अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची.. (भाग २)

Submitted by Kally on 5 January, 2015 - 05:07

काही दिवसांनी मला नवीन जॉब ऑफर आली, दादरला, आणि मी ही तिथे रुजू व्हाईचे ठरवले. काही दिवसातच मी त्या रोजचा लोकल ट्रेनचा प्रवासात आणि नवीन नोकरीत रुळले, रमले होते. एकदा मला जरा उशीर झाला आणि मी नेहेमीचे लेडीज कॉमपार्टमेंट चुकले म्हणून मग नाईलाजाने जेंट्स कॉमपार्टमेंट मधे चढले,, तश्या माझ्या व्यतिरिक्त ही बर्याच स्त्रिया होत्या तिथे,, म्हणून मला जरा हायसे वाटले.. गर्दी फार होती आणि सारेच अनोळखी चेहेरे होते. पुढचे स्टेशन आले आणि लोकांची चढ उतार सुरु झाली मी ते पहात होतेच तेवढ्यात माझी नज़र चमकली आणि एका जागी स्थिरावली. ज्या दिशेनी मी पहात होते तिथून ही ओळ्ख पटली असा प्रतिसाद देणारे हसू दिसून आले. काही वेळाने ती व्यक्ती माझ्या जवळ आली.. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून केशव होता.....
तो: कुठे निघाली आहेस
मी: जॉब ला, काही दिवसांपूर्वीच जॉइन झाले आहे
तो: ह्म,, तरीच.. कारण आधी कधी दिसली ही नाहीस ना ट्रेनमधे
मी: हो,, पण तू ओळखलेस मला ह्याचेच मोठ नवल वाटते आहे मला
तो: ओह्ह तट्टा करते आहेस माझी,, आणि तू सुद्धा कसा एका नझरेट मला ओळखलेस.. मग मी तुला कसा नाही ओळखणार
मी: ह्म.. मग तू कुठे निघाला आहेस
तो: मी ही ऑफीस ला जात आहे दादरलाच ..
मी: बर.. आपल्या ग्रूप मधील अजून कुणाशी भेट होते का रे..
तो: हो,, बरेच जण अजून ही संपर्कात आहेत, आम्ही पिक्निक ला वगैरे ही एकत्र जातो, आणि स्पेसियली आम्ही बॉयस रोज कट्ट्यावर भेटतोच
मी: छान.. ऐकून बर वाटले..
तो: ह्म,, सर्व जण जवळ आहेत तुच काय ती लांब जाउन बसली आहे..
मी: टोमणे नको मारूस रे.. मी मुद्दाम थोडीच गेले आहे..
तो: हो ग,, कळते मला मी फक्त मस्करी करत होतो
मी: ह्म कळले मला ही ते,, पण माझ्याशी कधी तू इतके मोकळ्या पणाने बोलला न्हावतस.. आज काही स्पेशल आहे का?? मला तर वाटतायचे की तू मला निट्स ओळखत ही नसशील म्हणून
तो: ओह्ह,, आता तू टोमणे मारत आहेस का?? तू राधिका.. आपल्या वर्गातील एकुलती एक एकलकोंडी मुलगी... बघ मला नाव ही आठवणीत आहे.. हहह,, खर तर मी बोलतो ग पण आपल्यात तशी सौवादाची वेळ कधी आलीच नाही ना, म्हणून एक संकोच वाटायचा.. आणि तू तरी कुठे बोलायचीस तेव्हा..
मी: ह्म्म्म्म...
काही क्षण शांतते निघून गेले... आणि पुढच्या स्टेशन ला जेव्हा गाडी थांबली तेव्हा पुन्हा माणसांचा एक लोंढा वारयाच्या वेगाने त्या डब्यात शिरला.. काय ती गर्दी... त्या गर्दीत मी स्वत:ला सावरून उभा रहाण्याचा निरर्थक प्रयत्न करत होती.. काही वेळाने मला जाणवले की समोरची व्यक्ती माझ्याकडे वाईट नजरेने पहात आहे.. आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या की स्त्रियांमधे एखादयाची वाईट नज़र, वाईट स्पर्श ओळखण्याची शक्ती असते. कदाचित त्यामुळेच मला ती नज़र असस्य होत होती. काही वेळाने माझी ती अस्वस्थता केशवला ही जाणवली म्हणून त्याने मला खुणे ने विचारले ही की काय झाले पण मी काही न बोलता फक्त त्या व्यक्तीकडे एक नजर टाकली आणि चेहेरा फिरवला. केशवणे त्या व्यक्तीकडे पाहिले आणि तो समजून गेला की नक्की काय भानगड आहे. क्षणाचा ही विलंब न करता त्याने आपला हात माझ्या दंडावर ठेवला आणि मला जरा स्वता: जवळ ओढले. क्षणभर मी गोंधळलेच पण केशावचा त्या स्परश्यात एक आधार जाणवला आपलेपणा होता मित्रत्वाचा.. त्या एका क्षणात केशवने त्या व्यक्तीला जाणीव करून दिली की मी एकटी नाहीये. त्या व्यक्तीने ही केशवला एक नज़र पाहिले आणि आपली पाठ फिरवली.
जीवात जीव आला होता माझ्या जणू मी एका नज़र कैदेतून मुक्त झाली होती. आणि केशव चा तो आपुलकीचा स्पर्श मला वारंवार त्याच्याच चारोलीची आठवं करून देत होता..

हात असाच राहूदे हाती....
संपू नये कधी हा रस्ता,,
स्पर्श असाच होअत रहावा,,
नकळट्सा म्हणण्या पुरता....

पुढे दादर स्टेशन आले आणि आम्ही दोघे ही ट्रेन मधून बाहेर पडलो आणि एकमेकाचा निरोप घेऊन आपापल्या वाटेला लागलो. दिवसभर मी मात्रा सकाळचा तो प्रसंग आठवून स्वत:वर स्वत:शीच हसत ही होते आणि केशवनेच लिहिलेली चारोळी आठवून स्वत:शीच लाजत होते.

_क्रमश..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kally,

तुम्ही छान लिहिता....फक्त थोडे शुद्ध्लेखना कडे लक्ष द्याल का प्लिज ?
त्यामुळे थोडा रसभंग होतो...आणि जमल्यास थोडे मोठे भाग टाका, आणि मागिल भागाची लिंक पण द्या.
बाकी पु.ले.शु.

-प्रसन्न