कॅन्डी क्रश ने पकडलीय सगळ्याची नस

Submitted by भागवत on 15 December, 2014 - 02:21

नवीन मोबाइल खरेदी केल्या नंतर बरेच जण अँप आणि विविध गेम्स डॉऊनलोड करतात. मी सुधा केले. त्यापैकी कॅन्डी क्रश सागा एक होता. मदतीला धावून येणारा तोच खरा मित्र. त्याप्रमाणे कॅन्डी क्रश मध्ये मला जे गूढ शोध विनंती(mystery quest request), जादा प्राण (extra life) पाठवतात तेच खरे माझे मित्र असे वाटते. त्यामुळेच माझा मित्रा वरचा विश्वास कॅन्डी क्रश सागा मुळे दृढ झाला आहे. जीवनात ध्येयं गाठण्यासाठी माणूस खुप प्रयत्न करतो पण देवाचे आशीर्वाद असतील तर तुम्ही ध्येयं लवकर मिळवतात. तसेच कॅन्डी क्रश सागा मध्ये तुम्ही किती ही प्रयत्न केले तरी कधी-कधी देवाच्या आशीर्वादाची गरज भासतेच.

जसे जीवनात सुख आहे तसेच दुख सुद्धा आहे हे येथे सप्रमाण सिद्ध होते. एखादी कॅन्डी लेव्हल पूर्ण होण्यासाठी २-४ आठवडे लागतात पण कडक उन्हा नंतर पाऊस पडल्या मुळे हवेत गारवा तसे १० लेव्हल २ दिवसात पूर्ण होतात. देव कृपेमुळे लॉटरी लागावी तसे अवघड वाटणारी वाट कधी-कधी लवकर संपते. तसेच अवघड वाटणारी लेव्हल चटकन संपते. १०० लेव्हल संपल्या नंतर मला जो आनंद मिळाला होता त्याची तुलना मी करंडक जिंकण्याशीच करेन. १५० लेव्हल संपल्या नंतर मी असे काही जोरात ओरडलो होतो ते बघून माझी आई हा असा का खुळ्या गत करतोय असे वाटून मा‍झ्या कडे बघत होती.

जसे मुले व्यसनांच्या आहारी जातात त्याप्रमाणे मुले कॅन्डी क्रश सागा च्या आहारी जातात. ज्या प्रमाणे एक व्यसनांच्या सोबत दूसरे येते त्या प्रमाणे कॅन्डी क्रश संग सोबत पेट रेस्क्यू सागा आणि नवीन कॅन्डी क्रश सोडा सागा येतात. हे कॅन्डी क्रश आम्हाला कधी सोडणार हे माहित नाही. जसे दोन सिगारेट पिणारे लगेच मित्र बनतात त्याच प्रमाणे दोन सागा खेळणारे लगेच मित्र बनतात. दोन ट्रक चालवणारे जेव्हा-जेव्हा भेटतात तेव्हा-तेव्हा ट्रक बद्दल बोलत असतात. त्या प्रमाणे दोन सागा खेळणारे मित्र भेटले कि मी एखादी लेव्हल कशी कमी वेळेत पूर्ण केली आणि ती कशी अवघड आहे हे बोलत असतात. दुसर्‍याचा किती लेव्हल झाल्या हे कळल्या शिवाय त्यांचे बोलणं पूर्ण होत नाही.

या सागा गेम्स मुळे तुम्हाला राग, लोभ, मद, मत्सर चा अनुभव येतो. एखादी लेव्हल क्लिँयर झाली नाही तर प्रचंड राग येतो. एँपिसोड पूर्ण करायचा लोभ जडतो. दुसर्‍याची जास्त लेव्हल झाली तर मत्सर वाढतो. स्वत:ची लेव्हल जास्त झाली तर मद म्हणजे अंहकार वाढतो. कॅन्डी क्रश सागा मुळे खुप फायदे होतात. मैदानी खेळा मुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. पण तसे कॅन्डी क्रश मध्ये होत नाही पण तुम्ही रस्त्यावर चालताना कॅन्डी क्रश खेळत असाल तर मग काय होईल ते काही सागू शकत नाही. तुम्ही गटारात पडाल का खड्यात पडाल हे ब्रह्मदेव सुद्धा सागू शकत नाही. क्रिकेट मध्ये पहिल्यांदा बँट ने खेळण्या साठी मारामारी होते तसे इथे काही होत नाही. त्यामुळे तुमचा आनंदकोणी हिरावून घेऊ शकत नाही. अर्जुनाला एकाग्रतेत ने फक्त पक्ष्यांचा डोळा दिसतो त्या प्रमाणे कॅन्डी क्रश खेळताना तुम्हाला फक्त ३ कॅडी दिसतात. कॅन्डी क्रश चि नशा उत्तरो-उतर वाढत जाते. दारू चढल्या नंतर माणूस झिंगत जातो त्याप्रमाणे माणसाला सागा खेळून झिंगतो.

कॅन्डी क्रश सागा नवरे मंडळी साठी खूप महत्वाचा आहे. तुमची अर्धांगीनी तुळशी बागेत किंवा लक्ष्मी रोड वर शॉपिंग करताना तुम्ही बोर होण्या पेक्ष्या तुमची ६-७ लेव्हल खुशाल पूर्ण करू शकता. तसेच माँल मध्ये तुमची अर्धांगीनी तुमचे पैसे खर्च करत असताना तुम्ही काहीही करू शकत नाही या अपराधी भावनेने वाईट वाटून घेण्या पेक्ष्या तुमची कॅन्डी क्रश सागा चि गाडी पुढे दामटू शकता आणि तुम्ही तुमचे मनोरंजन करू शकता. तसेच सागा गेम सामान्य माणूस ते खासदारा पर्यंत सगळ्यांना आवडतो. तसा हा गेम सर्वमान्य/लोकमान्य आहे. काही दिवसापूर्वी एका आमदारांना कॅन्डी क्रश विधानसभेत खेळताना बघण्यात आले आहे. तेव्हा एकमेका सहाय्य करू अवघे धरू कॅन्डी क्रॅश चा सुपंथ.

कॅन्डी क्रश चारोळी

रात्र-दिवस मी खेळत राहतो कॅन्डी क्रश
आई म्हणते आत्ता तरी थोडा वेळ शांत बस
बायको म्हणते किती वेळ खेळता कॅन्डी क्रश
आत्ता तरी मला घेऊन द्या नेकलेस आणि पर्स

मनोरंजन म्हणुन मी खेळतो कॅन्डी क्रश
191 लेव्हल खेळून खेळून झालो कृश
अकरा वाजून गेले तरी केला नाही ब्रश
बाबा म्हणतात आत्ता तरी सोडून दे कॅन्डी क्रश

आम असो वा आमदार खेळतात कॅन्डी क्रश
Mystery quest देऊन मदत करतात पास
more lives दिल्यास हसतात खासम खास
कॅन्डी रिक्वेस्ट पाठवताच मोबाईल झाला क्रैश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅन्डी क्रश रिक्वेस्ट पाठविणा-याचा मोबाईलच लॉक होईल असा एखादा व्हायरस असल्यास सांगा , वैताग आणलाय या रिक्वेस्ट वाल्यांनी Happy

Proud भारी लिहिलेले आहे, मत्सर वगैरे!

>>>कॅन्डी क्रश सागा नवरे मंडळी साठी खूप महत्वाचा आहे. तुमची अर्धांगीनी तुळशी बागेत किंवा लक्ष्मी रोड वर शॉपिंग करताना तुम्ही बोर होण्या पेक्ष्या तुमची ६-७ लेव्हल खुशाल पूर्ण करू शकता. तसेच माँल मध्ये तुमची अर्धांगीनी तुमचे पैसे खर्च करत असताना तुम्ही काहीही करू शकत नाही या अपराधी भावनेने वाईट वाटून घेण्या पेक्ष्या तुमची कॅन्डी क्रश सागा चि गाडी पुढे दामटू शकता आणि तुम्ही तुमचे मनोरंजन करूशकता. तसेच सागा गेम सामान्य माणूस ते खासदारा पर्यंत सगळ्यांना आवडतो. तसा हा गेम सर्वमान्य/लोकमान्य आहे. काही दिवसापूर्वी एका आमदारांना कॅन्डी क्रश विधानसभेत खेळताना बघण्यात आले आहे.तेव्हा एकमेका सहाय्य करू अवघे धरू कॅन्डी क्रॅश चा सुपंथ.<<< Lol

============================

ह्यावरून आठवलेले माझे २० जून २०१४चे फेसबूक स्टेटस Proud

कँडी क्रश नावाचा प्रकार निर्माण करणार्‍याला माझे कोटी कोटी प्रणामः कारण त्यामुळे:

१. बायको सतत त्यातच गुंतलेली, स्वतःतच मश्गुल आणि अत्यंत शांत राहू लागली.
२. मी लॅपटॉपवर सतत काय करतो हा प्रश्न आपण नवर्‍याला खूपदा विचारायचो हे ती पूर्णपणे विसरली.
३. हा प्रश्न आपण नवर्‍याला अजूनही विचारू शकतो हे आता तिच्या ध्यानीमनीही नसते.
४. मी कुठे आहे, का आहे, केव्हा येणार आहे ह्याच्याशी तिला आता घेणेदेणे नसते.
५. मी कोण आहे हेही कदाचित ती विसरेल अशी एक अंधुक आशा निर्माण झालेली आहे.
६. घरात 'संवाद कमी झाल्यामुळे सुसंवाद' निर्माण झालेला आहे.

आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कँडी क्रशमधील मला काहीही समजत नसल्याने त्या विषयावर माझ्याशी तिला बोलताच येत नाही.

आता माझे हे स्टेटससुद्धा तिला तिच्या वर्तुळातील कोणीतरी चार दोन दिवसांनी सांगेल तेव्हा माहीत होईल.

कँडी क्रश, देरसे आलास लेकिन दुरुस्त आलास रे बाबा!

-'बेफिकीर'!

थँक्स कुंद आणि दिवाकर देशमुख.
कुंद - कॅन्डी क्रश खेळण्याचे व्यसन लागते.
दिवाकर - मी कॅन्डी क्रश खेळणं कमी केलंय.

भारी लिहिलेय.. आणि खरेय.. डोळ्यासमोर नाचतात त्या कँड्या.. Proud बाकी मी ट्रेन ट्रेन आणि फक्त ट्रेनमध्येच खेळतो हा..

Lol

मागे वॉट्स अ‍ॅपवर मेसेज फिरत होता.

तुम्ही मला मुलाच्या बारशाच आमत्रंण दिलत का?
लग्नाच आमंत्रण दिलत का?
वाढदिवसाच आमंत्रण दिलत का? मग कॅन्डी क्रशच आमंत्रण का देता Lol

शब्द असेच्या असे नसतील वेगळे असतील.

मी तर कीती महीन्यात कँडी क्रश चं तोंड पाहिलं नाहीये, येणार्‍या रीक्वेस्ट्स ना कंटाळुन गेल्या आठवड्यात गेम अनईंस्टॉल केला. पण फेसबुक वर रीक्वेस्ट येतच असतात, काय करावं बरं त्यासाठी ???

अगदी मनातलं लिहीलं.
बेफी स्टेट्स आवडलं बुवा .
कॅन्डी क्रश ने पकडलीय सगळ्याची नस >>> कँडी क्रश सागाची नसबंदी करायला हवी Proud

कौरव क्रश (Game App) - whatsapp वर वाचनात आलेला एक मजेशीर मेसेज इथे द्यावासा वाटला Happy
पहाटे साडेतीन च्या ब्राह्ममुहूर्तावर अर्जुनाचा अंड्रॉइड किणकिणला! पाहतो तर त्याला एसेमेस्‌ आला होता "You have received a private message on facebook" ताबडतोब अर्जुनाने त्याचा टॅब ऑन केला, द्वापरयुग ऑपरेटींग सिस्टिम लोड झाली आणि फेसबुक वर लॉगीन झाला.
त्याला कौरवांनी गेम रिक्वेस्ट केली होती, त्यांची रिक्वेस्ट accept करत त्याने महाभारत नावाच्या गेम वर क्लिक केले आणि त्याला पोझिशन मिळाली, द्यूत, वस्त्रहरण या लेव्हल्स पार करत अखेरीस तो कुरुक्षेत्र नावाच्या सगळ्यात क्रिटीकल स्टेज वर आला. गेम जिंकण्यासाठी ही राउंड क्लियर करणे फार महत्वाचे होते. हा गेम खेळायला त्याला श्रीकृष्ण हा पार्टनर मिळाला होता.
अर्जुनाने गेम कसा खेळायचा, किती लाइफ़्स मिळणार आहेत, किती आर्म्स अंड अम्युनिशन्स मिळतील वगैरे रूल्स वाचले आणि समोर कौरवांची ह्यूज आर्मी पाहून अर्जुनाच्या हातून गांडीव जॉय स्टिक गळून पडू लागली, अर्जुनाने थरथरत्या हाताने QUIT या option वर क्लिक केले आणि "Do you really want to Quit?" वर 'ओके' करणार तोवर्षी त्याचा गेम पार्टनर श्रीकृष्ण आला, पाठीवर थोपटून म्हणाला 'हे अर्जुना, हा क्षुद्रासारखा विचार कसे बरे तुझ्या मनात आला ??'
अर्जुन म्हणाला 'ड्यूड! त्यांची आर्मी बघितलीस का ?? आपल्याकडे निम्म्याने सुद्धा लाइफ़्स नैयेत ! वरून अम्युनिशन्स सुद्धा कमी आहेत आपण हरणारच आहोत!!' त्यावर श्रीकृष्ण म्हणाला "Pal,  Just chill !! जे पंडित असतात ते अश्या गोष्टींची पर्वा करीत नाहीत ! हे सगळे ऑपोनंट्स आधीच मेलेले आहेत! थांब मी तुला गेम ओव्हर झाल्यानंतरचा विश्वरूप व्ह्यू दाखवतो!" असे म्हणत श्रीकृष्णाने त्याला फ़्यूचरिस्टिक थ्रीडी स्क्रीनशॉट्स दाखवले. ते पाहून अर्जुनाला श्रीकृष्णाच्या प्रोग्रामिंग स्किल्सबद्दल विलक्षण अचंबा वाटला. श्रीकृष्ण म्हणाला "Buddy!! मला कौरवांवर conquer करायची strategy माहिती आहे, तू गांडीव जॉयस्टिक ऑपरेट कर, मी तुला मूव्हज सांगतो!" हे ऐकून अर्जुनाला हर्षवायू झाला आणि गद्गद होवून त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले!
आणि "कौरव क्रश" गेमच्या शेवटच्या राउंड ची सुरुवात झाली..........................!!/|

फेसबूकवर रीक्वेस्ट्स येऊ नये म्हणून अ‍ॅप्लिकेशन ब्लॉ़क करा.

मी खेळत नाही! मला असल्या गोष्टींसाठी वेळच नसतो Proud

फेसबूकवर रीक्वेस्ट्स येऊ नये म्हणून अ‍ॅप्लिकेशन ब्लॉ़क करा. < +१

खेळत नसेल तर अ‍ॅप्लिकेशन ब्लॉक करा. उगाच गळा काढुन उपयोग नाही. Wink

खरं सांगायचं म्हणजे जुन्या बटणवाल्या फोन्सकरता चारवर्षाँपूर्वीपासून असंख्य मजेदार गेम्स(शेकडो) wapday dot com वर फ्री मिळत होते आणि अजूनही मिळतात त्यात हा गेमही आहे मेमरी २०० ते ८००केबी ,वायरस नाही ,सर्व ऑफलाईन/ (काही बलुटुथ)
कैरम ,चेस ,मारिओ ,किमोन गोज फिशिंग, झुमा, ब्रिक्स,ब्लॉक़स, क्रेझी बॉल आवडते आहेत. कोणालाही त्रास नाही, डेटा लागत नाही. फोन कधीही हैँग झाले नाहीत.

बेफ़िकीर, भारती मस्त प्रतिसाद!!!

फेसबूकवर रीक्वेस्ट्स येऊ नये म्हणून अ‍ॅप्लिकेशन ब्लॉ़क करा. >> +१ मी तेच केले आहे.

watsapp वरून खालच्या ओळी कॉपी पेस्ट केल्या आहेत
गोकुळ अवघे शांत झोपले कृष्णसखा जागा । खेळत बसला यमुनातीरी कॅन्डी क्रश सागा

candy crush बद्दल बरच ऐकल होत , त्यामुळे कधिच ईन्स्टॉल नाहि केला.
पण सध्या बबल मॅनिया आहे , तो पण जाम अ‍ॅडिक्टिव आहे.