Submitted by कल्याणी कृपाल on 8 December, 2014 - 13:13
ऋतू आपल्या भेटीचा,
अशी घननीळ मिठी,
तुझा श्वास रुजे आत..
माझी गंधाळते दिठी...
तुझा मोरपिशी स्पर्श
माझ्या मना-तनावर...
नकळत उमलते
एक तान; अनावर...
माझ्या वाटा भिजवून
तुझं माझ्यापार जाणं...
उरे माझ्या आत आत
एक ओलंचिंब लेणं !!
-------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>माझ्या वाटा भिजवून तुझं
>>>माझ्या वाटा भिजवून
तुझं माझ्यापार जाणं...
उरे माझ्या आत आत
एक ओलंचिंब लेणं !!<<<
व्वा
सुरेख
सुरेख
वाह सुंदर
वाह सुंदर अष्टाक्षरी........!!!!!
सुंदर कल्याणी!!
सुंदर कल्याणी!!