हे आपल्याला का आवडतात?

Submitted by कोकणस्थ on 8 December, 2014 - 07:08

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बध्धप्रलापश्च वाङ्ग्मयं स्याच्चतुर्विधम् ॥

अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.

हे आपलं उगाचंच.

मायबोलीवर राजकीय आणि धार्मिक विभागात गदारोळ आणि भांडणांसाठी अनेक धागे आहेत. क्वचित प्रसंगी पाककृतींचे धागेही यातून सुटलेले नाहीत.

मग म्हटलं असा धागा काढूया ज्यात चांगलं सोडून इतर काही लिहीताच येऊ नये.

मंडळी, इथे दोन गोष्टी लिहीणे अपेक्षित आहे.

एक म्हणजे आपण आपल्या मायबोलीवरील सदस्यकालात (सगळी सदस्यनामे मिळून देखील चालेल) आपल्याला कुठल्या मायबोलीकराविषयी काय चांगले अनुभव आले याचे आपण जमेल तितके विस्तृत वर्णन करावयाचे आहे.
मग तुम्हाला केली गेलेली मदत, दिलेला आधार, जमलेली मैत्री, मिळालेला वैद्यकीय सल्ला, सुचवलेले स्थळ असे काहीही अनुभव असू शकतात. आणि हे अनुभव आंतरजालावर आणि प्रत्यक्षात भेटून असे दोन्ही प्रकारचे असू शकतात.

दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या व्यक्तीत आढळणारे काही चांगले गुणही आपण इथे लिहावेत.

टीपः
(१) अवलोकनात अनेक जणांनी अनेक कारणास्तव आपले नाव लिहीलेले नसते. तेव्हा हे अनुभव लिहीताना सभ्यतेचे संकेत पाळत त्या सदस्यनामा मागील खरे नाव लिहायचे झाल्यास त्या सदस्याची परवानगी मात्र घ्यावी.
(२) शक्यतो अवांतर टिप्पण्या टाळाव्यात.

तर मंडळी, एकमेकांविषयी आलेले चांगले अनुभव आणि तुम्हाला आढळणारे चांगले गुण लिहा बरे! फक्त आणि फक्त चांगलंच लिहायचं आहे!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज वाचला हा बाफ. तुरळक का होईना पण आवडत्या लिस्टीत माझे नाव बघून आश्चर्यच वाटले.

तर त्यांना धन्यवाद.

मला अनेक लोक आज आवडत असतात(वैयक्तिकरित्या वा लिखाणातून) तर उद्या आवडेनासे होतात आणि व्हाइसेव्हर्सा तेव्हा मी कुठलीच लिस्ट लिहिणार नाही.

मस्त धागा आहे हा.

पण अशी आवडणार्‍या मायबोलीकरांची यादी करणे खुप कठिण काम आहे.

१) दिनेशदा, जागू आणि असे अनेक मायबोलीकर जे त्यांच्या चविष्ट आणि सुंदर पदार्थांच्या पाककृतींची माहिती देत असतात.
२) जिप्सी, मार्को पोलो आणि अनेक उत्कृष्ट छायाचित्रकार मायबोलीकर जे मायबोलीवर नित्यनेमाने प्रकाशचित्रांची सुंदर मेजवानी देत असतात.
३)बेफिकीर यांच्या कथा/कादंबर्‍या वाचुनच मी मायबोलीचा सदस्य झालो.
४) अशोकमामा, चेतन सुभाष गुगळे तसेच अनेक प्रतिसादक जे खरोखरच चर्चा करण्यासाठी मायबोलीवर येतात.
५) स्पार्टाकस, डॉक्टर सुरेश शिंदे यांचे लेख/लेखमालिका ज्यामुळे खुप उपयुक्त माहिती मिळते.
६) धुंद रवी, राहुल फाटक आणि अनेक विनोदी लेखन करणारे लेखक ज्यामुळे दिवसभराची दगदगीनंतर सुध्दा मन प्रसन्न राहते.
७) सह्याद्री मित्र, वेड सह्याद्रीचे आणि अनेक ट्रेकर्स आणि भ्रमंती करणारे मायबोलीकर जे गड किल्यांची, निसर्गाची, विविध देशांची माहिती/प्रकाशचित्रांद्वारा देऊन त्या प्रदेशाची सफर घडवुन आणतात.

आणि सरते शेवटी अनेक धाग्यांवर एकमेकांविरूध्द शड्डू ठोकुन शाब्दिक प्रहार (वैयक्तिक टिपण्णी न करता) करणारे अनेक मायबोलीकर.
वेळे अभावी सर्वांची नावे लिहु शकत नाही त्यामुळे दिलगीर आहे.

@ काउ...

तु ह्या सगळ्यांना भेटला आहेस? आणि ह्या जेमतेम ५ आठवड्यांत तू ह्यांचे सगळे लेख वाचलेस?

धन्य आहेस तू...

बाकी काही म्हण हां , पण आता तरी माझा आंतरजालीय पुन:जन्मावर विश्र्वास बसत चालला आहे.

एक हितेस म्हणून आहेत, ते पण मिसळपाव खात उंडारत असतात. मिसळपाव खातांना त्यांना पण त्रास होतो....

त्यांचे आणि तुमचे मस्त जमेल.....

आपण एखादा कट्टा तुमच्याबरोबर नक्की करणार.ह्या तुमच्यासारख्या अवतारी पुरुषांना भेटायला मला नक्कीच आवडेल...

<<तर मंडळी, एकमेकांविषयी आलेले चांगले अनुभव.........फक्त आणि फक्त चांगलंच लिहायचं आहे >> !! Wink

<< भाऊ, या टिप्पणी वर काही व्यंगचित्र का नाही बरं????? >> या धाग्यावर व्यंग काढायचं नाहीं म्हणून !! Wink

जागू Happy

मला मात्र माझं नाव वाचुन अवघडल्यासारखं वाटतंय. मी जरी इथे भरपुर टायपत असले तरी प्रत्यक्ष कोणालाही भेटणे टाळण्याकडेच माझा कल आहे. मुळात जनसंपर्क असणे आणि तो वाढवणे ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत.

मात्र मायबोलीवरच्या भरपुर आयडीज माझ्या आवडीच्या आहे. कोणाकोणाची नावे घेणार? दिनेश,, जिप्सी, जागु, केअश्विनी, शांकली, शशांक, वर्षू हे सगळे निगचे दोस्त. जिप्स्याच्या फोटोंवर कमेंट देत नाही कधी पण खुप वेळा फोटो पाहणारी मी पहिली असते Happy जागुच्या माशांमुळे इतक्या प्रकारचे मासे आहेत हे कळले. दिनेशच्या रेसिपीज वाचताना लांबलचक वाटतात पण केल्यावर खुप चविष्ट लागतात.

काही आयडीज अशा आहेत ज्यांच्या पोश्टी आल्या की निदान एकदातरी नजर फिरवुन काय आहे ते पाहाअय्ची इच्छा होते. विशाल, लाजो, स्वप्ना_राज, डॉ. शिंदे, कौतुक इत्यादी नावे चटकन आठवली. पुर्ण वाचायला मिळाले नाही तरी निदान एक नजर तरी टाकल्याशिवाय राहावत नाही. जीएसच्या कथाही खुप आवडायच्या पण हल्ली तोही गायबलाय.

चिनुक्सकडे अन्न वै प्राणा: च्या ८ ब भागासाठी खुप दिवस तगादा लावतेय, अजुन यश मिळाले नाही. मग उगीच जुनेच भाग काढुन वाचते. घरी आठवण काढली की लेकीच्या शाळेत अन्न वै... कसे फेमस झालेले याच्या गप्पा होतात.

नंदिनी आणि नीधपच्या कथा मुद्द्दाम वेळ काढुन वाचते. नी कथांपेक्षा कविता जास्त छान लिहिते हेमावैम.

अजुन खुप कथालेखक आहेत ज्यांच्या कथा नंतर कधीतरी वाचल्या गेल्या आणि आवडल्या. हल्ली कथा हा प्रकार खुप दुर्मिळ झालाय माबोवर.

बीचे बीबी आणि पोश्टी वाचुन कधी करमणुक होते तर कधी डोक्याला हात जातो.

मनस्विनीच्या पाकृ खुप आवडायच्या पण ती कुठे गायबली. तिच्या पाकृ आजही केल्या जाताहेत.

पाकृच्या बाबतीत सग्ळ्याच मंडळींचे कौतुक वाट्ते. सुलेखाच्या पाकृ आवडतात. करायला सोप्या वाटतात.

बेफिकीरांचे साहित्यही मी अधुनमधुन वाचते. ते माबोवर आल्यावर सुरवातीच्या कादंब-या अगदी झपाटुन वाचल्या पण नंतर माझ्या वाचनवेगापेक्षा त्यांचा लेखनवेग जास्त झाला आणि मी मागे पडले. पण त्यांचा सिंहगडचे प्रवासवर्णन आणि त्यावरचे प्रतिसाद हा आजही माझा आवडता लेख आहे. कधीकधी खुप उदास वाटते, कशातही मन लागत नाही. अशावेळी हे प्रवासवर्णन काढुन वाचत बसते. आताही
आठवुन हसायला येतेय. Happy

अजुन भरपुर लोकांच्या भरपुर गोष्टी आवडतात. पण माझी स्मरणशक्ती फक्त १५ मिनिटांची असल्याने आता जे आठवले तेवढेच दिलेय. Happy

इथे फक्त आवडीच्या आयडीबद्दल लिहायचेय नाहीतर इथे नावडत्या आयडीज पण भरपुर आहेत. Happy

>>>बेफिकीरांचे साहित्यही मी अधुनमधुन वाचते. ते माबोवर आल्यावर सुरवातीच्या कादंब-या अगदी झपाटुन वाचल्या पण नंतर माझ्या वाचनवेगापेक्षा त्यांचा लेखनवेग जास्त झाला आणि मी मागे पडले. पण त्यांचा सिंहगडचे प्रवासवर्णन आणि त्यावरचे प्रतिसाद हा आजही माझा आवडता लेख आहे. कधीकधी खुप उदास वाटते, कशातही मन लागत नाही. अशावेळी हे प्रवासवर्णन काढुन वाचत बसते. आताही
आठवुन हसायला येतेय.<<<

खूप खूप आभार साधना! अशी विधाने कॉपी पेस्ट करताना कसलं भारी वाटतं राव! Happy

वर चुकून सिंहगड लिहिले. ते राजगड आहे हे आता परत तो लेख वाचताना लक्षात आले. (राजगड हा शब्द पुल्लिंगी आहे हा प्रतिसाद 'ते राजगड' लिहिताना आठवला आणि परत जोरात हसु फुटले Happy )

कोकणस्थ, सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद Happy मी माबोकर बनून २ वर्ष होऊन गेली. पण माझा इथे वावर तसा कमी आहे. त्यामुळे बरीच गुणी मंडळी माहीत नव्हती ती ह्या धाग्यामुळे माहीत झाली.

असो मला आवडणारी मंडळी
दिनेशदा (पाककृतीं आणि विविध देशांमधले अनुभव)

दाद, बेफिकीर, नंदिनी - कथा

अशोक मामा - वाचनीय प्रतिक्रिया आणि एकूणच सगळ्यांसाठी असलेलं कौतुक Happy

जिप्सी - फोटो

कोकणस्थ, रीया, दक्षिणा, इन्ना, सई, वर्षुनिल, वर्षुनिल, मामी, साती, स्वाती आंबोळे, मयेकर, अमा, - ह्यांचे लेख / प्रतिक्रिया जनरली आवडतात

भुंगा, स्वप्ना_राज - एलदुगो पसून ह्या दोघांची फॅन. स्वप्न अजुनही दिसते मालीकांची चिरफाड करताना Proud पण भुंगा नाही दिसल बर्याच दिवसात

भाऊ नमसकर - अर्थात व्यंगचित्र

आपण एखादा कट्टा तुमच्याबरोबर नक्की करणार.ह्या तुमच्यासारख्या अवतारी पुरुषांना भेटायला मला नक्कीच आवडेल

.......

परवा रविवारी मि डोंबोलीला येणार आहे. सहकुटुंब ...

भेटणार का ?

जोशी तुम्हाला धक्का बसला का..:)

तसे तुम्हीही माझ्या यादीत आहात बरं का...
माबोवरच्या व्यक्तींपैकी भेटलेले सर्वप्रथम म्हणजे मंदार जोशी. त्यांनी अतिशय आपुलकीने त्यांच्या गगो परिवारात सामिल करून घेतले आणि त्यावेळी गगो म्हणजे अतिशय धमाल असायची.
नुसत्या गप्पा आणि धिंगाणा...
बेफी, दक्षिणा, भुंगा, किश्या, डॉ. कैलास, विदिपा, दिनेशदा या सगळ्यांबरोबर धाग्यावर मज्जा यायचीच पण प्रत्यक्ष भेटीतही तितकीच.

बाकी, माबोने मला अमूल्य अशी भेट दिली ती सर्व भटके मंडळींची...
जिप्स्या, यो रॉक्स, विन्या, ओंकार ओक, हेम, इंद्रा, रोमा आदी मंडळी भेटली नसती तर खूप काही मिस केले असते. त्यांच्याबरोबर केलेली भटकंती ही सर्वात सुखद अनुभव देणारी होती.

कथांमध्ये बेफी, नंदिनी आणि विशालभौ यांचा फॅन.
विनोदी लिखाणात सर्वप्रथम धुंद रवी. कधीही कुठलेही लिखाण काढून वाचावे. सर्व ताण विसरून जाण्याची ताकत आहे. चिमणचेही तसेच.

चिनूक्सच्या उल्लेखाशिवाय ही यादी अपूर्ण आहे...अन्नं वै प्राणा: ची अगदी प्रिंटआऊट काढून पारायणे केली आहेत.

रैनाचे फुलों की घाटी, स्वप्नाचे पन्ने, टण्याची वारी, मार्को पोलोची अतुल्य भारत या सर्वांनी एक सुंदर वाचनाचा आनंद दिला. त्या सर्वांचेच आभार. (टण्याने वारी पूर्ण केली तरच आभार)

बाकी, इब्लिस, जामोप्या यांच्याबाबत कितीही मतभेद असले तरी त्यांच्या काही काही पोस्ट जबरी असतात आणि या दोघांना एकदा तरी भेटण्याची तीव्र इच्छा आहे.

अजून खूप खूप नावे आहेत.

मी नताशा, आशूचँप, अनेक अनेक आभार Happy

आशूचँप, प्रत्यक्ष भेटीचा आनंद निराळाच! अजूनही तुम्हा सर्वांचा एक फोटो माझ्याकडे आहे. हरकत नसल्यास येथे डकवेनच.

ओके

Pages