PK च्या प्रतीक्षेत...

Submitted by Mandar Katre on 18 December, 2014 - 14:17

गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे "पीके" सिनेमाचे वादग्रस्त पोस्टर प्रकाशित झाल्यापासून या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात २ महिन्यांपूर्वी गाणी अन ट्रेलर रिलीज झाला आणि उत्सुकता ताणली गेली . उद्या १९ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून हिरानीच्या पूर्वीच्या "थ्री इडियट्स" प्रमाणेच हा सिनेमा हिन्दी चित्रसॄष्टीतील "माइलस्टोन " ठरेल असा कयास आहे याचे कारण आमिर म्हणजे मुख्य नायक हा "एलियन" असल्याची वदन्ता असून "पीके"ची स्टोरी सर्वार्थाने निराळी आणि "युनिक" आहे ,असे समजते.

http://www.ibtimes.co.in/pk-movie-review-by-viewers-live-update-617664

makign-char-kadam-pk.jpg
या चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा .............

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसा वाटला (without spoilers) ते लिहा म्हणजे बघायचा की नाही ते ठरवता येईल. धूम ३ नंतर ताकही फुंकून पिणारे मी!

वरच्या पोस्टरवर आमीरखान अनुष्का शर्मापेक्षा बुटका दिसत आहे.
तो खराच तसा आहे की भुमिकेसाठी उंची कमी केली आहे.
कोई मिल गया या चित्रपटातील एलियन सुद्धा उंचीने छोटा दाखवला होता. यामागे काही शास्त्रीय वा तार्किक कारण आहे का?

# तळटीप - मी शाहरूख खान फॅन असलो तरी आमीरही आवडतोच, त्यामुळे मुद्दाम त्याला चिडवतोय, ते देखील उंची या शारीरीक बाबी वरून असा अर्थ प्लीज काढू नये.
त्यापेक्षा अनुष्काच्या विराट ऊंचीचे कौतुक करतोय असे समजावे. Happy

धूम 3 सारखा हा चित्रपट बहुतेक दगा देणार नाही..
तो धूम ३ मी प्रोमो किंवा पोस्टर न् बघताही बघायचा नाही हे ठरवले होते..
हा नुसता आमीरचा नाही तर राजकुमार हिरानीचा सुद्धा चित्रपट आहे..

आमीर ५ फूट ६ इंच, अनुष्का ५ फूट ९ इंच
मला ट्रेलर फारसा आवडलेला नाही. काही वाईट आहे असं नाही पण काही चांगलं पण नाहीये! ना शेंडा ना बुडखा! मिनी स्कर्ट घालून गावातून बागडणारी अनुष्का पटत नाही! एकूणच खूप आव आणला आहे! अति झालं नि हसू आलं असं व्हायला नको!

राजकुमार हिरानी दिग्दर्शक असल्यामुळे एक किमान चांगल्या पातळीचा चित्रपट असेल यात दुमत नाही. पण ट्रेलर वरुन माईलस्टोन ठरेल वगैरे वाटत नाही, अर्थात ठरला तर उत्तमच! तुम्ही दिलेल्या लिंकवरुन प्रतिक्रिया संमिश्र असल्याचे समजते. त्यामुळे हटके असला तरी धूम ३ चे पाप फेडायला पुरेसा नाही असे दिसतंय.

काही चित्रपटांबाबतीत ट्रेलरमध्ये बरेचदा चित्रपटाचे खरे वेगळेपण जे असते ते मुद्दाम लपवतात .. आणि ट्रेलर आकर्षक दिसण्यापुरते भाग दाखवतात.. असेही असू शकते..
पण आमीरचा चित्रपट फसला किंवा त्याने आपला एक टर्न वाईट चित्रपट देऊन फुकट घालवला तर वाईट वाटते.. त्याच्याकडून काहीतरी हटके पण दर्जेदारची अपेक्षा असते नेहमी.. त्यामुळे आशा करतो काहीतरी मस्तच निघेल..

मलापण ट्रेलर भावला नाही. अनुष्काचे केस विचित्र बॉयकट (किंवा जे काही आहे ते) आहेत. तिने चेहर्‍यावर कायकाय सर्जरी केल्यापासुन नैसर्गिक छान दिसेचना (सेम टू प्रियांका चोप्रा... या सुंदर मुली उगीच असे का करतात?)
पवित्र रिश्ता चा पहिला मानव पण दिसला ट्रेलरमधे.

सुनिधी | 18 December, 2014 - 14:26
मलापण ट्रेलर भावला नाही. अनुष्काचे केस विचित्र बॉयकट (किंवा जे काही आहे ते) आहेत.

खोब्रेल तेल चोपुन दोन वेन्या हव्या का मग? :प

आम्हाला कंपनी फॅमिली डे निमित्ताने तिकिटे मिळालीत या सिनेमाची. पुढच्या शनिवारी पाहणार Happy

माझ्या सख्ख्या मैत्रिणीने पाहिला आणि तिला मुळीच आवडला नाही! आमच्या आवडी बऱ्याच जुळतात त्यामुळे अर्थात मी हा थिएटरमधे जाऊन पाहणार नाही!

मला सम हाऊ असे ओव्हर हाईप्ड सिनेमे बघायला नकोसेच वाटतात.

धूम ३ पाहीला नाही पण तलाश पाहीला होता. तेव्हापासून धडा घेतला की रीव्यू ऐकल्याशिवाय (अमिरचा असला तरी सुद्धा) सिनेमा पहायचा नाही.

ओके.

मीही रिव्यु वाचल्याशिवाय (ऐकल्याशिवाय नाही Happy ) हल्ली सहसा जात नाही चित्रपटांना. पण काही चित्रपट हाईप झाले तरी त्यांच्याबद्दल मला एक आकर्षण वाटते. राजकुमार विरानी निराशा करणार नाही असा विश्वास आहे कुठेतरी. Happy तिकिटे फुकट मिळाली नसती तरी मी पदरचे पैसे खर्च करुन गेले असते. फक्त अनुष्काला कसे सहन करायचे हा एक प्रश्न आहे. Happy पण जाउदे.

सगळे जण परीक्षण ऐकून मग चित्रपटाला जायचे ठरवू लागले तर परीक्षण देणार कोण..
काही नाही.. कट्टर आमीरखाँ पंख्यांनी तरी हा चित्रपट लवकरात लवकर पाहयलाच हवा..

सचिन तेंडूलकरणी म्हटले की हा सिनेमा आजवरचा सर्वोत्तम सिनेमा आहे. आमीरचा की सचिननी पाहिलेल्यापैकी हे मात्र कळू शकले नाही.

विचित्र वाटते आहे. भोजपुरी अ‍ॅक्सेंट पुट ऑन. कान हलवणारा परग्रहावरचा माणूस आहे आमिर नंगापुंगा गाणे आवडले नाही. अनुश्काच आव्डत नाही. ती कमिटीने बनवल्यासारखी वाटते. स्माइल चेक हाइट चेक केस लेग्ज चेक लिप्स एन्हान्स्ड आणि ती अति उत्साही बनण्याचे जे प्रकार करते ते अंगावर येते. हेल्मेट घातलेली हिरॉइन हे काहीतरी गिमिक फिक्स झाले आहे का? करीना होती थ्री इडियट मध्ये तसे?

वय झाले तसे हा कमल हसन च्या मार्गाने जाणार का? अतर्क्य कथा, वेगवेगळे गेटप्स थर्की असेल पण छोकरा वाटत नाही.

राजकुमार विरानी निराशा करणार नाही असा विश्वास आहे कुठेतरी. स्मित तिकिटे फुकट मिळाली नसती तरी मी पदरचे पैसे खर्च करुन गेले असते. फक्त अनुष्काला कसे सहन करायचे हा एक प्रश्न आहे >>>> + १

साधना + १.
ऑफिसकृपेने हा चित्रपट फुकटात, तेही घरामागच्या चित्रपटगृहात बघायला मिळणार आहे. म्हणून जायचं ठरवलं आहे. ('म्हणून' असं लिहिण्यामागचं छुपं कारण हेच की फार अपेक्षा न ठेवता सिनेमा पाहिला की आवडतो. Wink )

मी आज जाणारे पाहायला... Happy

सचिन तेंडुलकर चा अभिप्राय खूपच चांगला होता... पण म्हनून नै कै.. आमिर ची फॅन म्हणून

हो. देणार नाही तर दिलीत. आता प्रिंट घेऊन मॉलवर जायचे, सोबतचे फ्री पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घ्यायचे, थेटरात घुसायचे आणि पिकेला पाहायचे. फर्स्टकम्फर्स्टसर्व आहे त्यामुळे लवकर जायचे आणि चांगल्या जागा पकडायच्या Happy

मंजुडी आणि साधना +१

बघणे अगदीच अशक्यप्राय झाले तर फ्री पॉपकॉर्न घेऊन कलटी मारायच्या शक्यतेचाही विचार केला आहे.

Pages