देखणी कचरेवाली

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 December, 2014 - 05:07

ती सुंदर गोरीपान
नाक डोळे छान असलेली
सुडौल तरुणी
अलीकडेच लग्न झालेली
सौभाग्याची लेणी नवी
देही मिरवणारी
जेव्हा काढू लागे
रस्त्यावरील कचरा
मुन्सिपाल्टीच्या गणवेशात
घेवून खराटा हातात

येणाऱ्या जाणाऱ्या असंख्य नजरा
उंचावत थबकत तिला न्याहाळत
काहीश्या नवलाने अचंब्याने
आणि खूपश्या वैषम्याने
जाता जाता बरेचसे ओठ
उगाचच वाकडे होत

ती सराईतपणे
इकडे तिकडे पहिल्या वाचून
आवरत असे आपले काम
जोडीदारीनीला देत साथ
एक एक ढीग उचलत
ढकल गाडी पुढे सरकवत

अन माझ्या डोक्यात
कुठेतरी ऐकलेले ते वाक्य
पुनःपुन्हा तरळून जाई
“नक्षत्रावानी देखणी
आहे माझी पोर
नक्कीच सजवीन
कुण्या राजाचं घर “!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली.! Happy

अ‍ॅक्चुअली मला कवितांमधील काही कळत नाही, रसग्रहण करता येत नाही, म्हणून औपचारीकता दाखल आवडली म्हणालो नाही.. तर मला विषय आणि आशय आवडला. रिलेट झालाही बोलू शकतो.. रोज ऑफिसच्या दाराशी अशी एक बघतो मी.. आताही वाचतानाच ती डोळ्यासमोर येत होती.. मी पुढेमागे लिहेन यावर नक्की.

धन्यवाद .मित्र हो ! ...ऋन्मेऽऽष वाट पाहतो . ऋग्वेद सहमत आहे ..