P K..!! राँग नंबर कि राईट नंबर?

Submitted by ऋग्वेद on 22 December, 2014 - 07:55

कनफुजन है ससुरा ई पिचरवा दैख के.. कभी ये राँग कॉल लगत है तो कभी राईट कॉल... इ तो हमैपे दिपेंन्द करत है के हम कोनसावाला भगवान को कॉल लगावत है... इ गोलामा इतने गॉड लोगोंका इतना मैनेजर है...पर ससुरा कौनो राईटवाला रास्ता नाई बतावत. सभै अपनी अपनी जेबन मा ऊ जो गांधीवाला कागद भरना चाहत रही.. ऊ फोटो ऊही कागज पर रही तो ही किमत रही. बाकी कागद उपर फोटो की कौनो वाईल्यु नाई.. भगवान ने हमे बनाया है या हमने ऊंके बनावे है.. इ बहुत बडा सवाल है...

आमिर खानचा चित्रपट "पी.के." अश्याच सगळ्या प्रश्नांना घेउन पृथ्वीतळावर येतो. राजु हिराणी आणि विधु चोप्रा यांनी ३ इडीअट्स नंतर एका वेगळ्या (ते म्हणतात) विषयावर चित्रपट घेउन आले. विषय चांगला आहे. परंतु आधी या विषयावर एक सकस, पौष्टीक, दणदणीत चित्रपट येउन गेल्यामुळे हा चित्रपट त्याच्या तुलनेत एकदम फिका वाटतो अर्थात जेवनाची सजावट उत्कृष्ट आहे. कपडे काढलेला टर्मिनेटर अ‍ॅर्नॉल्ड ( कोणता काय विचारत आहेत आताचा अ‍ॅर्नॉल्ड जरी गृहित धरला तरी तिन्ही खानची बॉडी एका बाजुला आणि त्याची एकट्याची एका बाजुला होईल.) आणि कपडे काढलेला आमिर यांच्यात फिजिकल फरक काय आहे. तोच त्या दोन चित्रपटांमधला फरक आहे. थोडेफार प्रश्न उचलतो थोडेफार मनोरंजन करतो तर थोडेफार विवाद वाढवतो ज्याची काहीच गरज नव्हती. (अर्थात हे माझ्या नजरेने)

तर चित्रपटाची कथा बर्‍याच वर्तमानपत्रांमधुन बाहेर आली आहे त्यामुळे स्पॉईलर अलर्ट वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. Wink ज्यांना वाटत असेल त्यांनी अलर्ट दिलेलाच आहे असे मानुन पुढचे वाचा.
परग्रहावरुन पृथ्वीवर अभ्यास संशोधन करण्याकरीता आमिर खानचे यान राजस्थानाच्या एका ओसाड प्रदेशात उतरते. (ही गोष्ट वेगळी आहे कि पुर्ण चित्रपटभर आपल्याला त्याच्या संशोधनाचा विषय काय आहे हे सापडत नाही)
आता याना बाहेर साहेब उतरतात तर बिना कपड्यांचे कारण त्यांच्या इथे कपडे घालत नाही. उतरल्यावर त्या ना-गड्या आमिरला नेमका चोर भेटतो. चोर नेमका आमिरच्या गळ्यात असलेला रिमोट ( गळ्यात अडवलेले गॅजेट) हिसकावुन घेतो आणि पळुन जातो. (आमिरच्या अवतारावरुन दुसरी कोणतेही चोरण्यालायकीचे काहीच नसल्याने नाईलाजाने त्याला गळ्यातले गॅजेट चोरुन तो चोरच आहे हे दाखवावे लागते.) गॅजेट शिवाय आमिरला त्याच्या ग्रहावर परत जाता येत नसल्याने तो त्या चोराचा आणि गॅजेटचा शोध घ्यायला सुरुवात करतो. त्यात त्याला संजय दत्त आणि अनुष्का शर्मा भेटतात. या शोधामधे आमिरला बर्‍याच नवनविन कल्पना गोष्टी कळत जातात. त्याला या सगळ्या नविन असल्याने तो आपापल्या परिने अर्थ लावत जातो. तिकडे बाई अनुष्काला सुशांत बरोबर प्रेम होते परंतु तो पाकिस्तानी असल्यामुळे तिच्या घरातले नकार देतात या नकारामागे घरगुरु तपस्वी (सौरभ शुक्ला) असतात. त्यांच्यामते तो पाकिस्तानी असल्यामुळे तो तिला वापरेल आणि नंतर सोडुन जाईल. धोका देईल. मग दोघांचे ऐनवेळेला फाटते आणि ती बिचारी दिल्लीला येउन एका न्युजचॅनल मधे काम करायला सुरुवात करते. आमिर त्याचे गॅझेट शोधत शोधत दिल्लीला पोहचतो. आणि त्याची अ‍ॅस्युज्वल उज्ज्वल जगतजननी उर्फ जग्गुशी पडते. जी आपल्या नविन बातमीचा शोध घेत असते. आमिरच्या उटपटांग हरकतीमुळे तिचे ध्यान आकर्षित होते आणि ती त्याचा मागोवा घेते. पीके ला आधी बोलता येत नसते. पण पृथ्वीवर आल्यावर त्याला बोलण्यासाठी भाषेची आवश्यकता भासते. त्याला भाषा शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तिचा हात पकडण्याची गरज आहे परंतु त्याच्या हरकतीमुळे त्याला कोणी हात देत नाही. त्या हात पकडण्याचा उलटा अर्थ काढुन भैरोसिंग (संजय दत्त) आमिरला "जन्नत" मधे घेउन जातो. (वास्तम मधे नार्वेकर संजयला घेउन जातो. इथे संजय आमिरला हिशोब फिट्टमफाट) जन्नत मधे गेल्यावर आमिरला खरतर सगळच हातात मिळते परंतु तो एलिअन असल्यामुळे असला काही प्रकार करण्याऐवजी गरजे पुरते त्याबाईचा हात हातात घेउन तिची भाषा डाउनलोड करुन घेतो. नेमकी ती भोजपुरी निघते म्हणुन सगळ्याचित्रपटात आमिर भोजपुरी बोलत असतो. दिल्लीत सगळा चोरीचा माल विकला जातो कळल्याने आमिर दिल्लीला जातो. तिथे जन्नत मधे मिळालेल्या थोड्याफार ज्ञानामुळे तो आधी पोलिसांना त्याच्या वस्तु बद्दल विचारतो. लोकांना विचारतो. सगळे त्याला वेड्यात काढतात आणि देवच तुझ्या प्रश्नांना उत्तर देतील आणि तुझी वस्तु देखील तेच देतील. सांगतात. मग पीके लागतो देवाच्या मागे त्याला वाटते या पृथ्वीवर सगळ्यांच्या समस्याचे निवारण देव नावाची शक्ती करते माझ्या देखील समस्याचे निवारण देवच करेल. त्याला काहीच माहीत नसल्याने तो सगळ्या धर्माच्या देवांना साकडे घालतो. पुजाअर्चा करतो. कोणत्याच धर्माचे नियम माहित नसल्याने याचे त्याला त्याचे याला जोड्तोड करुन घेतो. चर्च मधे पुजेची थाळी घेउन जातो गडबड होते. तिथे बघतो की देवाला वाईन देतात मग तो वाईन घेतो पण पोहचतो मशिदीमधे परत गडबड करतो. हिंदु स्त्रीला पांढर्या साडीत बघतो तेव्हा कळते ती विधवा आहे. मग तो ख्रिश्चन बाईला पांढर्या कपड्यात बघतो तर सांत्वन करायला जातो. तिथे कळते ती लग्नाला जात आहे. दुखात काळे कपडे घालतात. मुस्लिम बायकांना काळ्याकपड्यात बघितल्यावर परत तिथे जातो पण तिथे ही गडबड करतो. नंतर देवावरुन विश्वास उडायला लागतो तेव्हा त्याला त्याचे गॅझेट एका स्वामी कडे सापडते जो त्या गॅझेटला देवाचा हिरा म्हणुन लोकांना दाखवत असतो तो स्वामी आपला देवाशी बोलणे होत असते असा दावा करतो. अनुष्का या स्वामीचा फोलपणा आमिरच्या मदतीने उघडकिस आणते आणि त्याला त्याचे गॅझेट मिळवुन देते मग आमिर घरी रवाना होतो.

आता या कथेचे सार आपल्याला "ओह माय गॉड" चित्रपटात दिसलेला होता. तोच सार, तत्वज्ञान तीच रेसिपी हिराणीसाहेब आपल्या चितपरिचित चिमटे कोपरखळी यांचा मसाला वापरुन कढईला धर्मथोतांडाची आग लावुन गरम करुन त्यात चित्रपट नावाच्या थाळीत देतात आणि ते खायला काटाचमचे यांच्या जागी आमिर आणि अनुष्काला ठेवतात. त्यामुळे चव थोडी वेगळी लागते. बाकी सगळे सारखेच. दुर्दैवाने दोन्ही चित्रपटांची तुलना होउ लागते आणि पीके त्यात बराच मागे पडतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही वेगवेग्ळ्या रस्त्यांवरुन समान धावत असताना मध्यंतरानंतर पीके अनुष्काच्या गुंत्यात अडकतो. ट्रॅक चुकतो आणि......... सुरुवात जितकी खुशखुशीत झाली होती त्याहुन अधिक रडका शेवट झालेला आहे. "ओह माय गॉड" मधे कांजीभाईचा कोर्टसीन हा चित्रपटाचा माईलास्टोनवाली जान होती. पीके मधे कोर्टसीन बदल्यात टिव्हीवरचा डिबेटसीन आणलेला आहे जो प्रचंड फसवा आणि लॉजिक नसलेला आहे. निव्वळ एका घडामोडीमधुन आमिरखानच बरोबर आहे आणि तो स्वामी खोटा आहे. वगैरे जे भासवले ते न पटणारे आहे. तो सीन खरतर धक्कादायक आहे पण नेमका तो लिहित असताना कोणत्या गोष्टीवर केंद्रीत करायचे आहे तेच उठुन दिसत नाही. तो धक्का गाजरमुली सारखा मामुली वाटुन जातो. असे चित्रपटात बरेच धक्के मिळतात पण ते जाणवेपर्यंत नविन उपद्व्याप चालु होतो.

चित्रपटात एक गाणे सोडुन बाकीची गाणी का आहेत ? याचे संशोधन करण्याकरीता मलाच कोणत्यातरी ग्रहावर जावे लागेल. खरतर असे बर्‍याच चित्रपटांमधे देखील हाच प्रश्न उद्भवतो. पण बाकीची गाणी अनावश्यक आहे. एलिअन नाचु शकतो गाऊ देखील शकतो हे दाखवायची गरज काय आहे? वर भरीतभर तो प्रेम देखील करतो ? नशिब "तडप तडप के इस दिलको" सारखे गाणे गात नाही.

कान मोठे करुन आणि डोळे वटारुन फिरणे या दोन गोष्टी आमिरने सहजरित्या केलेल्या आहे. (सतत डोळे वटारुन ठेवुन बघा कळेल) भोजपुरी भाषेच्या गमतीजमती अचुक आमिरने पकडल्या आहेत. बोलण्याची ढब परफेक्ट वाटते. प्रत्येक दृष्यात त्याने प्रचंड निरागसता दाखवुन काम केले आहे. एखाद दुसरा सीन ठिगळ लावल्यासारखा आहे पण फक्त त्यात आमिर असल्याने जाणवत नाही.त्याच्या अभिनयामुळे तो चित्रपटाशी एकरुप होउन जातो.
अनुष्का शर्मा फारच विचित्र दिसली आहे. तिच्या ओठांमुळे तिचा क्लोजप बघावासा वाटत नाही. नर्गिस फक्री अँजिलिना जॉली यांचे ओठ नुसते बघत राहावेसे वाटतात. पण अनुष्काचे ओठ तिच्या चेहर्‍यावरचे एलिअन वाटतात. मिसमॅच. त्यामुळे तिच्या अभिनयाकडे लक्ष जातच नाही सतत डोनाल्ड डकच नजरेसमोर नाचत आहे वाटते. तरी जितका बघितला त्यात ती ठिकठाक वाटली आहे.संजय दत्त, बोमण इराणी आणि सुशांत सिंग हे चवी पुरते आणि गरजे पुरते आहे.( त्यांना तितकेच ठेवले हे बरे केले) सुधीर शुक्लांनी स्वामी फक्त उचलला आहे असे म्हणावे लागेल. मिथुनदा , गोविंद नामदेव यांनी कॅरेक्टर लिलया उचलुन पर्वतावर नेउन ठेवला होता. त्यामुळे अभिनय बघावा तर फक्त आमिर खानलाच बघा.

चित्रपटात चांगले नाविन्यपुर्ण दृश्य आहेत. उदा. जो तो मारत असतो म्हणुन आमिर गालावर देवदेवतांचे फोटो लावतो. कपडे "डांसिंग कार" मधुन उचलेले वापरतो. इत्यादी नविन कल्पना घेतल्या आहेत. शंकराचे सोंग घेतलेल्या सोंगाड्याच्या मागे देव आहे म्हणुन लागणे हा हाईट सीन आहे. तसेच वेगवेगळ्या धर्माच्या स्थानांवर जाताना होत असलेला गोंधळ हा देखील वेगळाच अनुभव देतो. संवाद चुरचुरीत आणि खोल अर्थाचे आहेत. "भगवान ने तुम्हे बनाया है या तुमने भगवान को" "धर्म का स्टँम्प लोग लगाते है. भगवान तो सबको एकजैसे मानते है" या संवादांना भोजपुरी तडका दिल्याने फ्रेश वाटतात.

चित्रपटात फसलेले देखील आहे. थोडे टर्मिनेटर, थोडा कोई मिल गया, थोडा ओह माय गॉड मिक्स करुन बनवलेला वाटले. पिंडीवर टाकलेले दुध गरिबांना वाटा सारखे मुद्दे देखील उचलगिरीसारखे वाटले. आमिर हात पकडुन भाषा शिकु शकतो तर अनुष्काचा हात पकडुन हिंदी का शिकावीशी वाटली नाही. जेव्हा त्याच्या भोवतालचे सगळेच हिंदी बोलत होते. राजस्थानी भैरोसिंगला एका झटक्यात भोजपुरी कळते? जर पीके एलिअन असतो तर तो त्याचा धर्म काय आहे हे कशाला शोधत बसतो? तो तर बाहेरुन आलेला आहे. सुरुवातीला तटस्थ दृष्टीकोन असणारा नंतरनंतर हिंदु धर्मावर जास्त वेळ थांबतो. हे टाळायला हवे होते. जर टाळता येत नव्हते तर सगळ्या धर्मावर थोडा थोडा वेळ घेतला असता तर अधिक संयुक्तिक वाटले असते. उदा. जेव्हा आमिर लोटांगण केल्यावर बोलतो त्याच वेळेला मोहरमला त्याने जे मातम केले असते त्यावर काही बोलत नाही. ? जिथे लोटांगण केल्यावर जो त्रास झाला तो मातमच्या वेळेला कितीतरी अधिक झाला असेल. पण त्यावर एकही कटाक्ष नाही. ??
अनेक धर्मांच्या विसंगती दाखवताना योग्य मर्मावर बोट ठेवले आहे. पण उगाच त्यात "लव जिहाद" वगैरे मांडुन मुस्लिम मुलगा हिंदु मुलगीच्या लग्नाला समर्थन देणे, मुस्लिम मुल धोका देत नाही, वगैरे वाक्य अनावश्यक घुसवली आहे. सगळ्याच मुद्द्यांना हात लागलाच पाहिजे याचा अट्टाहास नको करायला पाहिजे होता. तुम्ही अंधश्रध्देविरुध्द दाखवत आहात चांगले आहे. पण त्यातुन एकाला झुकते माप नको द्यायला. ही गोष्ट "ओह माय गॉड" मधे अत्यंत योग्यरित्या हाताळली होती. ती उणीव प्रकर्षाने जाणवली.

अंधश्रध्देच्या नावाखाली देवाचा बाजार सग़ळ्याच धर्माने मांडलेला आहे. खरतर आजच्या काळात धर्मच या बाजारामुळे टिकुन राहिलेला आहे असे वाटत आहे.. लोक धर्म वाचवण्याकरीता युध्द करतात जिहाद करतात फतवे काढतात. पण देव वाचवण्याकरीता कोणी काही करत नाही. तसे देवाला वाचवण्याकरीता या अश्या लोकांच्या कुबड्यांची काहीच आवश्यकता नाही. ज्याने हे ब्रह्मांड बनवले. त्याला कसली भीती? त्याचे कोण काय नष्ट करेल? ही धर्मांध लोक तर त्याच्या खजगिणतीत देखील नसतील. मग आपण कुणाची भीती दाखवतोय? कुणाला प्रसन्न करतोय ? लोकांना धर्माची गरज काय.? याचे उत्तर ज्या दिवशी सापडेल तेव्हा देव सुध्दा पृथ्वीवर अवतरेल. या धर्मामुळे त्यावरुन होणार्‍या आपापसातल्या भांडणामुळे तो देखील कंटाळुन दुसरीकडे निघुन गेला असेल. "बसा भांडत तुम्ही. चुक केली मी बनवुन तुम्हाला." आपल्या आचरणाने पृथ्वीवरुन आपणच देवाला घालवुन लावले आहे. मग त्याला कुठे शोधत बसले आहात? तुम्ही स्वतःमधे सुधार करा. देव स्वतःहुन परत येईल.

धर्माला जीवनात कितपत महत्व द्यायचे आहे हे तुमचे तुम्ही ठरवा

ओह माय गॉड मधे एक वाक्य परेश रावल तोंडी आहे "धर्म एकतर माणसाला दयनिय करतो नाहीतर अतिरेकी बनवतो"

त टी. :- चित्रपटाला स्टार देउ नयेच. कोणी काहीतरी पोटतिकडीने सांगत आहे शिकवण देत आहे त्याकडे लक्ष द्यायचे सोडुन तुला ३ स्टार ४ स्टार कसे म्हणायचे? हे तर असे झाले प्राध्यापकांनी लेक्चर दिल्यावर "सरांनी काय ५स्टार वाले लेक्चर दिले ना" "नाही नाही मला तर २स्टार वालेच वाटले" असे विद्यार्थी बोलत आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुवात जितकी खुशखुशीत झाली होती त्याहुन अधिक रडका शेवट झालेला आहे. "ओह माय गॉड" मधे कांजीभाईचा कोर्टसीन हा चित्रपटाचा माईलास्टोनवाली जान होती.>>>
"मैलास्टोन" म्हणायचय का?

अनेक उदाहरणे हिंदू धर्मातली आहेत, पण प्रेक्षकवर्गही प्रामुख्याने हिंदूच आहे तर ते तसेच असणार.
>>>>
फारएण्ड सहमत,
हा बेसिक सेन्स आहे, लोकांनी समजून घ्यायला हवा. किंवा समजूनही न समजल्यासारखे चालते.
मुस्लिम कलाकार चित्रपटात हिंदू युवकाची भुमिका करतात. (अपवाद- मुस्लिमच हवे ही कथेची गरज नसल्यास). अगदी त्यांचे नाव राम-लक्ष्मणही असते. (आठवा- मै हू ना) कारण चित्रपट भारतात घडतोय तर हिरो हिंदूच हवा जो कथानकाशी आणि पर्यायाने बहुसंख्य प्रेक्षकांशी रिलेट होऊ शकेल.

गेल्या कित्येक दिवसांत कुठलाच पिक पाहिला नाही. हासुद्धा मिसलाच. पण एकूण सगळीकडची मतं ऐकून टीव्हीवरसुद्धा बघीन की नाही, ह्याची शंका वाटते.
हा विषय 'ओह माय गॉड' मध्ये व्यवस्थित हाताळलेला आहे. आणि एकंदरीत लिखाणावरून हेच पटतंय की 'ओह माय गॉड'ला हिराणी ने आमिर्खानी फोडणी देऊन जळेपर्यंत तळून वाट लावलेली आहे.

ऐकीवावरून उपस्थित झालेल्या दोन शंका -
१. चित्रपटात संजय दत्त आहे ना ? तो तुरुंगात असताना त्याने ह्या चित्रपटाचं चित्रीकरण कसं काय केलं ? ते नितीमत्तेला धरून होतं का ? नसल्यास, हिरानी आणि कं.ने हे थोतांड का मांडलं आहे ? (हिरानी तर दत्तवर चरित्रपट काढतो आहे आता. वाह रे नितीमत्ता ! ब्लडी हिपोक्रेट)

२. एक मित्र म्हणाला की चित्रपटाच्या सुरुवातीला, जेव्हा प्रोड्युसर्सची वगैरे नावं/ लोगो येतात तेव्हा चक्क एका बाबाचा फोटो दाखवून वंदन केलं आहे ! हे खरं असल्यास त्याला काय म्हणायचं ?

ऐकीवावरून उपस्थित झालेल्या दोन शंका ->>>
अहो बर्‍याच शंका आहेत हिंदी चित्रपट सृष्टीविषयी..
१. लोक गुन्हेगार असलेल्या संजय द्त्त, सलमान खानचे चित्रपट का पाहतात?
२. मुळात बिन्डोक चित्रपट चालतातच कसे, भुसा भरलाय का डोस्क्यात (बनवणार्‍यांच्या आणि स्वकष्टाचे पैसे मोजुन ते पाहणार्‍यांच्या) ??
३. बरेच मर्‍हाटी चित्रपट, हिंदीपेक्षा कित्येक पटीने चांगले आहेत, पण त्यांना मल्टीप्लेक्स मध्ये जागा मिळत नाही..

४. ई. ई.

पीके बघितला. ठीक वाटला.
एक शंका:
त्यात ती जग्गू हिंदू आणि सर्फराज मुस्लीम. मग लग्न करायला marriage registrar चे ऑफिस किंवा कोर्टात जायचं सोडून ते चर्च मधे का जातात? आणि त्यात जग्गूने पांढरा पोशाख christian bride सारखा का घातला आहे?

१. लोक गुन्हेगार असलेल्या संजय द्त्त, सलमान खानचे चित्रपट का पाहतात? -->
संजय ला त्याची शिक्षा मिळाली आहे ... जेल मध्ये राहून आलाय तो ७ वर्षे ... गुन्हेगारीचा stamp मारणार का सुधारायचा एक मौका देणार ..भारतात हाच प्रोब्लेम आहे ... एकदा शिक्का बसला कि त्याला जीवनात काहीच करायला देणार नाहीत....

२. मुळात बिन्डोक चित्रपट चालतातच कसे, भुसा भरलाय का डोस्क्यात (बनवणार्‍यांच्या आणि स्वकष्टाचे पैसे मोजुन ते पाहणार्‍यांच्या) ??
-->
प्रत्येकाची आपली मते असतात... आम्ही जातो ते करमणूक म्हणून... आयुष्यात अल्रेअद्य टेन्शन्स असताना ३ तास मनोरंजन इतकाच हेतू असतो... सलमान चे movies आनंद देतात...

संजय दत्तने घरी एके ५६ आणि हातबॉम्ब ठेवला होता, चाकू आणि सुरा नाही. तेव्हा तो ३५ वर्षांचा होता आणि त्या वस्तूंचे परिणाम काय होऊ शकतात हे त्याला चांगलेच ठावूक होते. त्याची शिक्षा अजून पूर्ण झालेली नाही. वर सुट्ट्या सुरूच आहेत. पुळका दाखवण्याआधी जरा भान ठेऊन बोला.

च्रप्स,

>> एकदा शिक्का बसला कि त्याला जीवनात काहीच करायला देणार नाहीत....

श्री गोपाळ गोडसे यांना गांधीवधाच्या खटल्यात शिक्षा झाली होती. ती भोगून संपल्यावरही त्यांचा सतत गुन्हेगारासारखा उल्लेख केला जातो, याची तुमच्या विधानावरून आठवण झाली. मात्र गांधींच्या वधाचा पहिला प्रयत्न फसल्यावर दुसऱ्या यशस्वी झालेल्या प्रयत्नापर्यंत दहा दिवस त्यांना मोकळं सोडणाऱ्या भारत सरकारला काहीच दोष लागत नाही. मोठे अजब कायदे आहेत या देशात, नाहीका?

आ.न.,
-गा.पै.

ए.आर. वाय. व एस. ए. एम. ए.ए. या दोन कंपन्यानी पीकेला फायनान्स केले आहे. त्यातल्या पहिल्या कंपनीवर टेररिस्टना फायनान्स केल्याचे आरोप सिद्ध झाल्यामुळे युकेच्या स्टॉक मार्केटमधून २००६ साली कारवाई करुन पिटाळण्यात आले तर दुसरी कंपनी ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय.एस. आय. चा पिल्लू आहे.

दोन्ही कंपन्या पाकिस्तानी असून आतंकवादी व हवालाचे भागिदार आहे.

आमीरच्या पीकेला वरील दोन्ही कंपन्यानी फायनान्स केले आहे.

डॉ. सुब्रमणीयन स्वामी आज-उद्या मध्ये हा मुद्दा कोर्टात नेणार आहेत.

बघू काय होतं ते!

काल पाहिला. मला तरी अजिबात आवडला नाही. पैसे नी वेळ वाया. असले उथळ पिक्चर शारुख किंवा अक्षयकुमारने करावेत. आमीरने केलेले मला तरी झेपत नाहीत.
हिंदू देवदेवतांची टवाळी केलेली मला तरी वाटली नाही. जो काही मेसेज पोचवायचा होता तो ओ माय गॉडमध्ये जास्त प्रभावीरित्या पोचवला होता. ह्यात वेगळं काहीच नाही. ज्या लोकांना त्यातून काहीही बोध न घेता बुवा, बाबांच्या नादी लागायचं असतं ते लागतातच. फार फरक पडत नसतो समाजावर.

"..............आमीरच्या पीकेला वरील दोन्ही कंपन्यानी फायनान्स केले आहे.
डॉ. सुब्रमणीयन स्वामी आज-उद्या मध्ये हा मुद्दा कोर्टात नेणार आहेत.
बघू काय होतं ते!"

बापरे ! फारच भयंकर बातमी आहे. सत्यमेव जयते म्हणणार्‍या अमिरला काहिच माहित नसेल अस वाटत नाही. एकंदरीत ( आजच्या दुरदर्शन चर्चेवरुन ) सिनेमाचा प्लॉट पाकिस्थान च्या फेवरमधला आणि सर्वसाधारण हिंदुंना आपल्या धर्मात भयंकर त्रुटी आहेत अस वाटणारा आहे. या पध्दतीचा सिनेमा का बनवला गेला याची कारण मिमांसा वरच्या बातमीतुन पटते.

हे समजेपर्यंत हा सिनेमा ४०० कोटींचा धंदा करुन बसलाय म्हणजे आपण सर्वांनी हा सिनेमा पाहुन २७/११ सारख्या अजुन घटना भारतात घडविण्यासाठी फायनान्स पुरविला आहे.

श्री गोपाळ गोडसे यांना गांधीवधाच्या खटल्यात शिक्षा झाली होती. ती भोगून संपल्यावरही त्यांचा सतत गुन्हेगारासारखा उल्लेख केला जातो, याची तुमच्या विधानावरून आठवण झाली. मात्र गांधींच्या वधाचा पहिला प्रयत्न फसल्यावर दुसऱ्या यशस्वी झालेल्या प्रयत्नापर्यंत दहा दिवस त्यांना मोकळं सोडणाऱ्या भारत सरकारला काहीच दोष लागत नाही. मोठे अजब कायदे आहेत या देशात, नाहीका?
<<
गुन्हेगाराचा उल्लेख गुन्हेगारासारखा नाहीतर कसा करायचा असतो?

खून करतो तो नेहेमीच खुनी असतो. अगदी फासावर लटकला तरी. तेव्हा, गोडसे हा खुनी होता. अन गांधी "वध" वगैरे भंपकपणा लिहीत जाऊ नका. त्या गोडसेनी सगळ्यांसमोर त्या निशःस्त्र म्हातार्‍यावर गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता.

मोकळे सोडणारे न्यायालय असते. अमित शहांना नाही का मोकळं सोडलंय न्यायालयाने? त्यावेळी या देशाचे कायदे अजब होत नाहीत का?

अर्थात खुन्यांना आदरणीय म्हणणार्‍या तुमच्यासारख्या लोकांकडून दुसरी काय अपेक्षा करणार?

गाम्या गांधीहत्या म्हण जिथेतिथे स्वत:ची लायकी आणि घरातल्यांचे संस्कार दाखवू नकोस

काल पाहिला. मला तरी अजिबात आवडला नाही. पैसे नी वेळ वाया. असले उथळ पिक्चर शारुख किंवा अक्षयकुमारने करावेत. आमीरने केलेले मला तरी झेपत नाहीत. >>> +१. पण 'ओ माय गॉड' हा अक्षय कुमारचं प्रॉडक्शन आहे.

हिंदू देवदेवतांची टवाळी केलेली मला तरी वाटली नाही. जो काही मेसेज पोचवायचा होता तो ओ माय गॉडमध्ये जास्त प्रभावीरित्या पोचवला होता. ह्यात वेगळं काहीच नाही. ज्या लोकांना त्यातून काहीही बोध न घेता बुवा, बाबांच्या नादी लागायचं असतं ते लागतातच. फार फरक पडत नसतो समाजावर. >>>> +१

अतिशय सामान्य वाटला. आमिरपेक्षाही (धूम ३ नंतर त्याच्याकडून अपेक्षा करणं सोडून दिलं Wink ) राजकुमार हिरानी कडून अपेक्षाभंग झाला. 'ओ माय गॉड' जास्त चांगला वाटला. सगळ्यांची कामंही मस्त झाली आहेत. पी के मधे ती लव्ह स्टोरी ठिगळ लावल्यासारखी घुसडली आहे. मध्यंतरानंतर फारच बोर झाला.

असले उथळ पिक्चर शारुख किंवा अक्षयकुमारने करावेत. आमीरने केलेले मला तरी झेपत नाहीत.
>>>>>>

आमीरचा मेला चित्रपट बघा Wink
अक्षयचा तीसमारखान परवडला म्हणाल..

पाकिस्तानी कंपन्यांचा फायनान्स वगैरे यात किती तथ्य आहे हे तेच जाणे, पण अशी पिल्ले आपल्याइथे अधूनमधून सोडली जातात. शाहरूखबाबतही हे कित्येकदा बोलण्यात येते. निवडणूकपूर्व त्याच्या नावावर एक ट्विट प्रसिद्ध केले होते, काय तर मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईल. यावर काही कट्टर लोकांच्या भावना भडकावून मते गोळा झाली. मग निवडणूक पश्चात पलटी. ते ट्विट कमाल खानचे होते. आणि हल्ली तर काय मोदींच्या आणि भाजपाच्या कित्येक कार्यक्रमांत तो व्हिआयपी गेस्ट असतो, गळाभेटी घेत असतो. मी माझ्या कित्येक मिंत्रांना यावरून चिडवलेय, एकेकाची बोलती बंद होती.

तर मॉरल ऑफ द स्टोरी - अधिकृत कारवाई होत नाही तोपर्यंत या नाजूक बाबतीत तरी जास्त चर्चा ताणने म्हणजे अफवा पसरवल्या सारखेच आहे.

बायदवे, आमीर आणि मोदींच्या गुजरातचाही काही पंगा आहे ना. नर्मदा आंदोलनावरून, मागे त्याचाही एक चित्रपट गुजरातमध्ये प्रकाशित होऊ दिला नव्हता. बहुतेक फनाह का?

असले उथळ पिक्चर शारुख किंवा अक्षयकुमारने करावेत. आमीरने केलेले मला तरी झेपत नाहीत.>>> धूम ३??? गझनी??? मंगल पांडे??? मेला??? मन्न???? (तरी यात ९० च्या दशकांतले लव्ह लव लव्ह, अव्वल नंबर टाईप डझनभर पिक्चर धरले नाहीत.)

धूम ३??? गझनी??? मंगल पांडे??? मेला??? मन्न????

गझनी चा उल्लेख चुकीचा आहे... तो खरच चांगला होता... बाकीचे येस .. टाकाऊ आहेत ...

देल्ही बेल्ली हा चित्रपट सुद्धा आमीरचाच होता. निर्माता होता तो त्याचा. त्यातील भाग डीके बोस डीके गाण्याचे समर्थन करणारी त्याची मुलाखत देखील मी पाहिली होती. त्यात त्याचे एक आयटम सॉग सुद्धा होते. गाणे अगदीच टाकाऊ नव्हते बहुधा, पण त्याचा डान्स वेशभूषा वगैरे बंडल होती. आणि त्या चित्रपटाबद्दल तर बोलायलाच नको. मला राग आहे कारण मी मोठ्या हौसेने मैत्रीणींबरोबर तो तद्दन फालतू चित्रपट बघायला गेलो होतो. खा खा शिव्या खाल्या होत्या त्या मैत्रीणींच्या.. ते तर माझे संस्कार जे मी व्याजासकट आमीरखानला परत नाही केल्या.

>>> धूम ३??? गझनी??? मंगल पांडे??? मेला??? मन्न???? (तरी यात ९० च्या दशकांतले लव्ह लव लव्ह, अव्वल नंबर टाईप डझनभर पिक्चर धरले नाहीत.)>> वरचे प्रश्नचिन्हवाले पिक्चर मी पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यातला आचरटपणा माहित नाही. तरी पुन्हा असला आचरटपणा आमीरकडून अपेक्षित नाही. त्याकरता वर उल्लेख केलेली दोन मंडळी आणि तशीच बरीच जनता आहे.

१९८० च्या सुमारास बी आर चोपडा यांनी मुस्लिम धर्माची (भारतीय कायद्याचा वरदहस्त असणारी) तोंडी तलाक देण्याची पुरुषप्रधान प्रथा केंद्रस्थानी ठेवून तलाक तलाक तलाक ह्या नावाचा सिनेमा काढला. मुस्लिमांच्या रोषाला घाबरुन त्याचे नाव निकाह करावे लागले आणि त्या सिनेमात काटछाटही करावी लागली. ह्या पार्श्वभूमीवर पीकेबद्दल आक्षेपाला वाटाण्याच्या अक्षता लावणे जास्त खटकते.
कुली, हम ह्या सिनेमातील विविध दृष्ये, गाणी ह्यालाही मुस्लिमांचा आक्षेप होता आणि दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांनी मुस्लिमांना खूश करण्याकरता त्यांना हवे ते बदल सिनेमात करुन मग ते प्रकाशित केले. असे असताना हिंदूंच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याचा अट्टाहास का?

शे.न.- व्यावसायिक कारण म्हणजे जे कोणी असे कडवे हिंदू आहेत त्यांच्या रोषाचा चित्रपटाच्या मार्केटवर काहीच परिणाम होत नाही :). मुस्लिमांचा रोष चित्रपटाचे मार्केटच काय, पण कधीकधी सरकारची धोरणेही ठरवतो Happy

आता हे कोणा एकाला उद्देशून नाही:
एक आमिर सोडला तर चित्रपटाशी निगडीत बहुसंख्य लोक हिंदू आहेत - दिग्दर्शक, पटकथा लेखक ई. त्यांना समाजात होणारा धर्माचा बाजार दाखवायचा असेल तर तो साधारण असाच दाखवतील.

मी नास्तिक बिस्तिक अजिबात नाही. मला धार्मिक गोष्टी, सण, उत्सव आवडतात. पण मला चित्रपट पाहताना यात देवांची थट्टा आहे असे वाटले नाही.

आणि तशी आहे, असे एक मिनीट मान्य केले, तरी त्यावर आपली प्रतिक्रिया कशी द्यावी हे ठरवताना मुस्लिम कशी देतात याचा विचार कशाला करायला पाहिजे. का आपली पण न्यूसन्स व्हॅल्यू आहे बॉस हे दाखवणे प्रत्येक धर्माच्या, जातीच्या गटाला आजकाल आवश्यक झाले आहे? स्वतःला अनुकूल सरकार असताना बजरंग दलाला संवैधानिक माध्यमातून विरोध करावासा का वाटत नाही?

एक गोष्ट जी मलाही खटकली - पाक चे अवास्तव कौतुक व एकूणच लव्ह जिहाद च्या विरोधी स्टेटमेण्ट केल्यासारखे सीन्स. वरती ऋग्वेद यांनीही मूळ लेखात लिहीलेले आहेच त्याबद्दल.

Pages