कांदेपोहे ... नव्या आयुष्याची प्रस्तावना

Submitted by Kally on 28 December, 2014 - 06:14

आज रेणुका काकीचा घरी बरीच गडबड होती,, सर्वच जण कोणत्या ना कोणत्या कामात गुंतले होते.. सर्वांची नुसती धांदळ उडालेली दिसत होती. रेणुका काकी ही कांदेपोहे बनवण्यात व्यस्त होत्या.. अहो असणारच तीचा लाडक्या लेकीला पहायला मुलाकडचे येणार होते..
रेणुका काकूंची मुलगी म्हणजे सोनल.. तशी ती मुलाला भेटायलाच तयार न्हवती. गेली २ वर्ष तीचा मागे लागून लागून आता काय ते लग्नाला तयार केल होत तीला.. किती आणी कस कस समजावले होते तीला ह्या सर्यांनी हे त्यांच त्यानाच थावूक..
सोनल तशी सरल साधी मुलगी होती. कुणाच्या आल्यात नहीं की गेल्यात नहीं. स्वतहातच बंधिस्त असायची.. तीचतली ती काधी कुणाला सापडलीच न्हवती. आपले मन ती सहज असे कुणासमोर मोकळे करत नसे पण एक वादल होत तीचा मनात.. विचारांचा, प्रशनाचा खूप मोठा संच.. साठला होता तीचा मनात.. नक्की काय घडले होते तीचा आयुष्यात असे की ती अलिप्तपणे वावराईची ही कळतच न्हवते. पण तसे असूनही तीने कधी कुणाचे मन दुखवले न्हवते.. सोनल सारखेच फक्त आपले आपल्यापुरतेच मार्यादीत असे विश्व आपल्या सर्वांचे ही असते ना …
घरातले सर्व जन काही ना काही काम करात होते, रेणुका काकी स्वंपाकघरात होत्या, सोनलची लहान काकी ही तिथेच काही काम करत होती. सोनलचे बाबा, काका, आणी भाउ अजय अनी बहीन गौरी घर आवरात पाहुण्यांचा स्वागतची तयारी करत होते. सोनल दुसर्या खोळीत तयार होऊन बसली होती शून्यात हरवलेली.. आशा वेळी मुल्लींना दडपण येतेच म्हणा.. पण सोनलला कसली काळजी होती कुणास थावूक.. सुरेख दिसत होती सिंपल जरीची साडी, बटवेणी बंधलेले केस, कापळवर नजूकशी टिकली, पायात नेहमीचेच पैंजन, गल्यान एक नजूकशी चैन, हातात बांगड्या, कानात कर्णफुले.. ते म्हणतात ना साधगी मे ही सुंदरता अगदी तशी धारणा आहे सोनलची.. अगदी सालस दिसत होती..
स्वंपाकाच काम आवरून रेणुका काकी सोनलचा खोळीत आली. डोळे थोडे डबडबले होते त्यांचे, मुलीच्या लग्नाचे स्वप्न त्यांच्या डोळ्यात साफ दिसत होते. त्या तीच्या जवळ गेल्या तीला आपल्या कुशित घेतले आणी म्हणाल्या,, “ बाय् हा कोण आहे, काय आहे हे नीत परखून घे कदाचित याचाशी तुझ्या आयुष्याची गाठ बंधली गेली असेल. आणी जरी नसेली तरी हा क्षण जग. तुझ्याच भाषेत सांगायचे तर हा क्षण म्हणजे तुझ्या आयुष्याचा नव्या अध्यायची प्रस्तवना असेल.
पाहुने मंडली aali… मुलगा, त्याचे आई वडील, लहन भाउ आणी मध्यस्ती करणारे विनायक काका अशी पाच मानस आली होती. विनायक काकांनी ओळख करून दिली
विनायक काका: हे मुलाचे आई वाडील श्री आणी सौ. मोहिते, हा मुलाचा लहन भाउ समीर अनी हा मुलगा संदीप.. हे मुलीचे आई वडिल, श्री अनी सौ गोडबोले, हे तीचे काका काकी, आणी हे लहान भाउ बहीन अजय आणी गौरी.
काही वेळ मोठ्यांची बोलणी चालू होती, मुलाकडचे मुलीबद्दल आणी मुलीकडचे मूला बद्दल महिती जमा करत होते. सोबत एकडचा टिकडचा गप्पा ही होत होत्या. संदीप अगदी सोनलला साजेसा होता योग्य उंची, रंग सावला, स्मित हास्य, नीत भांग पाडलेले केस, क्रीम्य व्हाइट कलर चे शर्ट आणी काळी पैंट, अन हातात घड्याळ. अधून मधून कूणी काही विचारले की तो बोलत होता. तेवढ्यात विनायक काकांनी आता मुलीला ही घेवून या असे संगितले. तसे रेणुका काकी आणी सोनलची काकी सोनलला घेवून यायला निघाल्या.
आई: बाय्, चल.. तुला पहायला आले आहेत ना ही मंडळी
सोनलने केविलवाणी नज़रेने आई कडे पाहिले, तीची आई उसनेच हसली, सोनलचा मनात चाललेली घालमेल तीला कळत होती..
सोनल हॉल मधे अली.. तीचा हृदयाचे ठोके वाढले होते.. ती येताच सरयांनी तीचा कडे पाहिले तीची नज़र मात्र झुकलेलीच होती.. संदीपने एक कटक्ष टाकला आर्थात चोरटा.. रेणुका काकिने सोनलला समोर बसवले आणी त्या तीचा पाठी उभ्या रहिल्या. विनायक काकांनी सोनलशी सर्यांची ओळख करून दिली. माग संदीपचा आईने सोनल ला काही प्रश्न विचारले आणी त्यांचा घरा बद्दल घरतल्यां बद्दल, संदीपबद्दल काही गोष्टी संगितल्या.. तेवढ्यात समीर ला काही सुचले..
समीर: चला अपण बरच बोललो आता या दोघांना ही एकमेकांशी थोड बोलण्याची संधि द्या..
विनायक काका: हो बरोबर आहे, सोनल तुम्ही जवळचा तलावा पाशी जाऊन या, तिथे एकांत ही भेटल आणी मोकळ्या हवेत निट बोलता ही येईल.. जा तुम्ही दोघ..
10 मिनटांचा रस्ता होता, ते दोघ ही तलावा परेंत पोहोचले ही पन कोणीच काही बोलले नाहि .. शेवटी संदीपच म्हणाला
संदीप: शहराचा गर्दीत अशी ही एखादी निवांत जागा असेल अस वाटले न्हवते, छान आहे तलाव, आणी आजुबाजूचा परिसर ही सुरेख आहे..
सोनलने प्रतीसाद म्हणून नुसतेच चेहेर्यावर एक हसू उमटवले. माग काय पुन्हा तोच बोलला
संदीप: तुम्ही खूप गोड हसता.
आता सोनलला बोलने भाग होते.
सोनल: thanks Happy
संदीप: माझ नाव संदीप आहे. मी एक IT इंजीनियर आहे. एका नामवंत कंपनी मधे गेल्या सहा वर्षापासून कार्यरत आहे.
एवढ बोलून त्याने एक कटक्ष सोनल कडे टाकला तीचा चेहेर्यावर काहीच भाव न्हवते.
संदीप पुन्हा पुढे बोलू लागला
संदीप: तुम्ही,,, नेहेमीच आशा अबोल असता की तुम्हाला मी किती बोलतो ही पहायचे आहे.
सोनल: नाहि अस काही नाहि आहे मला खरतर काही सुचत नाहिये. काय बोलू, कुठून सुरुवात करू, आणी मी जे बोलेन त्यावर तुम्ही काय react कराल,, प्रश्नच प्रश्न..
संदीप: ओह्ह,, असे आहे तर Happy but don’t worry feel free.. आपण परीक्षा द्यायला नहीं आलोत. आणी हो मी ही तसा फार नाहि बोलत आणी I know की मी फार वाईट jokes crack करतो पण he या मागे तुमचे हे अवघडले पण नाहीसे करण्यचा प्रयत्न आहे. so गैरसमज करू नका आणी मोकळेपणाने बोला.
संदीपचे हे बोलने सोनल ला भावले.
सोनल: Happy माझ नाव सोनल आहे. आणी एका नामवंत magazine ची मी editor म्हणून गेली चार वर्ष कार्यरत आहे.
संदीप: ohk.. कमाल आहे शब्द हे तुमचे शत्र आहेत तरी आज तुम्हाला काही सुचत नहीं.. हा कांदेपोहेचा कार्यक्रम म्हणजे अजबच असतो ना …. Happy
सोनल: Happy
संदीप: मला खूप मित्र मैत्रिणी आहेत, आणी मला त्यांचा सोबत वेळ घालवायला खूप आवडते, आणी मला travel करायला क्रिकेट खेळायला आवडते..
सोनल: same here,, माझे friends माझ्यासाठी खूप special आहेत. आणी मला ही फिरायला नवीन जगा पहायला खूप आवडतात.
संदीप: nice,, म्हणजे आपल्या आवडी निवडी मिळतात तर..
सोनल: पण लग्नसाठी फक्त आवडी निवडी मिळुन चालत नसते ना..
संदीप: हो,, मग विचारा ना.. tumchya प्रत्येक प्रश्नाचे मी उत्तर देन.
सोनल: मला काही विचारायचे नाहिये फक्त संगायचे आहे.
संदीप: ohk..
सोनल: पहिली गोष्ट् म्हणजे माझ्या मते लग्न ही खूप मोठी जबाबदारी असते.. अणी मी ती पेलू शकेन की नहीं ह्या दुविधेत आहे मी..
संदीप: ohk.. हे दडपण मला ही आहे,, किंबहुना लग्न ठरत असलेल्या प्रत्येकालाच असते.. पण एकमेकांचा साथीने नक्कीच निभावून घेता येईल.. so the next one ?
सोनल: दुसर म्हणजे,,,,
संदीप: अगदी मोकळे पणाने बोल.. मला तुझा मित्र समज..
सोनल: …. माझ प्रेम होत,, एका मुलावर, एकटर्फी.. त्याच्या आयुष्याशी जोडली गेली होती मी, त्याच नेहमीच चांगले व्हावे असेच मला वाटायचे आजून ही वाटते.. खूप महत्वाचा आहे तो माझासाठी आजूनही,, फक्त आता त्या प्रेमाच्या भावनेची जागा मैत्री ने घेतली आहे.. मी कृष्ण म्हणायचे त्याला.. पण आता मला माझा कृष्ण हवा आहे.. आयुष्याभर त्याचाशी मैत्री टिकवायची आहे मला पण तो माझा आयुष्यात आहे हे महित असतानाही तुम्ही माझ्याशी लग्न कराल का,, प्रेम कराल का माझ्यावर ???
संदीप: हो.. :)) wow पाहिल्यांदा एका मुलाला कुणा मुलीने prapose केल असेल ना... so मी नहीं कसा म्हणेन..
संदीप ने हे अस मस्करीत बोलून सोनलला relax feel करवण्याचा प्रयत्न केला.. पण सोनल तरीही गंभीर होती.
सोनल: plz,, निट विचार करून उत्तर द्या..
आता संदीप ही थोड्या गंभीर मुद्रेत येऊन म्हणाला..
संदीप: खूप विचार करतेस तू,, तुझा जागी इतर कोणी असती तर ही गोष्ट् संगितली ही नसती मला.. जे नाते बनलेच न्हवते त्याबद्दल बोलने इतर कुणी नक्कीच टाळले असते.. पण तुला तुझे मन साफ ठेवायचे होते.. एखाद्यावर प्रेम करने ही चूक नाहिये, तू कुठेच चुकलेली नाहियेस मग मी तुला का नाकारेन..
सोनल: पण….
संदीप: बर एक सांग आज जर असेच काही मी तुला माझ्याबद्दल संगितले असते तर??? तर तू काय केले असतेस..
सोनल: मी.. काहीच नहीं.. तो तुमचा past होता,, so मी तो मागे सोडून तुमचे भविष्य सुखाचे करण्याचा प्रयत्न केला असता..
संदीप: बस,, मला आजून काही जाणायचे नाहिये.. माला तुमचा मैत्रिबद्दल कसलाच problem नाहिये.. आणी.. अपण उद्याच लग्न नहीं करत अहोत so,, मी तुझा कृष्ण होण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.. जर तुझा मनात मी माझी वेगळी जागा बनवू शकलो तर … तर तू प्रेम करशील माझ्यावर ???
सोनल ने एक नज़र संदीपकडे पाहिले, त्याचा नज़रेत खरेपणा होता.. क्षणभर दोघही एकमेकांचा नज़रेत गुंतले अन अचानक संदीपच्या mobile ring ने भानवर आले.. समीरचा phone होता.. त्याच्याशी बोलून झाल्यावर..
सोनल: बराच वेळ झाला ना इथे,, घरी सर्व वाट बघत असतील.. निघुयात अपण ??
संदीप: Happy ह्म्म्म..
सोनल पुढे चालू लागली.. अन संदीप मागे उभा राहून तीला पाठमोरी जाताना पहात होता..
संदीप: सोना,,,
सोनल ने मागे वाळून पाहिले, तीला ह्या नावाने फक्त तीचे बाबा हाक मारायचे
संदीप: तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नहीं दिलेस … मला घाई ही नहीं आहे.. पण माझ्या बद्दल सांगतो ,, आज आपली ही पहिलीच भेट आहे so मी हे सांगु शकत नहीं की हे प्रेम आहे की नहीं.. कारण प्रेमाची व्याख्या खरच मला नहीं ठावूक आहे पण एक मात्र नक्की आहे की तुझ्यासोबत माझा आयुष्याचा सोहळा साजरा करायला मला नक्कीच आवडेल.. I love to spend my whole life with you..
सोनल गोड हसली,, आणी ते घराकडे निघाले..
***समप्त***
पुढच सांगायला हव का काय झाल असेल ते … आर्थात त्यांच लग्न अनी सुखाचा सौंसार ….
आयुष्या ही कांदेपोहयांसारखे असते ना … चविष्ट..
माग अस्वाद घेत जगुया..

==================================================

3d58tqq01vkt6nef.D.0.Manjari-Phadnis-posing-at-special-photo-shoot-for-Maharashtrian-festival-Gudhi-Padwa-at-her-house-in-Mumbai--1-.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅरेंज मॅरेजचा अनुभव नसल्याने त्या हुरहूर लावणार्‍या लोभस क्षणांचा अनुभव नाही. पण खूप छान मांडलेय मुलीच्या मनातली उलाघाल... स्वप्नवत वाटतंय. पुलेशु

Pages