अमिताभ व कबुलीजबाब

Submitted by उडन खटोला on 23 December, 2014 - 13:28

नुकतेच जुने जाणते सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात असे कबूल केले की सन २००० मध्ये त्याना टीबी रोग झाला होता ,परंतु उपचार घेवून त्यानंतर ते पूर्ण बरे झाले .तरी टीबी च्या पेशंट नी /परिवाराने हताश न होता पेशंटवर पूर्ण उपचार करून घ्यावेत . हे वाचल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले . \

अमिताभ यांनी ही गोष्ट इतके दिवस लपवून का ठेवली ? याआधी मला आठवते त्यानुसार २००० सालच्या दरम्याने त्यांची तब्येत बिघडून हॉस्पिटल मध्ये admit झाले होते व त्यानंतर काही काल सिनेमा/ टीव्ही पासून दूर होते .(त्याच वेळी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम अमिताभ ऐवजी शाहरुख खानने सादर केला होता ) त्यावेळी आजाराचे कारण पोटदुखी अथवा तत्सम काहीतरी सांगितले गेले होते . याचाच अर्थ टीबी रोगाबद्दल एकूण समाजात असलेले भय अथवा तत्सम भावना आणि टीबी पेशंट ना मिळणारी वागणूक (संसर्गजन्य असल्याने ) यामुळे कुठेतरी " आपल्याला टीबी आहे". हे सांगणे किंवा जाहीर करणे कमीपणाचे वाटले असावे का ? कारण तसे जाहीर झाले असते तर त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असता का ?किंवा त्यानंतरच्या काळात त्यांच्याबरोबर काम करणार्या इतर अभिनेते/अभिनेत्री यांचा approach बदलला असता का ? किंबहुना एकूणच "अमिताभ" या नावाभोवती असलेले लोकप्रियतेचे वलय कमी होईल या भीतीने इतके वर्षे ही बाब लपवून ठेवली होती का?

आपणास काय वाटते ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलजार यांच्या तथाकथित जबाबामुळे समाजमनावर जे परिणाम होतात त्यावर धागा काढा एखादा.

याचाच अर्थ टीबी रोगाबद्दल एकूण समाजात असलेले भय अथवा तत्सम भावना आणि टीबी पेशंट ना मिळणारी वागणूक (संसर्गजन्य असल्याने ) यामुळे कुठेतरी " आपल्याला टीबी आहे". हे सांगणे किंवा जाहीर करणे कमीपणाचे वाटले असावे का ?
>>>>>>>

अमिताभ यांच्यावर नो कॊमेंटस पण टीबी वर आणि समाजावर मत व्यक्त करतो.

टीबी हा एडस वा एखादा गुप्तरोग असल्यासारखे वरील विधानातून वाटतेय, ज्याची लाज वाटावी. लहानपणी आमच्याईथे एका माणसाला टीबी झालेला तेव्हा लहान मुले त्याच्यापासून दूर राहायचे हे आठवतेय. पण तोच फारसा कोणामध्ये मिसळायचा नाही. संसर्गजन्य आजार असेल तर रुग्णाने स्वताच हि काळजी घेणे उत्तम. कि प्रश्न सुटला. लाजायचे काय त्यात. कमीपणाचे वाटणे म्हणजे आणखी काहीतरीच.

बायदवे, घरातले यावेळी कसे राहतात, त्यांना भिती नसते का? त्यांचा संपर्क तर सतत असतोच. काय उपाययोजना करतात... घरात वेगळी सोय करावी लागते का? छोट्या घरांमध्ये हे किती कठीण होत असेल.

फुम्फुसांनचा (लन्ग्स) टिबी असतो तसाच आतड्याचा (ईन्टेस्टाईन) टिबी सुद्धा असतो. त्यात पोटात दुखते, आतड्याला अल्सर वगैरे होते. जास्त प्रकाश वैद्यकीय जाणकारच टाकतील, आपले जरासे सामान्य ज्ञान

एकूण काय, तर आजार लपवला तरी नंतर प्रकरण अंगाशी येतंच हे एकदा मजबूर मधे अनुभवल्यावरही बच्चनने त्यातून काहीच धडा घेतलेला दिसत नाही!

केबीसी अमिताभच्या आजाराने शाहरूखकडे दिले ते बरेच नंतर (आत्ताच विकी चेक केले - २००७ मधे). २००० मधे तर केबीसी सुरू झाले. त्यामुळे त्याचा याच्याशी काहीच संबंध नाही.

दुसरे म्हणजे केबीसी ज्यामुळे तो पूर्ण करू शकला नाही त्या आजाराच्या वेळेस तो हॉस्पिटल मधे होता व २४ तास मीडिया वॉच होता त्याच्या आजारावर. तेव्हा कोणता आजार झाला आहे वगैरे लपून राहू शकलेच नसते.

याव्यतिरिक्त पब्लिक मधे डिक्लेअर केले नाही म्हणजे इतर कोणालाच माहीत असेल असे नसते. सहकलाकारांना नक्कीच तेव्हा माहीत असेल. किमान वैद्यकिय कारणाने तरी.

ठेतरी " आपल्याला टीबी आहे". हे सांगणे किंवा जाहीर करणे कमीपणाचे वाटले असावे का ? >>> :). हे मुळात लोकांना कशाला सांगायला पाहिजे?

टी बी हा रोग टी बी च्या जिवाणुंपासुन होतो.

टी बी चा मुख्य प्रादुर्भाव फुफ्फुसाना होतो. फुफ्फुसात हे टीबीचे जंतू टी बी चा फोकस तयार करतात. त्यावेळी दीर्घकालीन खोकला, भूक मंदावणे , खोकल्यातुन बडखा , क्वचित रक्तमिश्रित बडखा , संध्याकाळचा बारीक ताप , वजन घटणे अशी लक्षणे आढळतात. क्वचितप्रसंगी छातीत पाणी होते. प्लुरल इफ्युजन.

फुफ्फुसाला बाधा झालेले रुग्ण हे महत्वाचे असतात. कारण खोकला , थुंकी , शिंकणे याद्वारे ते जंतुंच्या प्रसाराला कारणी भूत होतात.

पण एकदा टी बी चे जंतु शरीरात गेले की ते इतर अवयवांकडे जाऊ शकतात .. जसे की हृदयाचे आवरण , डोळा , मेंदु , स्वरयंत्र , आतडी , लसिका ग्रंथी , मणके , इतर हाडे , जननेण्द्रिये ... ( म्हणजे संपूर्ण शरीरच की ! )

इतर अवयवाना टी बी झाला की त्याचे निदान कठीण असते. कारण फुफ्फुसाचा टी बी ची लक्षणे , निदान व उपचार त्यामानाने सोपे असतात. फुफ्फुसाच्या टी बी साठी छातीचा फोटो व बडका तपासणी करावी लागते. याशिवाय रक्ताच्या तपासण्या इ एस आर , स्किन टेस्ट वगैरे वापरतात.

इतर अवयवांसाठी एक्स रे , सोनोग्राफी , सी टी स्कॅन उपयोगी पडतात . गळ्याजवळच्या टीबीच्या गाठींचा तुकडा तपासुन त्यात जंतुंचे दर्शनघडु शकते.

बडखा , गाठीचा तुकडा हे सँपल वापरुन कल्चर व सेन्सिटिविटी टेस्टही करता येतात. पण हे रिपोर्ट यायला काही आठवडे लागतात. त्यामुळे सुरुवातीच्यi उपचारात यांचे महत्व शून्यच असते. या रिपोर्टवरुन नंतर उपचारात बदल होउ शकतस्त.

....................

अ‍ॅच आय व्ही , मधुमेह , कुपोषण यात टीबीची शक्यता वाढते. प्रत्येक टीबीचा रुग्ण एच आय व्ही साठी व प्रत्येक एच आय व्ही रुग्ण टीबीसाठी तपासावाच लागतो.

.......

टीबीवर खाजगी व सरकारी दोन्ही ठिकाणी उपचार आहेत. खाजगी गोळ्या रोज खाव्या लागतात.

सरकारी कोर्स डॉट्स या नावाने सर्वत्र मिळतो. त्यात एक आड एक दिवस गोळ्या असतात.

दोन्ही उपचार तितकेच गुणकारी आहेत. पण कोणताही कोर्स पूर्णपणे घ्यावा. अर्धा हा अर्धा तो , असे करु नये.

कालावधी ... ६ म ते २ वर्षे.

योग्य उपचारानी टी बी पूर्णपणे बरा होतो.
...............

औषधे अर्धवट घेतल्यास टीबीचा जंतू मुर्दाड होतो व उपचाराना दाद देत नाही. त्याला मल्टी ड्रग रसिस्टन्स = एम डी आर टीबी असे म्हणतात. त्यावर रिजर्वला ठेवलेली विशेष औषधे वापरावी लागतात. अशाआ टीबीच्य निदानाला थुंकीचे सँपल घेऊन जीन एक्सपर्ट टेस्ट करतात. काही सरकारी दवाखानात ही टेस्ट फुकट होते. खाजगीत केली तर तीन हजार खर्च आहे.
खाजगीत यांची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. शिवडीच्या सरकारी टीबी रुग्णालयात ही औषधे मिळतात.

............

आता वळुया टीबी आणि बच्चन !

टी बी हा प्रामुख्याने गरिबी , घनदाट लोकवस्ती , घरात खेळती हवा नसणे यामुळे होणारा आजार आहे.

पण टीबीचे जंतू सर्वत्र असतात. त्यामुळे टीबी कुणालाही होऊ शकतो.. आणि कुणावाटेही पसरु शकतो. सतत ए सी गाडी वापरणार्‍या अती श्रीमंत माणसाला टीबी होऊ शकतो. गाडीच्या काचा तर बंद होत्या ! जंतू गेला कुठुन ? ड्रायव्हरच्या फुफ्फुसात टीबीचे जंतू होते !

त्यामुळे माधवराव पेशवे , गोपाळ गणेश आगरकर , कविवर्य भा रा तांबे , सायन हॉस्पिटलचे डॉक्टर , बच्चन ... कुणालाही टीबी होऊ शकतो.

भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदी गोपाळ जोशी यांचाही बळी टीबी ने घेतला. परदेशात जाऊन त्याना शिक्षण घेअत असताना त्याना टीबी झाला. त्या भारतात परतल्या ते गंभीर टीबी घेऊनच आणि एकही रुग्ण न पहाताच त्या कालवश झाल्या.

त्यामुळे टीबी च्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणे व इतरानी खबरदारी घेणे दोन्ही महत्वाचे आहे. टीबीच्या सान्निध्यात वावरणार्‍या लोकानी व टीबीच्या रुग्णानीही मास्क वापरावा. सर्वाणेअ‍ॅ सकस आहार घ्यावा.

आमच्या एच आय व्ही रुग्णात टीबीचा आढळ सुमारे वीस टक्के आहे. त्यामुळे मास्क कंपल्सरीच आहे. रुग्णानाही व स्टाफलाही.

tb.jpg

>>आमच्या एच आय व्ही रुग्णात
म्हणजे Uhoh

ये काउ(न) डॉक्टर हैं ? ये काउ(न) डॉक्टर हैं ?
(ये कौन चित्रकार हैं च्या चालीत वाचावे) Happy Light 1

काऊ,
छान माहिती,
मला देखील आतड्याचा टिबी झालेला .... असे निदान डॉक्टरने केले होते.. तपासणी पद्धत कोलोनोस्कोपी केली होती.. उपचार म्हणून ९ महिन्यांचा कोर्स केला, पण बरा नाही झाला.. मग निदान केले तो टिबी नसून दुसरा आजार आहे!

ठेतरी " आपल्याला टीबी आहे". हे सांगणे किंवा जाहीर करणे कमीपणाचे वाटले असावे का ? >>> स्मित. हे मुळात लोकांना कशाला सांगायला पाहिजे? <<< फारेण्ड, अनुमोदन.

-------------
बायदवे, घरातले यावेळी कसे राहतात, त्यांना भिती नसते का? त्यांचा संपर्क तर सतत असतोच. काय उपाययोजना करतात... घरात वेगळी सोय करावी लागते का? छोट्या घरांमध्ये हे किती कठीण होत असेल. <<< तुमच्या पुढच्या पोस्टनुसार तुम्हाला हे ठाऊक असेलच.

उपचार म्हणून ९ महिन्यांचा कोर्स केला, पण बरा नाही झाला.. मग निदान केले तो टिबी नसून दुसरा आजार आहे! >>

त्या डॉक्टरला ९ महिन्यानंतर कळले दुसरा आजार आहे ? Uhoh

दुसरे म्हणजे केबीसी ज्यामुळे तो पूर्ण करू शकला नाही त्या आजाराच्या वेळेस तो हॉस्पिटल मधे होता व २४ तास मीडिया वॉच होता त्याच्या आजारावर. तेव्हा कोणता आजार झाला आहे वगैरे लपून राहू शकलेच नसते.>>>> काय सांगू तुम्हाला त्या रम्य आठवणी. दोन दिवस लीलावतीच्या दाराबाहेर काढले. त्यात परत ब्रेकिंग मिळाली की परत इकडे तिकडे धावायला लावायचे ते वेगळेच.

रच्याकने तेव्हादेखील हा आतड्याचा आजार आणि टीबीचा एक प्रकार हे मीडीया आऊट झालेलेच होते.

तुमच्या पुढच्या पोस्टनुसार तुम्हाला हे ठाऊक असेलच.
>>>>
गजानन, आतड्याचा टीबी संसर्गजन्य नसतो.

त्या डॉक्टरला ९ महिन्यानंतर कळले दुसरा आजार आहे ?
>>>>
त्यात डॉक्टरचा दोष नाही, दोन्ही आजारांची लक्षणे सेम असतात, त्या दुसर्‍या आजाराला टीबी पासून वेगळे ओळखायचा ईतर कोणताही मार्ग नाही. (सध्याही माझे रक्त घेऊन संशोधन चालूय, तो ओळखायचा कसा यावर) असो, त्यामुळे डॉक्टर आधी वर्षभर टीबीची ट्रीटमेंट देतात आणि मग त्याने पेशंट बरा नाही झाला तर समजायचे की टीबी नसून तो दुसरा आजार आहे. तो जरा दुर्मिळ आजार आहे. माझ्यासारखाच लाखात एक Wink डॉक्टर मला म्हणालेला की जर तुला तो आजार नसून फक्त टीबीच निघाला तर आपण पेढे वाटू.. पण तकदीर आपली आपली Happy

नंदिनी एक तरी चानस सोडत जा की मी कशी मोट्या लोकांबा ओळखते ते लिहायचा अजबच बै एकेक आक्रस्ताळेपणा कराल आता अशी अपेक्शा

नंदिनी त्याच वेळेस बहुधा तो जेव्हा हॉस्पिटल मधून बाहेर पडला तेव्हा मीडियाला व पब्लिकला बघून एकदम हसर्‍या चेहर्‍याने हात दाखवतानाचीही क्लिप फेमस झाली होती. सतत दाखवत होते टीव्हीवर.

काउ,
छान माहिती.. पण तूम्ही असे निमित्त न घेता स्वतंत्रपणे लिहित जा.
टि,बी. मेंदूत गेल्याने आमच्या सोसायटीतल्या एक महिला अनेक वर्षे अंथरुणाला खिळल्या होत्या. त्यांना एरवी हिंडते फिरते बघितलेले होते, पण आजारपणात बघू नाही शकलो.

अमिताभने गरज नसताना आता जाहीर केलेय खरे. पण त्या पेक्षा काउनी दिलेली माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी.

>>>> अमिताभ यांनी ही गोष्ट इतके दिवस लपवून का ठेवली ? <<<<
हा प्रश्नच अतार्किक अस्थानी असभ्य असा आहे.
तुमच्या ढुंगणाला गळू झाल्यास तुम्ही जगाला सांगत सुटता का की "मला गळू झालय हो ह्या हिथे?"
माणसाला, अन खास करुन पुरुषमाणसाला तर साधी ठेच लागली अन कळवळायची पाळी आली तरी तो दु:ख आवरून काही झालेच नाही असे चारचौघात दाखवतो. अगदी तशीच ही कॉमन/सर्वसाधारण मनुष्य स्वभावाची बाब आहे की अमिताभ त्याला झालेल्या रोगाबद्दल चारचौघात (वा तुम्हाला) सान्गायला गेला नाही.

मूळात सेलिब्रिटी(?) (त्यान्ना आपणच सेलिब्रिटी बनवतो, त्यान्च्या हगल्यापादल्या गोष्टींची चर्चा करीत, असे माझे मत) च्या बारीकसारीक बाबींची "जाहीर' चर्चा करण्याची गरज भासणे, हे स्वतःवरच मानसोपचार तज्ञाकडून उपचार करवून घेण्याची वेळ आल्याचे निदर्शक आहे असे मी मानतो.
ही माझी मते आहेत. कुणाला पटावीत/पटतील अशी अपेक्षा नाही.
बाकी तुमचे चालुद्यात.

२००० सालातल्या गोष्टी उकरून काढण्यात काय हशील ?
त्यावेळी त्यांना झाला असेल टीबी किव्वा नसेलही पण त्याने आत्ता काय फरक पडतो? Happy
असेल त्याने दिलेला कबुली जवाब पण तरीही Happy

२००० साली अमिताभ आणि शाहरूखचा मोहोब्बते आला होता.
ते पाहता शक्य नाही वाटत हे! अश्या परिस्थितीत अमिताभ हा शाहरूखबरोबर काम नाही करणार.

तुमच्या ढुंगणाला गळू झाल्यास तुम्ही जगाला सांगत सुटता का की "मला गळू झालय हो ह्या हिथे?"
<<
Lol

*

महेश,
ते जामोप्या आहेत.