एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे.
नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही.
पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही.
वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही.
एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही.
सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही.
पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही.
भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही.
भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही.
आपल्याला जे साध्य होत नाही त्या गोष्टीला कमी लेखले तरीही ज्याने ते साध्य केले आहे त्याचे महत्त्व कमी होत नाही. ज्या त्या व्यक्तीचे महत्त्व हे त्या व्यक्तीच्या कर्माने सिद्ध होते. या जगात प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व कमी अधिक प्रमाणात असते. आणि आपण कमी लेखले म्हणून कोणत्याही व्यक्तीचे महत्त्व कमी होत नाही. या जगात कुणीही परिपूर्ण नसतो. त्यामुळे व्यक्तींना कमी लेखून आपण एक प्रकारे स्वत:लाच कमी लेखत असतो आणि सर्व व्यक्तींना बनवणाऱ्या परमेश्वरालाच कमी लेखत असतो.
नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता
Submitted by निमिष_सोनार on 10 December, 2014 - 00:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान. समंजस.. हळुवार!!!!
खूप छान. समंजस.. हळुवार!!!! मायबोलिसाठी अत्यंत गरजेच अस पीस!
त्यामुळे व्यक्तींना कमी लेखून
त्यामुळे व्यक्तींना कमी लेखून आपण एक प्रकारे स्वत:लाच कमी लेखत असतो आणि सर्व व्यक्तींना बनवणाऱ्या परमेश्वरालाच कमी लेखत असतो.>>>> + ११०