अधुरी कादंबरी... सुरुवात एका प्रेमाची.. भाग ६

Submitted by Kally on 11 January, 2015 - 03:02

काही दिवसानी मला त्याचा वागण्यात थोडा फरक जाणवू लागला,, तो मला ignore करत न्हवता पण मी त्याचा नझरे आड होत चालली होते,, सतत आपल्याच विश्वात दंगलेला असायचा किवा phone वर massage करत तरी असायचा, त्याच वागण बघून मला वाटले की तो प्रेमात तर पडला नाहीये ना कुणाचा... मी विचारले ही तसे त्याला..

तू प्रेमात पडला आहेस का,,,

अबोल तर तू नेहमीच होतास
पण आता पुरता निशब्द झालायस

आपल्याच विश्वात रमलेला असतोस
कधी अचानक परका भासतोस

जणू तू तो नाहीस ज्याला मी माझा म्हणत होते
मान्य आहे मला की तसे खरे कधीच न्हवते

पण एक नाते होते आपल्यात,, आपलेपणाचे
मनाला जोडणार अन मनातले सारे जाणणारे..

ज्याला कोणतेच बंधन न्हवते
आता कुठेतरी हरवले आहे ते

अचानक हे काय वेगळेच सुचले हिला
हेच मनात वाटत असेल ना तुला,,,

पण माझ्या ही मनात एक प्रश्न आहे अडला विचारू का,,,
खर सांगशील,, तू कुणाचा प्रेमात पडला आहेस का....?

तो: मला नाही माहित,, कदाचित तुझीच नज़र बदलली असेल माझ्याकडे बघण्याची..
मी: माझी नज़र न्हवे तुझा स्वभाव बदला आहे सध्या..
तो: तुला अस वाटण्याच कारण कदाचित तुझी माझ्याकडून असणारी एखादी अपेक्षा असू शकते
मी: अपेक्षा...! तुला नक्की काय म्हणायचे आहे..
तो: तू प्रेम करतेस माझ्यावर..?
मी: ...... हो,, कदाचित हो... म्हणुनच मी त्याचसाठी insecure feel करत असावी..
तो: ohk..
काय बोलून गेले मी... काही वेळ शांतच राहिलो दोघा ही..
मी: hmm,, sorry मला तस म्हणायच न्हवते.. नाही कळत मला की मी तुझ्यासाठी जे feel करते ते नक्की काय आहे.. पण तुझा हा तुटकपणा मला सहन होत न्हवता रे... माझ काही चुकले असेल तर माफ कर m sorry.. I just don’t want To lose you.. माझ्यासाठी एक गोष्ट करशील..
तो: hmm,, बोल
मी:आपण तू मला विचारलेल्या प्रश्ना नंतर चा माझ उत्तर विसरून जोऊया..
तो: ohk..& I promise we will friends forever..

काही दिवसा नंतर नेहमी सारखेच आमचे बोलणे चालले असताना तो मला म्हणाला
तो: मला तुला काही तरी सांगायचे आहे.. पण आता नाही संध्याकाळी निवांत सांगेन..office सुटल्यावर भेटू..
मी: hmm ठीक आहे

दिवस भर लक्षच लागत न्हवते कश्यात, काय सांगणार आहे तो संध्याकाळी,, त्याचा स्वर ही गंभीर होता..कधी कधी त्याचा मनाचा काही ठांपत्ताच लागत नाही मला...
सांधकली भेटलो तेव्हा तो पुन्हा थोडा गंभीर होता मी एक टक त्याला पहात त्याचा चेहेर्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होते.. काही वेळा नंतर दीर्घ श्वास घेत तो माझ्याकडे ना पहातच म्हणाला,,
तो: I'm in a relationship ..
एक कर्कश्य आवाज यावा असे माझ्यात काही तरी तुटले होते.. वेगात एक लोकल आमचा समोरून तिचा horn वाजवत जात होती,, माझ्यासाठी सार जग स्थिर झाले होते..

माझे शब्द तुझ्यापासून होते,,
माझे सूर ही तुझ्यापासून होते..
तू वाट बदलली अन मी वाट चुकले..
अडखळून लेखणी शाही विखुरली,,
विसरून सरगम सुरांची तार तुटली...

काय react कराव काहीच कळत न्हवते,, एका क्षणात डोळ्यात पाणी साचले होते,, तो अजून ही माझ्याकडे पहात न्हवता ते एक बर झाल होत, कदाचित त्याला माझ अपराधी असल्यासारख वाटत होत असेल म्हणून तो माझ्या नझरेला नज़र देण टळत असावा.. मग मी ही त्याची नज़र चुकवून डोळे पुसले आणि त्याला म्हणाले..
मी: अभिनंदन.. अरे इतकी गोड बातमी ही आणि ती अशी थंडपणे काय सांगतो आहेस,, आणि कधी झाल हे..
तो जरा गोंधळच असेल.. पण माझी प्रतिक्रिया ऐकून त्याचा चेहेर्यावरची उदासिनता नाहीशी झाली होती..
तो: सोमवारी.. माझ्या office मधेच आहे ती, खूप गोड आहे.. Monday ला तिला प्रपोज़ केल आणि ती हो म्हणाली..
मी: अरे वा,, छान.. पण नाव काय तीच..?
तो: अनामिका..
काय नशीब आहे माझ.. इतकी वर्ष ज्याला मनात साठवले होते त्यावर माझा काहीच हक्क राहिला न्हवता,, तसा तो हक्क कधी न्हावतच माझ्याकडे पण .. पण एक गोष्ट मनापासून मान्य करते की यात दोष कुणाचाच न्हवता, ना माझा ना केशव चा आणि ना त्या नाव नसलेल्या अनामिकेचा..सार काही फक्त घडत गेला होत....

तू तर आधारासाठी हात दिला होतास,,
मीच आयुष्य भराची साथ समजले..
चूक माझीच होती म्हणूनच,,
तुला ना मिळवातच गमावून बसले..

मी: पार्टी घेतली असती तुझाकडून आत्ताच पण उशीर झाला आहे ना खूप,, चल निघुया आपण..
तो: हो,, चल..
त्याच्यासमोर तर मी खूप खंबीर पणे असे दाखवले की मला खूप आनंद झाला आहे.. पण मी पुरती बिथरले होते, रात्रभर खूप रडले, हुंदके आवरताच येत न्हवते. कुणाच्याच प्रश्नच उत्तर न्हवते माझ्याकडे, कित्तेक दिवस कुणाशी धड बोलत ही न्हवते, कुणाशी बोलण्यासाठी मी भानावर तर असले पाहिजे होती ना,, शुद्धच हरपली होती माझी..

भेट समजून जो क्षण मी मनात जपला होता
ज्यामुळेच देवावर पुन्हा विश्वास मी केला होता..
आज वाटते तो क्षण आयुष्यातच का आला होता,,
माझ्या स्वप्नांचा खेळ का देवाने मांडला होता..

पण एक दिवस ठरवले की नाही जे व्हायचे होते ते झाले,, नाहीतरी मी त्याला deserve करत नाही हे मी केव्हाच स्विकारून झाले होते आणि कधी ना कधी मला हे ऐकावे लागनरच होते.. काही दिवसांनी office ला जायला निघाले पण पुन्हा पहिल्या दिवसा सारखी संभ्रमात पडले की कोणत्या डब्यात चढाव ,, कसे FACE करणार होती मी पुन्हा त्याला, त्याला पाहून माझ रडू आवरले गेले नाही तर,,, पण मनाची पक्की तयारी केली आणि त्याला समोरी गेली..तो जसा ट्रेन मधे चढला तसा नेहमी सारखीच त्याची नज़र माझा ओळखीचा चेहेरा शोधात होती. त्यची नज़र माझ्यावर पडताच मी त्याला smile दिली, पण आज त्याच हसू कोरड होत.. माझ्या जवळ येत म्हणाला
तो: कशी आहेस ?
मी: छान,, आणि तू ?
तो: M also fine,,, upset आहेस का, माझा राग येत असेल ना तुला ?
मी: नाही रे upset का असेन, आणि तुझ्यावर का म्हणून रागवेन मी...
तो: मग इतके दिवस office ला का नाही गेलीस, त्या दिवसा नंतर नाहीशीच झाली होतीस..
मी: अरे तस काही नाहीये. काही दिवस गावी गेले होते योगायोग म्हणजे या वेळी माझ तुझ्यासारखाच झाल, अचानक plane झाला आणि आम्ही रात्रीच निघालो म्हणून तुला सांगताही आले नाही आणिगावी network problem रे मग पुन्हा तिथून ही कळवता आले नाही.
तो: ohh,, मग तुझे डोळे का सुजले आहेत, पाणावलेले ही दिसत आहे, माझाशी नज़रा का चोरत आहेस,,?

काळीज तुटले की रडणे सोप्पे असते,,
पण खरी परीक्षा तर तेव्हा असते,
जेव्हा खोट खोट हसावे लागते
अन त्याच काळजाचा तुकड्यांमधे
अश्रुना ही लपवावे लागते..

मी: काहीही हा केशव,, तुला अस वाटत आहे कारण तू माझी care करतोस, thanks for that but m fine,, अरे जे झाला ते घडणार होतच फक्त त्यावेळी मी prepared न्हवते.. आणि डोळ्यांच म्हणशील तर काल रात्रीच आलो ना आम्ही परत तर झोप पुर्ण झाली नाहीये म्हणून डोक दुखत आहे,, आणि म्हणुनच माझा चेहेरा तुला असा वाटत असेल,, नको करूस माझी काळजी.. मी मजेत आहे.. आणि हो मी तुझ्यासाठी खूप खुश आहे,, कधी तरी भेटव मला तुझ्या अनामिकेशी,,, आवडेल मला...आणि तुमची कथा लिहायला ही आवडेल..
मी बरी आहे हे त्याला पटवून देण्यासाठी किती बोलून गेले होते मी,, पण पटले शेवटी त्याला.... कधी कधी खोट बोलाव लागत,, समोरचला त्रास होऊ नये म्हणून..
तो: हो नक्की..

माझे शब्द अन त्या शब्दांचा ओघ तुला नेहमीच कळत होता,,
ठाउक होते तुला की माझ्या मनातले भाव कधीच खोटे न्हवते..
अन मलाही माहित होते की तुझ्या मनातली परी मी कधीच न्हवते,,
तरीही माझे हे वेडे मन आहे अजून ही याच प्रश्नात गुंतलेले,,
तुला क्षणभर ही कधी,,माझ्यावर प्रेम करावेसे नाही का वाटले...

त्या दिवसा नंतर आमच्यात सार नीट सुरळीत रहाव हा एवढाच प्रयत्न मी करू लागले,, मला त्याला गमावाईचे न्हवते,, फक्त मित्रा म्हणून का असे ना पण मला तो माझ्या आयुष्यात हवा होता.. त्याला म्हणालेली ना म्हणुनच लिहिली ही माझ्या प्रेमाची अधुरी कादंबरी आणि त्याचा प्रेमाची सुरुवार...

_ समाप्त..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनातल्या भावना शब्द्तात फार छान उतरवल्या आहेत ... आपल्या आयुष्यात कधीना कधी अस घडत पण ते सोडून आपल्याला पुढे जायचं असत कारण आयुष्य हे हसून जगायचं असत.....God Bless you Happy

खुप मस्त होती.......................
कवीता मस्त होत्या शेवट परीयन्त................

Phakt Ekch hindi gane aathvle-
Dil Ke Armaa Aasuone me beh gaye.
Hum wafa karke bhi tanha reh gaye..
khup chan lihle aahe… ka mahit ka pan mi personally khup anubhavle aahe.. Pahile prem nehmi adhurech rahte.

ओह अरेरे.. हि आपलीच सत्यकथा आहे.. प्रेमभंगाचे दुख मी जाणू शकतो.. आयुष्यात कैकदा अनुभवले आहे.. पण या अनुभवाने एक सत्य मात्र दाखवले, ते म्हणजे प्रेम आयुष्यात येत जात राहते Happy

पुढील लेखनास आणि प्रेमास मनापासून शुभेच्छा Happy