Whatsapp

Submitted by Anvita on 11 December, 2014 - 23:34

आजकाल स्क्रीन्स चे
addiction जाता जात नाही
laptop , ipad , फोन जवळ
असताच काही न काही

whats app फेरफटका
तर होतच राही
जगण्यासाठी थोडस हव
ना काही बाही

whats app वर सकाळी
गुड मोर्निंग ची पोस्ट
मधल्या अधल्या वेळात
फिलोसोफिचे डोस

सरदारजीच्या जोक्सच्या
कथा झाली जुनी
त्यांच्या जागी आता
' आलिया' आलीय नवी

बाकिंच्या पोस्टवर 'छानच'
हाताची युक्ती नामी
बर्याच वेळा हसणारी , रुसणारी
बाहुली येते कामी

कोणाला वाढदिवसांच्या
शुभेच्छाचा वर्षाव
कधी मग कुठले
कोडे ' सांगा बघू नाव ?'

अधे मध्ये कोणाच्या
achievements च्या पोस्टी
आता इथे टाकल्या शिवाय
कळत नाहीत ना गोष्टी

शेवटी मग गुड नाईट
टाकल्याशिवाय झोप येत नाही
अहो असे काय, जगण्यासाठी थोडस
हव ना काही बाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिली कविता. मला तर ह्या व्हाट्स-अ‍ॅप ग्रुपचा कंटाळा येतो. सारख दिवसभर काहीनाकाही सुरुच असत मित्रांच. एक तासात १०० वर मजकुर येऊन ठेपलेले असतात आणि उगाच फोटो डीलीट करत बसावे लागते. माझ्यामते तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग व्हावा. आपल्या भारतामधे हे जोक प्रकरण जरा जास्तच पुढे आहे. इतर देशातील लोकांना जोकसचे इतके नाही प्रेम.

बी , तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे . ग्रुप मेसेजेस चा अतिरेक होतो बरेच वेळा . पण whatsapp चे फायदे पण आहेत काही जसे माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या मैत्रिणीची आई इथे पुण्यात एकटी असते पण whatsapp मुळे त्यांना मुलीशी गप्पा मारता येतात आणि फोटो पण लगेच बघता येतात.
अर्थात फायदे तोटे दोन्ही आहेत.
एखाद्या ग्रुप चे मेसेजेस काही काळ बंद ठेवण्याची सोय झाली तर बरे होईल . सध्या ग्रुप mute करता येतो पण मेसेजेस येतच राहतात .