गोदरेज फर्निचर कसे आहे?

Submitted by सुहास्य on 28 December, 2014 - 06:23

आपल्या पैकी कुणी गोदरेज फर्निचर घेतले आहे का? बेड सेट मधे सध्या हायड्रोलिक डोअर वाले बेड आहेत , सोफा सेट , डायनिग टेबल , ई ई बद्दल कुणाला माहिती ,अनुभव असतील तर इथे लिहावेत.
शिवाय ह्यात टेम्र्रपेडिक गादी , मेमरी फोम गादी ह्या विषयी चे अनुभव पण लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोदरेजचे फर्निचर खूप दिवस चालते, असे ऐकून आहे. लाकडाचे घेतले तर फक्त कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, पण त्यांची सर्विस चांगली आहे.

आमच्याकडे गोदरेजचे स्टडी टेबल, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या (, ) आहेत. सगळ्या गोष्टी आम्ही विकेस्तोवर टिकतील इतक्या दणदणीत आहेत. आमच्या मित्र परिवारात गोदरेजच्या कपाटांचे फॅन्स बरेच आहेत. आणि नको तितके चालतात म्हणून जाणिवपूर्वक गोदरेज बेड्स न घेतलेले पण आहेत.

याशिवाय आम्ही गोदरेजच्या डायनिंग चेअर्स घेतल्या आहेत. साधारण अशाच दिसतात. पण त्यांच्यात एक छोटासा डिजाईन फॉल्ट आहे. तो म्हणजे त्यांचे पाय खूप नाजूक आहेत, त्यामुळे रफ वापरासाठी त्या अजिबात योग्य नाहीत. शिवाय त्यांची जी कुशन्स आहेत ती नेहेमीच्या वापरात एका वर्षातच फाटली होती. वॉरंटीमध्ये असल्याने त्यांनी विनामुल्य बदलून दिलीत. पण मज्जा म्हणजे ही बदललेली कुशन्स (आणि खुर्च्यांचे पायही) आता रफ वापरातही एकदम टिकून आहेत.

तेव्हा घेताना थोडे डोके लावले की काम होते. पैसे वसूल असे प्रॉडक्ट मिळते, असा आजवरचा अनुभव आहे.

आणि हो! रिसीट्स सांभाळून ठेवायच्या. जर वॉरंटी क्लेम करायची वेळ आली तर कामास येतात. वर उल्लेखलेल्या वॉरंटी क्लेम दुरूस्तीला आलेल्या माणसाने सांगितले होते की रीसीट नाही म्हणून बर्‍याचदा त्यांची अशा प्रकारच्या क्लेममधून सहज सुटका होते.

Sadhana, pepperfry, snapdeal aani fabfurnish ekade 365 divas salech asato..

Ghetana product specification/ reviews aani supplier reviews bag...shakyato Supplier manufacturer asava..mahnje supreme chaircha supplier supreme asel tar ajun changale...

Me tinhi websitevar kharedi keli aahe...discount n service changli hoti...

Godrej quality changli aahe pan varieties nahi..pan aata te custompan karun deta...online ghetala tar ajun swata padel...

धारा,-- खुप खुप धन्यवद मस्त डीटेल माहिती दिलिस .... मी godrej flutter Bed चा विचार करतिये... आणी त्या बरोबर mattress. इथे ( कुवेत ) बसुन ईमेल ने मस्त बोल्तोय आम्ही. डिस्काउन्ट पण देतायत १०%. ... तर पुढे काय होते करतेच पोस्ट इथे ...

राजू७६ , स्पार्टाकस ---- धन्यवाद प्रतिसादा बद्दल ...

मुख्य म्हणजे after sale service is good . ..हे बेश्ट्च ...

अजुन काही टिप्स असतिल तर कळवा. ..