संघर्ष ----- जीवनाचा

Submitted by विश्या on 26 December, 2014 - 03:10

!! श्री गणेशा !!
आज खूप दिवसांनी मिनू आणि दीपक राजच्या फोटोचा जुना अल्बम पाहून जोर जोरात हसत होते , त्यांच्या विवाहाला जवळपास १४ ते १५ वर्ष पूर्ण झाली होती . रिया आणि राज हि दोन अप्यते होती या जोडप्याला , हम दो हमारे दो या नियमाने अतिशय आनंदी संसार रंगला होता त्यांचा , दीपक जिल्हा बँकेत म्यानेजर होता तर मिनू एका कंपनीमध्ये Accounts मध्ये होती .
Happy mood.jpgHappy Family 1.jpg
दोन्ही मुलांना शाळेच्या वार्षिक सहलीसाठी पाठवले होते रामोजी फिल्मसिटी हैद्राबाद येथे त्यामुळे कित्येक दिवसांनी एकांत मिळाला होता या जोडप्याला आणि म्हणूनच दोघांनीही आपापल्या ऑफिस ला सुट्टी मारली होती दोन दिवसासाठी आणि हा वेळ फक्त फक्त एकमेकांच्या सहवासात घालवायचा विचार दोनी मनानी करून टाकला होता , सकाळ सकाळी राज चा आवडता टोम आणि जेरी चा प्रोग्राम बघत दोघेही एकमेकाशी उशी फेकून मारायचे युद्ध खेळू लागले होते ( जे नवीन लग्न झाल्यानंतर दोघे खेळत असायचे ) पण या युद्धात हरण्याची जी मज्जा आहे ती कशातच नाही हे तो जाणून मुद्दाम हर पत्करत होता .आणि उशीचा मार सहज झेलत होता त्यात हि एक प्रकाचे प्रेम असते हे तो जाणून होता
अशीच मजा करत असताना मिनुला राज ची आठवण झाली आणि तिने लगेच राज चे वर्गशिक्षक मलगुंडे सर यांना फोन केला आणि राज ची चौकशी करू लागली , कालच्या दिवसात सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सगळ्या गमती आणि राज ची खुशाली जाणून घेतली , सहलीतील स्थळे , जेवण, राहण्याची सोय या सगळ्या गोष्टीची पुन्हा एकदा खात्री करून घेतली आणि फोन कट केला .( राज आता १० वर्षाचा होता पण तो पहिल्यांदाच आई आणि बाबा पासून दूर ते हि ३ दिवस गेला होता काळजी तर वाटणारच आईला .)
फोन झाल्यानंतर अचानक मिनुला राज च्या जन्मवेळची गोष्ट तिला अटवलि सर्वसाधारण पणे कोणतेही मुल ९ महिन्यानंतर जन्माला येत असते , त्यावेळी त्या बाळाची व्यवस्तीत वाढ झालेली असते , पण राज चा जन्म मात्र ८ च्याच महिन्यात झाला होता, मिनुला त्यावेळी होणार्या प्रसूती वेदना
या असह्य झाल्या होत्या , खूप जोर जोरात ओरडत होती मिनू आणि ते पाहून तर दीपक तर हबकलाच होता (काही करा डॉक्टर पण मिनू ला यातून मोकळी करा मला तिच्या वेदना पाहवत नाहीत डॉक्टर त्याच्या या वाक्यावर , डॉक्टरांनी शिजर चा पर्याय सुचवला आणि लगेचच मिनुचे शिजर करून डिलिवरी केली होती , त्या दिवसाच्या आदल्याच दिवशी रिया ला ताप आला होता तो हि जवळपास १०० च्या आसपास होता , रियाला तापाच्या मेडीसिंस देऊन झोपवले होते पण तिने हट्ट केला होता कि मम्मी जवळच झोपणार , झोपेतच रिया ची लाथ मिनुच्या पोटावर बसली होती आणि अचानकच तिला वेदना सुरु झाल्या होत्या , तिच्या पोटाला मार लागल्यामुळे blading सुरु झाले होते आणि वेदनेने असह्य होऊन ती जोर जोरात आरडत होती , दीपक ला तर काहीच सुचले नाही त्याने
Rafik riksha.jpg
रात्री १.४५ च्या दरम्यान रिक्षावाले रफिक चाचाना फोने केला आणि मिनुला लगेच जवळच्या मोहिते इस्पितळात दाखल केले , दवाखान्यातील कम्पौण्डर आणि नर्स यांनी तिला लगेच सलाईन चढवले आणि डॉक्टरांना फोन केला , इकडे मिनू जोरजोरात किंचाळत होती वेदना असह्य होत होत्या , तिला पाहून तर दीपक च्या डोळ्यात पाणी भरले होते आणि तेवढ्यात डॉक्टर आले त्यांनी मिनुला पहले नस चेक आली आणि एक औशादाचा डोस सलाईन मध्ये सोडला . सर्व रेपोर्ट पहिले त्यांनी आणि मला त्यांचा केबिन मध्ये बोलावून घेतले .
hospital.jpg

समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास देऊन म्हणाले त्यांच्या पोटावर कसला तरी मार लागला आहे आणि त्यामुळे बाळ खाली सरकले असल्यामुळे त्यांची आजच्या आज प्रसूती करावी लागणार आहे शिजर द्वारे ,त्यावर दीपक म्हणाल माझी छोटी मुलगी मिनू सोबत झोपली होती आणि तिचीच लाथ लागली असावी , बिचारी मिनू त्यावेळीच मला म्हणत होती आपण इतक्या लवकर दुसरा चान्स नको घ्यायला पण मी स्वार्थी पणे माझाच विचार केला , (त्यावेळी माझे वय ३४ होते आणि या वयात जर दोन अपत्ये झाली तर मला पुढे त्यांचे भविष्यासाठी पुंजी साठवता येईल त्यांना चांगले शिक्षण देत येईल या हेतूने मीच तिला या चान्स बद्दल समजावले होतो पण खर तर रिया अजून खूप छोटी होती २ वर्ष पण झाले नव्हते तिला आणि मी असला मुर्ख पणा केला होता हे आटवून तर दीपक ला अन्कीनच अपराधी फील होऊ लागले होते .) डॉक्टरांनी आवाज दिला मिस्टर दीपक त्यांचे blading खूप झाल्याने "व्यू have to टेक any फास्ट डिसिजन , सिचीवेषण इज क्रिटीकल " दीपक फक्त ऐकत होता , डॉक्टर म्हणाले आपल्याला आजच्या आज शिजर करावे लागणार पण त्या मध्ये पण एक धोका होता बाळाची वाढ पूर्ण झाली नव्हती त्यामुळे पुढचे काहीच सांगता येत नव्हते पण निर्णय तर घ्यावाच लागणार होता , डॉक्टरांच्या पुढे काय बोलावे हेच कळेना , मी तीतूनच त्या वेळेला आईला जी मोठ्या भावाची घरी राहते मुंबई ला तिते फोन केला आणि परिस्तिति समजावली त्यावर आईने पण शिजर करून मिनुला पहिला मोकळी करण्याचा सल्ला दिला , तसा लगेचच फोन ठेऊन डॉक्टरांना शिजर साठी मंजुरी दिली . डॉक्टरांनी मला शिजर चे १३००० रुपये भरायला सांगितले आणि एक फोर्म वर स्वाक्षरी घेतली . त्यानंतर डॉक्टर आत ऑपरेशन थेटर मध्ये गेले आणि मी बाहेर येउन रफिक चाचाना भाडे देऊन घरी जाण्यास सांगितले , चाचा तर जायला तयारच नव्हते पण मी त्यांना सांगितले कि रिया घरी एकटीच आहे तिला त्यांच्या घरी घेऊन जायला सांगितले तसे चाचा दवाखान्यातून निघाले .तेवढ्यात १५ मिनिटात डॉक्टर बाहेर आले आणि काहीसा गंभीर चेहरा करून त्यांनी बातमी दिली तुमाला मुलगा झाला आहे पण आठव्याच महिन्यात डिलिवरी करावी लागल्यामुळे बाळाची वाढ नीट झाली नाही त्यामुळे बाळाला काचेच्या पेटीत ठेवावे लागणार जवळपास एक महिना आणि त्यासाठी एक विशेष रूम असते त्या रूम चे भाडे दिवसाला ३००० हजार रुपये आहे तर तुमाला जवळपास सव्वा ते दीड लाख खर्च येणार आहे तुमी पैस्याच्या तयारीला लागा अमी पुढची प्रोसेस चालू ठेवतो .
Doctors Cabin.JPGGlass cover.jpg
डॉक्टरांनी सांगितलेली रक्कम हि त्या वेळेला जमावाने माझ्यासाठी खूप अवघड होते कारण मी नुकतीच एक दुचाकी घेतली होती . रात्रभर एकाच विचारात दवाखान्यातच बसून होतो , पण बाळाला पहिले तसे दीपक ने ठवले काहीही करून बाळासाठी पैसे जमवायचे आणि या विचारातच त्याचा डोळा लागला . सकाळी जवळपास ७ च्या सुमारास तो फ्रेश झाला आणि त्याने मोठ्या भावाला मुंबई ला फोन केला आणि पैस्याबद्दल व बाळाबद्दल सांगितले, तसे भावाने सरळ सरळ हातच वर केले त्याने आपले रड गाणे चालू केले , मला हा खर्च झाला, नुकतेच शालीची फी भरली, घरात मोठा टी व्ही . घेतला अशी अनेक करणे दिली आणि शेवटी एक वाक्य बोलला हव तर तुला आईच्या नावावर पेर्सोणाल लोन काढून देतो १ लाखापर्यंत तुला हप्ते भरावे लागतील , दादाचे असे वागणे पाहून दीपक तर तीन ताड उडला त्याने नको तुझे पैसे म्हणून फोन ठेऊन दिला .पैसे जमवण्याचे इतर मार्ग पाहू लागला मित्र, नातेवाईक, पण कोणा कडूनच प्रतिसाद मिळेना , शेवटी एक गोष्ट डोक्यात चमकली , आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दीपक ने मिनू ला एक कोल्हापुरी साज केला होता ३.५ तोळ्याचा , आणि ऑफिस मधल्या सर्व स्टाफ ने मिळून एक महिन्याची भिशी काढली होती त्या पैस्यातून सव्वा तोळ्याची चीन केली होती त्या दोनी अलंकारांना गुजरीचा रस्ता दाखऊन आपला हा अलंकार वाचवला पाहिजे आणि यातूनच दीपक ने दवाखान्याचे बिल भागवले होते , आई वडील मुलांना जन्म देण्यापासून ते त्यांचे संगोपन करणे मोठी करणे , शिक्षण देणे , या साठी किती प्रयत्न करतात जीवनाशी किती संघर्ष करतात याचा अनुभव आला होता दीपक आपल्याला . आणि हे सांगत असतानाच मिनुच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत हे हेरूनच दीपक ने तिला आपल्या कुशीत घेऊन तिचे अश्रू पुसू लागला.
Vadal.jpg

आता दीपक बोलू लागला अग वेडा बाई वेळ हा सगळ्या परीस्तीतींचा उपाय असतो , संघर्षा शिवाय जीवनाला काय अर्थ आहे तुला माहित आहे न आपल्या लग्न वेलची गोष्ट . मिनू खर सांगू काय तू पस्तिशीत हि तेव्दीच सुंदर दिसतेस जेवढी आपल्या पहिल्या भेटीत दिसत होतीस , काय ते दिवस ! त्या वेळी तुमी आमच्या गावामध्ये N S S च्या कॅम्प साठी आला होतात आणि मी गावातील एक पतपेढीत कामाला होतो माझे वय त्यावेळी जवळ पास २७ ते २८ होते आणि तू २१ वर्षाची होतीस , मला पतपेढीचा चेरमन हा गावाचा सरपंच असल्यामुळे त्याने मला तुमच्या कॅम्प साठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे काम दिले होते आणि तुमच्या कॅम्प च्या वेळेत मला पतपेढीत सुट्टी दिली होती .तू तुमच्या कॉलेज मधील इतर १०० एक विध्यार्थी आणि ३ शिक्षासोबत कॅम्प ला आली होतीस , आणि पहिल्याच दिवशी मी गहू दळून घेऊन येत असताना अचानक तुझी आणि माझी धडक झाली आणि सगळे पीठ दोघांच्या अंगवर सांडले होते आपले चेहरे बघण्यासारखे झाले होते , ते दृश्य पाहून तुझे सगळे मित्र मैत्रिणी आपल्यावर जोर जोरात हसत होते , सगळे पीठ झाडून घेतले आणि तू पाण्याची ओंजळ तुझ्या चेहऱ्यावर मारलीस आणि मी पहिल्याच नजरेत घायाळ झालो तुला पाहिजे आणि पाहताच राहिलो होतो , इतकी सुंदर परी जर माझ्या आयुष्यात आली तर आपले जीवनच बदलून जाईल , तुझ्या पहिल्या झलक मधेच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तू आहेसच तशी . तीतून पुढे १० आपण एकत्र होतो , मी तुमच्या कॅम्प चाच एक भाग झालो होतो आपल्यात चांगली मैत्री झाली होती पण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे तुला सांगण्याची धाडस काय होईना , कॅम्प चा शेवटचा दिवस आला आपण ग्रुप फोटो काढले त्यातील एक फोटो आजही माझ्याकडे आहे , आणि गावाच्या सरपंचानी भाषण बाजी करून कॅम्प संपला असे जाहीर केले म्हणजे उद्यापासून आपली भेट होणार नव्हती , तू मला दिसणार नव्हतीस या विचारानेच मी हैराण झालो होतो . तुझी ती मैत्र्ण दिव्या साठे तिला मी माझ्याकडून तुला विचारण्याचा प्रस्ताव दिला होता पण तिने तो साफ नाकारला होता आणि आपली टाटा तुट झाली .
NSS Camp.jpg
तीतून पुदाचे दोन दिवस मला काय चालले आहे हेच काळात नव्हते, जेवण जात नव्हते , कि झोप येत नव्हती , सगळी कडे तूच दिसत होतीस , पतपेढीत आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तुझाच चेहरा दिसत होता , मी वेडा झालो कि काय असाच वाटू लागले होते माझे मला , आणि तिसर्याच दिवशी मी पतपेढीला सुट्टी मारून माझ्या हर्कुलास सायकल वरून सरळ तुझे कॉलेज गाठले होते , आपण भेटलो पण दिव्या तुझ्या सोबतच होती काय बोलावे हेच काळात नव्हते पण तुला भेटून जीवात जीव आला होता , असे रोज रोज काम बुडवून तुला भेटायला येऊ लागलो तसा तुला संशय आला होता कि हा रोज का येतोय पण तुला हि मला भेटवस वाटत होत आणि सातव्याच दिवशी, मनाशी घट्ट गाठ बांधून तुला विचारण्याचा निर्णय घेतला होता , बस स्टोप जवळच्याच एक हॉटेल वरती आपण तिघे चहा घेण्यासाठी गेलो आणि तितेच मी तुला एक गुलाबाचे फुल थरथरत्या हाताने देत " I Love You " हे वाक्य बोललो होतो , माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती पण धीर मनात ठेऊन होतो .
Praposal.jpg
तुझे उत्तर ऐकण्यासाठी पण तू त्यावेळी मला त्रास देण्याच ठरवलं होतस बहुतेक , विचार करून सांगते एवढंच बोललीस आणि तुमी दोघी निघून गेलात , त्याच दिवशी मी पातपेधीच काम सोडून दिले होते .
जवळ जवळ ९ दिवस तुझ्या कॉलेज ला येत होतो पण तरी तुझे उत्तर मिळाले नव्हते आणि रोज तुझ्या सोबत ती दिव्या असायचीच पण १० व्या दिवशी तू एकटीच आली होतीस चहा प्यायला आणि अचानक त्या दिवशी तू मला आनंदाचा धक्काच दिला होतास , दीपक " I Love You too " हे एकच वाक्य बोललीस पण माझ्या मनात आनंदाचा पाउस सुरु झाला, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे , ये जिवलग ये, असे अनेक गायक मनात थाट घालून गाऊ लागले , मनातल्या मनात मी थाई थाई नाचत. माझ्या अवती भोवतीचे सगळे जग स्तब्ध झाले होते आणि मी एकटाच स्वप्नातील पावसात नाचत होतो . २२ डिसेंबर होती ना ती तारीख ,,,,, माझ्या आयुष्यात एक स्वप्नपरी आली होती . त्यानंतर जवळ जवळ आपण १३ ते १४ महिने आपले प्रेमाचे नाते कोणत्याही अडथळ्याविना चालू होते आणि तुझ्या शेवटच्या वर्षीच्या शेवटच्या पेपर ला मी तुला सायकल वरून तुझ्या घराच्या मागच्या चौकापर्यंत सोडायला आलो होतो आणि नेमक्या त्याच वेळी तुझ्या वडिलानी जे संज्या नाव्ह्याच्या दुकानात बसले होते त्यांनी पाहिले ,, आणि तीतून पुढे आपल्यात दुरावा तयार होत गेला , तुला त्यावेळी घरी आल्यानंतर मारले पण त्यांनी ! मला हे नंतर कळले होते दिव्याकडून ,,,
rsz_vetal_tekdi_hill_pune.jpg

शुक्रवारी दिव्याकडून तुला दिलेला संदेश मिळाला होता आणि अमी इकडे आपल्या लग्नाची सर्व योजना आखली होती त्यात मला माझ्या मित्रांनी खूप साथ दिली सर्वात जास्त मदत आपल्याला विशाल ची झाली होती ज्याने हिमतीने तुला आणि दिव्याला एकाच बायक वरून घरातून लग्नाच्या मंदिरापर्यंत आणले होते , तो दिवस रविवारचा होता तुला बैठकीला जावे लागत असे आणि म्हनुअच अमी तो दिवस निवडला होता , इकडे मंदिरात लग्नाला लागणारे साहित्य , फुले, हर, अक्षता, वकील , साक्षीदार, मंगळसूत्र हि सर्व तयारी विश्या आणि बाकी मित्रांनी चोख केली होती तर तिकडे दिव्या ने तिचे काम व्यवस्तीत बजावले होते , रविवारी ११ च्या सुमारास दिव्या तुला बैठकीला घेऊन जाण्यासाठी घरी आली तुझ्या वडिलानी थोड्या बहुत चौकश्या करून परवानगी दिली होती , विश्या तर बाईक घेऊन पारावर तयारच होता आणि मोठ्या धाडसाने त्याने तुमाला वडगावच्या महादेव मंदिरापर्यंत घेऊन आला होता आणि तो दिवस १० जून आपण दोघे महादेवाच्या साक्षीने विवाह बंधनात बांधलो गेलो होतो . माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आणि आपल्या नवीन जीवनाची सुरवात चार मित्रांच्या साक्षीने केली होती . दुपारी १२.४५ चा मुहुर्त्वर आपण पती पत्नी सात फेर्यांच्या बंधनात सात जन्माची साथ देण्याची वचने देऊन बांधलो गेलो होतो .
Mahadev Mandir.jpgMarriage.jpg
एक ग्रुप फोटो काढला तर एक फक्त “वर वधूचा “ आणि आपण तुझ्या वडिलांना फोन केला , तुझी तर धाडस झाली नव्हती सांगायची म्हणून मीच सांगितले ......" मी दीपक , कुंभाराचा ! ..... मी आणि मिनूने आज ल .... लग्न केले आहे आणि तुमचा आशीर्वाद हवा आहे ,,,,,,,,,,, ब्ब्ब्ब्बास एवढाच ऐकले त्यांनी आणि चक्करच आली होती त्यांना ,,,,,,, पण खूप चिडले , बडबडू लागले , केस करण्याची धमकी हि देत होते पण त्यांना सांगितले अमी दोघेही कायद्याने सद्नान आहोत , विवाह हि रजिस्टर केला आहे त्यामुळेत्रागा न करून घेता आमाला आशीर्वाद द्या , पण तुझ्या वडिलांना हा धक्का सहनच झाला नव्हता , त्यांनी फोन वरूनच तुला सांगितले आजपासून तुझा आणि आमचा काही संबंध नाही , तू आमच्य्साठी मेलीस आणि अमी तुझ्यासाठी ........... आणि फोने खन्न दिशि आपटला , लगेच दुसरे पर्व चालू होणार होते , आपण दोघेच वर वाढू पोशाखात माझ्या घरी गेलो तर माझ्या बाबांनी आपल्या दोघांना घरात पण घेतले नाही , माझ्या कमाई वर तर ते कायमच बोलत असायचे पण त्या दिवशी तुझ्या समोर पण त्याच कारणावरून बोलले आणि हाकलून दिले घरातून , कसलेही भांडवल , साहित्य, घर , यातीलच काहीही जवळ नसताना आपण एका १० x १० च्या खोलीत राहून संसाराला सुरवात केली
Room.jpg
त्यात हि विश्या आणि दिव्या यांनीच मदत केली होती , आणि लगेचच २ महिन्यात मला जिल्हा बँकेच्या नोकरीचा call आला आणि मी रुजू हि झालो . तू लक्ष्मीच्या रूपाने माझ्या घरी आली होतीस . आणि बघता बघता आपल्या लग्नाला १४ ते १५ वर्ष पूर्ण झाली त्यात आपल्याला दोन गोंडस मुले हि झाली आणि आज राज पहिल्यांदा सहलीसाठी बाहेर गेला तर एक एक क्षण सुधा आठवण आल्याशिवाय राहवत नाही .
खरोखर जीवन हे एक संघर्षाच आहे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो पण मिळणाऱ्या फळातून समाधान हि तितकेच मिळते .
Happy Family.jpg

( हि कथा इथे लिहिण्याचे कारण -- मागच्या आठवड्यात , धनकवडी पुणे येथे एक १० वर्ष्याच्या मुलाने फक्त जर्किन दिले नाही म्हणून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली . आई वडील जीवाचे रान करून मुलांना वाढवतात त्यांच्या इच्छे साठी स्वताच्या आवडी निवडी सुधा जोपासत नाहीत , आणि मुले अचानक एकाद्या हट्टापायी जीवन संपवतात , काय तीळ तिळात झाला असेल त्या आई वडिलांचा . माझा सर्वाना एकच संदेश आहे संघर्ष करा आणि ध्येय साध्य करा आपण कधीही अत्म्हात्यासारखा पर्याय निवडू नका )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. आवडली!एका दमात वाचून काढली

<<माझा सर्वाना एकच संदेश आहे संघर्ष करा आणि ध्येय साध्य करा आपण कधीही अत्म्हात्यासारखा पर्याय निवडू नका )>.हे पण आवडले आणि पटले.