बर्मूडा

Submitted by bnlele on 8 December, 2014 - 04:47

बर्मूडा

जपल- वाढवल, माझ मीपण, आयुष्यभर
शोधून थकलो, हरवल ते बालपण
मागू कुणापाशी येत्या वाढदिवशी ?

चिमुअकली नात म्हणते झोकात-
नेहमी मीच देते शोधून, काय ते सांगा,
हरवल माझ काही, तुम्हीच देता हुडकून !

बदल्य्यात सांगा गोष्ट नवीन,
कबूल तर च्हटकन देईन.
सांगूकाय पेच्ह पडला मला

कोलंबसच्या टिपणात म्हणे एक दुवा-
अत्थांग सागर्री दिसला ज्वालेचा गोळा
दिशाहीन नावेचा सुकाणू फिरला-

"ती" दिशा टाळून प्रवास पुढे केला-
अन्‌ अमेर्रिकेचा शोध त्याला लागला
बर्मूडाचा धोका टळला.

चढाओढीच्या या युगात-
धावलो घेऊन मीपणाची मशाल
जमेची बाजू -तरी शून्यच दिसते.

स्पर्धा-संधी-क्षमता गमावून जगलो
बालपण सगळं हरवून बसलो
नातीसवे लहान मी होतो-

क्षणि कां होईना बर्मूडा टळतो
जगण्याचा अर्थ गवसतो.
कोलंबसचा आनंद मीही लुटतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोलंबसच्या रोजनिशीत समुद्रात खूप मॊठा आगीचा लोळ दिसला पण त्यासोबत मानवमात्र दिसले नव्हते अशी नोंद आहे म्हणतात. म्हणून "त्या"दिशेला तो गेला नसावा अस मी कल्पित केल.
बर्मुडा सोबत त्रिकोण शब्द असण्याच कारण ३९ लक्ष वर्ग मैलाच्या टापूत धोका आहे हे शात्रज्ञांनी पाहिलाहे; कवितेत "स्प्रर्धा,संधि,आणि,क्षमता" या शब्दांनी त्रिकॊण दर्शविण्याचा मी प्रयत्न केला हे स्पष्टिकरण.

स्प्रर्धा,संधि,आणि,क्षमता" या शब्दांनी त्रिकॊण दर्शविण्याचा मी प्रयत्न केला हे स्पष्टिकरण

वाह , अप्रतिम झालीये कविता Happy