आनंद संगीत

Submitted by meenakshi.vaidya on 31 December, 2014 - 01:14

हिरव्या कंच पानांचे हसणे,झाडा-झाडावर टरारुन उठले..
उत्साहाचे सगळे धुमारे,कणा-कणातुन उफाळले.
बघता-बघता नवलच घडले,अवघे विश्व नादमय झाले.
अवनी सजली हिरव्या शालुत,पुश्पालंकारांनी नटली.
रवीकिरणांच्या स्पर्षाने ती, लाजुन हळुच मनी हसली.
अवनी पुत्रही उत्साहानी सजली,आनंद गीत गाऊ लागली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users