूफ्फान आवडलीये जमीनही 'क्या बात'च निभावलीत असे माझे मत

वाघाच्या शेरावरून का जाणे का मला माझे एक जेष्ठ गझलकार मित्र आठवले Wink

अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे >> काय
ओळसुचलीये राव आहा !!!! >>अवघ्या चराचरावर
गारूड हे कशाचे >>वाह !!...<<
खरंय अगदी बेमिसाल ओळ.

अवघ्या चराचरावर गारूड हे कशाचे
प्रत्येकजण स्वतःच्या मस्तीत धुंद वागे

मग एवढ्याचसाठी छळ मांडते स्वत:चा
येईल तो अश्याने भरण्यास फ़क्त रागे

मस्त शेर. Happy

सुप्रिया ताई एकेक शेर वाचत गेले आणि तोंडातून फक्त वाह वाह बाहेर पडलं.
कसं सुचतं तुम्हाला इतकं अर्थपुर्ण लिहायला? Happy
हेवा वाटतो मला Happy

पुलेशु!