अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची..भाग ४

Submitted by Kally on 9 January, 2015 - 01:24

होळीचे दिवस होते, दोन दिवसाच्या सुट्टी नंतर मला वाटले म्हणून मी ऑफीस ला जाताना त्याच्या साठी आई ने केलेल्या पुरणपोळ्या घेउन गेले होते पण तो आलाच नाही,,,,,! अस पहिल्यांदाच झाला होत एवढ्या दिवसात की आमची भेट चुकली होती. जस गोरेगाव स्टेशन पास झाल आणि तो आलाच नाही,, तेव्हा मला काही सुचेनासेच झाले. होते. मग विचार केला की रंग खेनूण दमला असेल म्हणणुन आज ऑफीस ला दांडी मारली आसेल तेवढ्या दिवसा पुरते मी स्वात:हला हे कारण सांगून समाजविले होते. पण दुसर्या दिवशी, दुसर्या दिवशी ही तो आला नाही. आता मात्र माझा जीव कासावीस झाला होता, आज ही कसा नाही आला, आसा अचानक काही ना सांगता नाहीसा कसा होऊ शकतो हा, आजारी तर नसेल ना? काय झाले आसेल काही कळत न्हवते, बर त्याचा फोन नंबर ही मी घेतला न्हवता. काय कराव काहीच कळत न्हवते. दोन दिवस झाले मी त्याला पाहिले न्हवते. नुसते तर्क लावून डोक फुटायची पाळी आली होती. तिसरा दिवस उजाडला होता मग शेवटी ठरवले की जर आज हा नाही आला तर मी सरळ गोरेगावला जाणार आहे, त्याच घर न्हवते माहित मला पण आठही दिशांना त्याला शोधण्याची माझी तयारी होती.

अनोळखी असते साद परकी पण
भास चाहुलीचा तुझ्याच वाटे,,
Naa माझा कुणी तू ना मी तुझी
तरीही जपले हे अनामिक नाते,,
गुंतले मन माझे तुझ्यात असे
तुजवाचून जगणे अधुरे वाटे..

आज पुन्हा पहिल्या दिवसा सारखी माझी नज़र एक टक फक्त ट्रेनचा दाराकडे लागून राहिली होती.. जस गोरेगाव स्टेशन आले तस लोकांच्या गर्दीतून वाट काढत तो आत आला आणि मला पाहून नेहमी सारखाच गोड हसला, पण मी हसायचा मूड मधे आजिबात न्हवते.. त्याला पाहून माझा जीव भांड्यात पडल्यासारखे झाले होते खरे पन ते दाखवय्चे मत्र न्हवते. डोळे पाणावले होते.. माझ्या डोळ्यांच मलाच कधी काही कळत नाही कुनस थावुक का सतत असे भरून येतात. माझ्या शेजारी येउन म्हणतो कसा ..
तो: काय गा काय झाला आशी घुब्ब करून रागात असल्यासारखी का दिसते आहेस, पुन्हा कोणी काही बोलले का की घरी काय झाल ?
मी: मी तुझ्यावर चिडले आहे, तू आहेस माझ्या रागच कारण. दोन दिवस कुठे होतास तू, असा ना सांगता कुठे गेलेलास, मला किती काळजी वाटत होती, बर कुणाला विचाराव अस ही कुणी नाही, तुझा cell नंबर ही नाही माझ्याकडे किवा ऑफीस चा पत्ता ही नाही, मग काय कराव मी तुच सांग.... तू आजारी तर नशील ना, ऑफीस ची वेळ बदलली असावी का? आणि माहित नाही काय काय..विचार करून करून वेड लागायची पाळी आली होती.. नशीब माझ जे आज तरी आलास.. तुला ना धरून मरावस वाटत आहे मला..
तो: शांती शांती शांती,, अग श्वास तरी घे, किती चिडशील, बोलताना दम नाही लागत का तुला.. ?
मी: तू चेष्टा करू नकोस हा,, मी अज्जीबात मस्करीच्या मूड मधे नाहीये
तो: अग सुट्टी होती ना होळीची दोन तीन दिवस म्हणून गावी जाऊन आलो, आणि आचानकच् प्लान झाल गा मग कस बर सांगणार मी तुला.
मी: ohk.. बर
त्याच कारण ऐकले आणि पुढे काही बोलवलेच नाही मला, मनात स्वत:चाच वागण्याचा विचार करू लागले.. मी जरा अतीरेकच् केला का.....
पण त्या नंतर तो दर वेळी कुठे जायच्या आधी मला सांगू लागला त्या दिवशी आमचे numbers ही exchange झाले. ते एक बर झाला म्हणजे पुढे जीवाला घोर नको. पुढचा पुर्ण प्रवासात तो माझे रागाने फुगलेले गाल बघुन हसत आणि मला चिडवत होता... दुष्ट कुठला...

थोडासा खट्याळ पण जीवलग आहे,,
ओठांवर चुकून कधी कडु आलेच
तरी मन संध्या आभाळ आहे..
क्षणात दुख विसरावे एवढे
निरागस भाव लपलेल्या डोळ्यात आहे..
प्रेम,, कुणीही नकळत करू लागते
असेच काही वेगळे तुझ्यात आहे...

_क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

कुल