PK

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

चित्रपट एकदा आवर्जून बघा.

यात PK बद्दल स्पॉयलर्स आहेत. केवळ रिव्युज वाचून मतं बनवणाऱ्यानी वाचल्यास हरकत नाही.

PK हा एक हलकाफुलका पण मार्मीक प्रश्न विचारणारा चित्रपट आहे. स्युडो-साय-फाय म्हणता येईल इतपत त्यात एलियन्सचा वापर केला आहे. पण एलियन्सवरील ही पॅरोडी नाही - या एलियन्सना सुपर-पॉवर्स नसतात, आणि त्यांची अंगकाठी आपल्यासारखीच असते. आपल्या आंत्रपुच्छाप्रमाणे बहुदा त्यांचे अोठ (आणि सुपासारखे कान?) असतात - मुख्यत: डिफन्क्ट. केवळ टेलेपॅथिकली एकमेकांचे विचार जाणणे मात्र शक्य नाही - काय भुगा/कचरा होईल त्या मेंदूचा! पण वर म्हंटल्याप्रमाणे एलियन्स हे एक केवळ डिव्हाईस म्हणून वापरलं आहे. संपूर्णपणे तिऱ्हाईताची दृष्टी दाखवता यावी म्हणून.

विचारलेले प्रश्न धार्मीक अंधप्रथांबद्दल आहेत. धर्माबद्दल नाही. अनेक धर्मांतील प्रथांबद्दल कमी जास्त प्रमाणात तसं केलं आहे. देवत्व कुठेच नाकारलं नसल्यानी त्याला निरिश्वरवादीही म्हणता येणार नाही. विनोदी अंग असलं तरी थोडा प्रिची नक्कीच झाला आहे. अमीर खान असल्यानी ‘सत्यमेव जयते’ची आठवण येते, पण यात त्याचा हात नसावा - कारण डायरेक्टर ते सर्व पाहणार. पाकीस्तानी मुलाचा अॅंगल घेऊन सेक्युलरीजमचा (योग्य) ताशादेखील पिटला आहे. पण त्यामुळे अर्थातच आणखी काही लोकांच्या पोटात दुखलं.

अनेक लोकांनी हिरानी-खान चित्रपट असून असा म्हणून त्याला कनिष्ट दर्जा दिल्याचं जाणवतं. वाटल्यास दोन रेटींग्स द्यावे: चित्रपट कसा आहे, आणि हिरानी/खानचा म्हणून चित्रपट कसा आहे. (वाटल्यास Paul/OMG च्या तुलनेत कसा असे तिसरे).
गाण्यांबाबत हात थोडा आखडता घेतलेला चालला असता.

मला PK लोकांना विचार करायला उद्युक्त करेल असं वाटलं. काही जणं कदावित करतीलही.
आम्ही PK पाह्यला त्या ग्रूप मध्ये कोणत्यातरी साधूबाबांना मानणारी पण एक व्यक्ति होती. तिलाही चित्रपट आवडला.
‘मग, आता XYZबाबांकडे जाणं बंद का’?
‘छे, ते तसे नाहीत’.
‘आपले’ तसे कधीच नसतात. आणि तोच आपला आणि चित्रपटाचा परभव आहे.

चित्रपट एकदा आवर्जून बघा.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आपले’ तसे कधीच नसतात. आणि तोच आपला आणि चित्रपटाचा परभव आहे.
>>>>>>
+७८६
सहमत
मागेही मी एके ठिकाणी म्हटले होते. श्रद्धाळू-अंधश्रद्धाळू बनणे हि एक वृत्ती आहे. आपण भक्त असलेल्या बाबांचे ढोंग पकडले गेले तर आपण काय करतो........... तर दुसरा बाबा पकडतो!
आपले डोळे उघडतात.... पण दुसरे श्रद्धास्थान शोधण्यासाठी, तेवढ्यापुरतेच.

यामागचे कारण शोधायला जाता, या लेखातीलच वाक्य डकवतो.
>>>>>> एलियन्स हे एक केवळ डिव्हाईस म्हणून वापरलं आहे. संपूर्णपणे तिऱ्हाईताची दृष्टी दाखवता यावी म्हणून. >>>>>
अंधश्रद्धाळू लोक हि तिर्हाईकाची द्रुष्टी कुठून आणनार? आपली ती श्रद्धा आणि दुसर्‍याची ती...

तरीही मी याला चित्रपटाचा पराभव नाही म्हणणार, त्यांनी बरोबर समाजाची नस ओळखून आपला व्यवसाय केला. Happy

>> एलियन्स हे एक केवळ डिव्हाईस म्हणून वापरलं आहे. संपूर्णपणे तिऱ्हाईताची दृष्टी दाखवता यावी म्हणून.
आस्चिग, अगदी! Happy

खरंतर ते संदिग्धच ठेवलं असतं (ऋषीचं कूळ न्यायाने) तर मग काही प्रश्नच राहिला नसता. स्पेसशिप वगैरेच्या भानगडीत पडायलाच नको होतं, कारण तिथे सिनेमा येडपट वाटतो. तो क्लेम करतो मी एलिअन आहे - इतकं पुरलं असतं त्रयस्थ दृष्टीकोन दाखवायला. (जसं मुन्नाभाई२ला 'केमिकल लोच्या' झाल्याची शक्यता सिनेमानेच वर्तवली असली तरी मेसेज पोचतोच, तसंच.)

हॅविंग सेड दॅट, सिनेमा प्रचंड मनोरंजक आहे, आणि त्यांनी मूलभूत प्रश्न सोप्या भाषेत विचारले आहेत - जे हिरानी नेहमी करतो. प्रबोधन कोणाचं आणि किती होईल हा मूलभूत प्रश्न अलाहिदा. Happy

तो जर एलिअन आहे आणि त्याला हे माहीत आहे तर स्वतःचा धर्म कोणता ? हे का बरे शोधत बसलेला ? का कपडे काढुन माझ्यावर "शिक्का" नाही दाखवत होता?

>>> ‘आपले’ तसे कधीच नसतात. आणि तोच आपला आणि चित्रपटाचा परभव आहे. <<<
हे वाक्य सोडले, तर बाकी सर्व मजकुरास अनुमोदन, सहमत.
चित्रपटात (निव्वळ सोईस्कररित्याच) सांगू/दाखवू पाहिलेल्या ढोंगांचा तितकासा परिणाम झाला नाही म्हणून पराभव चित्रपटाचा असे म्हणू शकतो, तुम्ही स्वतःचाही आहे असे म्हणू शकता पण "आपला" असे सरसकट म्हणू नाही शकत. कारण त्या "आपल्यात" मी स्वतःला मोजत नाही.
समाज ढोंगी असतो, व त्यास धर्माचे निव्वळ निमित्त मिळते, पण म्हणून धर्माचे मूळ तत्त्वज्ञानच "ढोंगी/त्याज्य" असा निष्कर्ष मी काढू शकत नाही, त्यामुळे चित्रपटात विचारलेल्या प्रश्नांनी काही काळ निरुत्तर झाल्यासारखे वाटले तरी माझी माझ्या धर्मावरील श्रद्धा अढळ आहे, अन म्हणुनच तो असलाच तर चित्रपटाच्या गल्लाभरणे या व्यतिरिक्तच्या प्रचारी उद्दिष्टांचा पराभव असू शकेल. मी निधर्मी/सर्वधर्मसमभावी वगैरे नसल्याने तुमच्या वरील वाक्यातील "आपल्यातिल" माझा पराभव नाही.
अन माझा धर्म मला अधिक सखोल शिकायचा झालाच तर मला त्यातिल ज्ञानी व्यक्तिकडेच जावे लागेल, जी कदाचित "बाबा/बुवा" या स्वरुपातही असेल (डीएड्/बीएड वा कोणतेही सरकारी मान्यता असलेले शिक्षण घेतलेल्याकडून मलाच काय कुणालाही धर्म समजणार नाही याची १०१ टक्के खात्री असल्याने बाबा/बुवांकडे जाण्यावाचून पर्याय नाही. येच ठिकाणी सांगु पहातो की सरकारनेच धर्मशिक्षण देणे व घेणे सक्तिचे करावे म्हणजे बाबा/बुवांचे प्रस्थ(?) माजणार नाही)
बायदिवे, व्यवसायचे जागीचे माझे टोपणनावही "बुवा" असेच आहे, बर्का ! Lol

अरे वा, आश्चिग साहेबही असले चित्रपट पाहतात तर..... Happy

लिंबु, वर तुम्ही लिहिलेले जरी योग्य असले आणि तुम्ही त्या "आपले" कॅटेगरीत मोडत नसलात तरी लोकसंख्येचा महापुर आलेल्या या देशात तुमच्यासारखे जसे ढिगानी आहेत तसे बाबामय भक्तही ढिगानी आहेत.

आश्चिगनी वर लिहिलेय की विचारलेले प्रश्न धार्मीक अंधप्रथांबद्दल आहेत. धर्माबद्दल नाही. मला वाटते तुमच्या "समाज ढोंगी असतो, व त्यास धर्माचे निव्वळ निमित्त मिळते, पण म्हणून धर्माचे मूळ तत्त्वज्ञानच "ढोंगी/त्याज्य" असा निष्कर्ष मी काढू शकत नाही" या विधानातुन तुम्हीही हेच म्हणू पाहताय. चित्रपटाची जी काय परिक्षणे वाचलीत त्यामध्येही आंधळेपणावरच वार केलेत हेच अधोरेखित केलेय. मूळ धर्मावर कुठे वार केलेत? एनी वेज, मी शनीवारी चित्रपट पाहिन तेव्हा मलाही कळेल नक्की कशावर वार केलेत ते. ओह माय गॉड मी पाहिलेला नाही.

<<पाकीस्तानी मुलाचा अॅंगल घेऊन सेक्युलरीजमचा (योग्य) ताशादेखील पिटला आहे. पण त्यामुळे अर्थातच आणखी काही लोकांच्या पोटात दुखलं.>>

हे नाही पटलं. मुळात जग्गू त्या बाबाची (तपस्वी) भक्त नसतेच. तिला तपस्वी आवडत नसतो व ती त्याच्या स्पेलखाली नसते. त्यामुळे तपस्वी म्हणाला की सर्फराझ धोका देईल म्हणून तिलाही तसंच वाटलं हे पटलं नाही. त्यांचा जो काही गैरसमज झाला (एकमेकांचं हस्ताक्षर ओळखता न येणं, तिसर्‍यानेच लिहिलेलं लेटर स्वतःसाठी आहे असं खात्रीलायकपणे वाटणं) तो त्या दोघांचाच दोष. दोघांचे बेल्जियममध्ये कोणी फ्रेन्ड्स नाहीत, लग्नाला सोबत तिसरी व्यक्ती आणली नाही हेही विचित्रच.
एकवेळ इंडियन मुस्लिम जावई घरचे स्वीकारतील पण पाकिस्तानी मुलगा म्हटल्यावर घरच्यांना मुलीची किमान काळजी वाटणारच. आपल्याकडे लग्नानंतर मुलीने मुलाकडे जायची पध्दत आहे. मग मुलगी पाकिस्तानात गेल्यावर तिला हिंदू म्हणून जगता येईल, का मुस्लिम व्हावं लागेल, मनासारखं करीयर करता येईल का, बेल्जियममध्ये तोकडया शॉर्ट्स घालून फिरणारी मुलगी पाकिस्तानात तशी फिरु शकेल का तिला हिजाब, बुरख्याआड बंदिस्त व्हावं लागेल- हे प्रश्न पडणारच. आणि हे प्रश्न हिंदू मुलीने निवडलेला मुलगा अमेरिकन ख्रिश्चन असेल तर पडणार नाहीत कारण अमेरिकन नवरा व अमेरिकन समाज बायकोला तितकं स्वातंत्र्य देतो. म्हणजे इथे प्रश्न पडतात ते इस्लामच्या रिजिडिटीमुळे व पाकिस्तानी समाजाच्या स्त्रीबद्दलच्या मध्ययुगीन दृष्टीकोनामुळे. हिंदु सेक्युलरच आहेत. पाकिस्तानी सेक्युलर नाहीत म्हणून तिथे मुलगी दयायला घाबरतात. (अगदी सानिया मिर्झाने ती व नवरा दोघेही मुस्लिम होते तरी सांगितलं की पाकिस्तानतर्फे खेळणार नाही आणि सेटल दुबईत होणार, पाकिस्तानात नाही!)
पण या प्रश्नांची उत्तरंच सिनेमात टाळली आहेत. शेवटी सर्फराझ भारतात बुक रिडींगला उपस्थित दाखवला. जग्गूचं नाव सहानीच दाखवलं पुस्तकावर. म्हणजे पुढे लग्न झालं का, का सर्फराझच इंडियात शिफ्ट झाला- काही कळलं नाही.

वेदिका इतके प्रश्न मला पडले नाही पण जग्गुची लव्हस्टोरी सेक्युलर आहे नाही पेक्षाही ती अनबिलीव्हेबल आहे म्हणून बोअर वाटली. वडिलांनी 'नको' म्हणता क्षणी मुलगी एलोप होण्याची तयारी करणे हे फारच इम्पल्सिव्ह आहे. दुखात सुख एवढच - शेवटी सर्फराजशी लग्न झाले नाही झाले पेक्षाही 'लेफ्ट अॅट दि अॅल्टर' ह्या ट्रॉमॅटीक सिच्युएशनला त्यांना क्लोजर मिळाले, मैत्रीपूर्ण सम्बन्ध चालू राहिले एवढे दाखवले ते प्रेक्षकांना पुरेसे आहे.

भाग २ मध्ये - अनुष्का आणि रणबीरचे, भोजपुरी बाई आणि अमीर (एलियनला चांगले कुळ-बीळ पंचायती नसाव्या), सुशांत आणि एम्बसीतील बाई (रोज त्याचा फोन घेणारी खरच सोशिक!!) अशी लग्न दाखवले तर चांगले Wink