स्वतः

Submitted by Girija Pandit on 18 December, 2014 - 02:12

आज स्वतःने स्वतःचीच गोष्ट लिहायची ठरवली तेव्हा स्वतः रस्त्यावरचं ऊन पाहत खिडकीत बसला होता. ऊन हळुहळू फाटकातून आत शिरत होतं आणि स्वतः त्याच्या कडे नजर रोखून पाहत होता.
स्वतः ला उन फार आवडतं, अगदी शेजारच्या झाडावरच्या घरट्यापेक्षा, त्यातल्या छोट्याश्या पिल्लापेक्षा आणि त्या पिल्लाला पळवून न्हेण्याच्या कल्पनेपेक्ष्याही जास्तं!
उन्हात बसलं की आतला गारठाही थोडा उबदार होतो असं स्वतः मला परवाच सांगत होता. तो म्हणे एकदा एका ओसाड रानामध्ये हरवला होता. रात्र होऊ लागली, सूर्य अस्ताला गेला. रानात अंधार वाढू लागला. हळू हळू अंधाराला पसरायला जागाच राहिली नाही तेव्हा अंधार स्वतःच्या काळजात उतरला. त्याचे ते धाकधुक करणार काळीज पाहून अंधारालाही थोडे हायसे वाटले. त्याने त्याला घट्ट मिठीत घेतले.जशी रात्र उलटू लागली तसे स्वःताला आपल्याच हृदयाचे ठोके ऐकू यायचे बंद झाले. रात्रीचा नुस्ता किरकिराट.....
स्वतःचं काळीज हळूहळू थंडं होऊ लागलं पण स्वतः पळत राहिला ...जीव खाऊन... सूर्याच्या दिशेने.
किती मिनिटे,किती दिवस, किती महिने....
स्वतःला जाग आली तेव्हा एक भुंगा स्वतःच्या कानापाशी गुणगुण करत त्याला हाका मारत होता. दुपारचे कितीतरी वाजले होते. ऊन स्वतःच्या डोक्यावर थोपटत होते. सगळे वारे शांतपणे स्वतःभोवती उभे होते. स्वतःने डोळे उघडले तसे ऊन पटकन आत शिरले. काळजातल्या अंधाराला बाहेर हाकलत काळीज शेकले.
त्या दिवसापासून थोडसं ऊन स्वतःच्या आतच घर करून राहतंय. आतलं उन आणि बाहेरचं उन भेटलं की अजूनच मजा येते. मग चार दोन पक्षी, एखादा भुंगा, वार्यावर उडत जाणारे पान, दोन-एक फुलं, ढगाची सावली, गवताचे तृण सगळे स्वतःच्या काळजातलं ऊन पाहण्यासाठी आजुबाजूला गोळा होतात, गप्पा मारू लागतात.
स्वतः स्वतःच्या गोष्टींमध्ये त्यांच्या ही गोष्टी रंगवून लिहणार आहे.
चला , रस्त्यावरचं ऊन आता अंगणात पोहोचलय.
ऊन्हाला काळजात उतरवून घ्यायची वेळ झालीय, काळजातल्या उन्हाला उधळून द्यायची वेळ झालीय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड आवडले!! मी नेहेमी वाचणार हे. हे वाचूनदेखील काळीज शेकले जाईल व तिथे अंधार होणार नाही इतके उबदार आहे हे लेखन! सुपर्ब कल्पना व इम्प्लिमेंटेशन!!

मस्त लिहिलंय. एकदम फ्रेश करणारं लिखाण.

ऊन्हाला काळजात उतरवून घ्यायची वेळ झालीय, काळजातल्या उन्हाला उधळून द्यायची वेळ झालीय.<< हे वाचून अगदीच "अहाहा" मोमेंट आला.

गिरीजा खूपच सुंदर लिहताय तुम्ही

ढग आणि आता हे स्वतः ... खूपच आवडले, एकदम रीफ्रेशिंग.

आणि मराठी तुमची पहिली भाषा नाही यावर विश्वास नाही बसत.>>+१

काय भारी काय भारी! दिन बना दिया!! स्वतः, उन, अंधार, गारठा सगळेच ओळखीचे वाटले मला!
लिहीत रहा अजून खूप लिहा! You have it in you!

वाह! प्रतिक्रिया पाहून छान वाटतंय. तुम्ही एवढ्या सुंदर comments दिल्या आहेत. धन्यवाद!!
माझी पहिली भाषा मराठी नाही हे बोलून मी तुमच लक्ष लेखातून काढून घेतल कि काय अस वाटतंय म्हणूनच 'पहिली भाषा कोणती' ह्या पुन्हा पुन्हा विचारलेल्या प्रश्नच उत्तर द्यायचे आज टाळणार आहे. ती मराठीच आहे अस समजा. पण 'विध्यार्थी शिकाऊ आहे' हि पाटी सोबत जोडीला असू दे Happy
आजून लिहायचा आग्रह हि काहींनी केला आहे. त्यांना एवढच सांगेन 'शब्दांच्या शोधात आहे'. आजून लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करेन Happy .
काही लोकांनी मोठ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यांचे हि मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रियांना personalised उत्तर द्यायची इच्छा होती पण सगळ्याच गोष्टी मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपण भेटलोच कधी तर तुम्हाला एक छोटी treat मिळेल Wink Happy

Pages