नरेंद्र मोदी : Asian of the Year

Submitted by भरत. on 5 December, 2014 - 21:19

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरच्या The Strait Times या दैनिकाचे २०१४ साठीचे Asian of the year ठरले आहेत. त्यांचे अभिनंदन.
मोदीची २०१४चा आशियाई अशी निवड होण्यास 'आधी शौचालये, मग देवालये', 'मेक इन इंडिया' याणसारख्या विकासाच्या घोषणांनी देशात निर्माण झालेले नवचैतन्य हे एक कारण ठरले. "गुंतवणूकदारांसाठी सोयीची धोरणे व शिथिल होत असलेले कामगारविषयक कायदे यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ जोमाने होईल."

एका राज्याचा विकासाभिमुख प्रशासक आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या आशाअपेक्षांची दखल घेत द स्ट्रेट टाइम्सने नरेंद्र मोदींनाi Asian of the Year घोषित केले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आमच्या अड्ड्याच्या धाग्याच स्पष्टीकरण यायला लागल आहे,

खोट बोलण्याची हद्दच झाली !!

म्ह्णे उगाच गमतीखातर हेडर मध्ये लिहीलय की हा धागा फक्त निमंत्रीतांसाठी खूला आहे,

मग तुमच्या ग्रूपचेच लोक ईतरांना "हाड हूड ' करत होते ते का ? आणि कोणी चुकुन पोहोचलच तर त्याच्यावर तुटुन पडत होते, तुमच्या हेडरवर लिहीलेल न बघताच तुमच्या धाग्यावर येत होते त्यांना काही अती संस्कारी लोक "आता हला" ,"आता निघा" अस सांगत होते.

आता तेच लोक "आमचा अड्डा" हा धागा लोकार्पण करा अस सुचवत आहेत !!

किती तो विपर्यास ?

बेफि,
'मी बाहेर चाल्लो' 'मी जेवायला चाल्लो' म्हणून पळून जायचं, अन मग रात्रीबेरात्री इथे येऊन मुक्ताफळं उधळायची हे काय बरोबर नाय. आजकाल समोरासमोर बोलायला जमत नाही का? इतकी पंचाईत करून ठेवलिये का भाजपाने - आयमीन "मोदी सरकार"ने? Wink

कागाळे,
हला आता. फार झालं शेपटासारखं मागेमागे फिरणं. (← हे माझ्या वतीने. ग्रूपच्या वतीने बोलायला इतर ग्रूप मेंबर आहेत.)

इब्लिस,

ह्या धाग्यावर कृपया वाद घालू नयेत अशी विनंती!

इतर एखाद्या वाहत्या पानावर बोलू. येथे ऋन्मेष ह्यांनी टाकलेल्या प्रतिसादामुळे भाऊसाहेबांचा जो गैरसमज झाला त्यावर इतरजण तुटून पडले व धाग्याला वेगळे वळण लागले. हे पाहून आधीच हा वाहता धागा आता ग्रूपपुरता झाला आहे.

तुम्ही मला उद्देशून जे वर लिहिलंय तो वाद नसून स्तुतीसुमनं उधळली आहेत असं म्हणायचंय का तुम्हाला? 'इथे वाद घालू नका' हा शहाजोगपणा कशाला वरतून?

भाऊसाहेबांचा गैरसमज काय होता, ते डकवू का परत इथे? कशाला उगंच सभ्यतेचा आव आणताय? गांधी व नेहरू घराण्याबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दांत बोलणे हे तुम्हा सर्व भाजपा समर्थकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे, अन तितकेच मी पॉइंटआऊट केले. त्यापुढे वादबिद घालायची मला गरज नाही.

मला 'भाऊसाहेब' म्हणण्यापेक्षां माझ्या इतर मित्रांसारखं मला 'भावड्या' संबोधून प्रेमानं टपल्याही मारलेल्या आवडलं असतं मला ! बर्‍याच जणाना वेडंवाकडं वाटणारं माझं काय तें लिहून, व माझ्यावर उधळलेलीं स्तुतिसुमनं ऐकून, झालंय माझं इथलं. आतां सर्वानी धाग्याच्या विषयाकडे वळावं हें उत्तम. Wink
[ अगदींच रहावत नाहीं म्हणून जातां जातां ॠन्मेषजीना एक मात्र सांगतो, वाक्याचा अर्थ मुख्यत्वें कुठे व कसं तें वापरलं जातं या संदर्भावरच अवलंबून असतो. इतकं न समजण्याइतके ते भाबडे नसावेत व मलाही तितका भाबडा समजत नसावेत ! ] -

amerepaasa.JPG

लोकहो,

श्री इब्लिस यांचे खालील विधान पाहून जाम हसायला आलं. वडाची साल पिंपळाला लावणे ते हेच.

>> गांधी व नेहरू घराण्याबद्दल अत्यंत घाणेरड्या शब्दांत बोलणे हे तुम्हा सर्व भाजपा समर्थकांचे व्यवच्छेदक लक्षण
>> आहे,

साफ चूक. अशांना गांधीद्वेष्टे वा नेहरूद्वेष्टे म्हणतात. त्यांचा भाजपच्या समर्थनाशी काही संबंध नाही.पण

जाताजाता : गांधी आणि नेहरूंबद्दल खरं बोललं तर श्री इब्लिस यांना ते घाणेरडं का वाटतं?

आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींबद्दल जे म्हंटलंय तेही विकृतीत धरावं असं श्री इब्लिस यांचं म्हणणं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

अग्दी अग्दी. पैलवान, सडक्या डोक्याने लिहिण्याची सवय जाणार नाही तुमची. प्रत्येकदा पुराव्यासकट तुमचे खोटारडेपण सिद्ध केले, तरी नव्या दमाने विकृती ओकायला तुम्ही तयार असता.

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बध्धप्रलापश्च वाङ्ग्मयं स्याच्चतुर्विधम् ॥

अर्थातः कठोर वचन उच्चारणे, खोटे बोलणे, चहाडी करणे, आणि बिनकामाच्या गप्पा मारणे - ही चार प्रकारची संभाषणे पाप आहेत.

{कोकम यांच्या धाग्यावरिल श्लोक}

सर्वांना नम्र विनंती! ह्या धाग्यावर कृपया वाद घालू नका. काल जे झाले ते झाले. तो एक मोठा गैरसमज होता जो ऋन्मेष ह्यांच्या व्यवस्थित मजेशीर असलेल्या प्रतिसादामधून भाऊसाहेबांचा उगीचच झालेला होता. त्यात दोष ऋन्मेषचाही नाही आणि भाऊसाहेब किंवा इतरांचाही नाही.

पण त्यानंतर हा धागा प्रशासकांनी ग्रूपपुरता मर्यादीत केलेला दिसत आहे. येथे अजून काही झाले तर काही सदस्य शहीद होऊ शकतील असे मला वाटत आहे.

बाकी ज्याची त्याची मर्जी!

बेफिकीर,

अगदी मनातलं बोललात! आंबेडकरांचं नाव काढलं की कुणाच्या तरी भक्तांना प्यांटीत घाम फुटतो. मग वैयक्तिक चिखलफेक सुरू होते. श्री इब्लिस यांनी लावलेला सापळा वेळीच ध्यानात आणून दिल्याबद्दल आभार! Happy

आता गंमत बघा, गाम्याने साधं आंबेडकरांचं मत विचारात घ्यायला सांगितलं तर तो विकृत ठरतो. आणि इथे पप्पूकंपूतली धुतल्या तांदळासारखी धेंडं बघा मोदींवर काय दर्जाचे विनोद पसरवताहेत :

https://www.facebook.com/profile.php?id=100006431254192&fref=ts

mayekar_ishsha.jpgdide_hadd.jpg

आ.न.,
-गा.पै.

लोकहो,

श्री इब्लिस यांचे एक रोचक विधान दृष्टीस पडले आहे :

>> पैलवान, सडक्या डोक्याने लिहिण्याची सवय जाणार नाही तुमची. प्रत्येकदा पुराव्यासकट तुमचे खोटारडेपण सिद्ध
>> केले, तरी नव्या दमाने विकृती ओकायला तुम्ही तयार असता.

माझ्या खोटारडेपणाचा एखादा पुरावा मिळाला तर बरं होईल.

आ.न.,
-गा.पै.