Submitted by रसप on 13 January, 2015 - 04:41
रंगमंचाला न ठाउक बदलले पडदे किती
तेच ते नेपथ्य तरिही हासले, रडले किती
वेदना, दु:खे, व्यथांचे साठले खजिने किती
आसवांवर पौरुषाची ठोकली कुलुपे किती
वाटते पाहून ओंजळ पूर्ण भरुनी सांडता
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती ?
जग मनापासून तू विज्ञान आणिक धर्मही..
बघ कुणीही सांगते का 'राहिली मिनिटे किती' ?
पाहिला जेव्हा जनाज़ा हात तेव्हा जोडले
एक क्षण माणूस झालो, एरव्ही जमले किती ?
एक माझ्या आत्महत्येने तुम्ही हेलावता
गाडली आहेत वाफ्यातून मी प्रेते किती !
....रसप....
६ जानेवारी २०१५
http://www.ranjeetparadkar.com/2015/01/blog-post.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाहिला जेव्हा जनाज़ा हात
पाहिला जेव्हा जनाज़ा हात तेव्हा जोडले
एक क्षण माणूस झालो, एरव्ही जमले किती ?<<< छानच
एक माझ्या आत्महत्येने तुम्ही हेलावता
गाडली आहेत वाफ्यातून मी प्रेते किती !<<< व्वा
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती ? <<< सुंदर ओळ
ह्यातले माझे किती अन् त्यातले
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती ? <<< सुंदर ओळ +१
सर्व शेर सर्व खयाल आवडलेच
वाटते पाहून ओंजळ पूर्ण भरुनी
वाटते पाहून ओंजळ पूर्ण भरुनी सांडता
ह्यातले माझे किती अन् त्यातले माझे किती
विचार आवडला. पहिली ओळ अधिक सुलभ करता यावी.
शुभेच्छा.
>>>पूर्ण भरल्या ओंजळीतुन
>>>पूर्ण भरल्या ओंजळीतुन सांडले की वाटते<<< मी स्वाभ्यास म्हणून बदल जमतोय का हे पाहत होतो
कृ गै .न प्लीज
क्या बात है ... सुर्रेख गजल
क्या बात है ... सुर्रेख गजल ...
'पाहिला जेव्हा जनाज़ा हात
'पाहिला जेव्हा जनाज़ा हात तेव्हा जोडले
एक क्षण माणूस झालो, एरव्ही जमले किती ?" मस्त!
सुंदर गझल, अनेक शेर आवडले
सुंदर गझल, अनेक शेर आवडले
धन्यवाद