किल्ले रणथंबोर

Submitted by आशुतोष०७११ on 5 December, 2014 - 09:48

रणथंबोरला नॅशनल पार्कला बर्‍याचदा भेटी दिल्या पण प्रत्येक वेळेस काही ना काही कारणाने रणथंबोरच्या किल्ल्याला भेट देण्याचा योग नेहमी हुकायचा. अर्थात बहुतेक वेळेस राजस्थानचा उन्हाळा आणि माझा आळस हीच दोन प्रमुख कारणं असायची.

ह्या रणथंबोर दौर्‍यात मात्र किल्ला पाहण्याचा बेत तडीस नेलाच. किल्ल्याच्या पायथ्याशीच मनीष नावाचा गाईड ठरवला. त्याला बरोबर घेउन किल्ला फिरलो. त्याच्याकडून कळलेला संक्षिप्त ईतिहास हा खालीलप्रमाणे.

रणथंबोरचा किल्ला हा भारतातील एक बलाढ्य किल्ला म्हणुन ओळखला जातो. हा किल्ला चाहमना साम्राज्याचा एक अविभाज्य भाग होता. असं म्हणतात की हा किल्ला राजा जयंताने ५व्या शतकात बांधला. पॄथ्वीराज चौहानने या किल्ल्यावर कब्जा करण्यापूर्वी या किल्ल्यावर यादव घराण्याची सत्ता होती. राजा हम्मीरदेव हा रणथंबोरला लाभलेला सर्वात शूर राज्यकर्ता.

सन १३०१ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने राजा हम्मीरदेवचा पराभव करुन हा किल्ला जिंकला. राणा सांगाने सन १५०९ मध्ये मोगलांचा पराभव करुन हा किल्ला पुन्हा राजपूतांच्या ताब्यात आणला.

या किल्ल्याची तटबंदी चांगलीच मजबूत आहे. किल्ल्यात प्रवेश करताना एकूण ७ दरवाजे लागतात. नौलखा पोल, हथिया पोल, गणेश पोल, सुरज पोल, दिल्ली पोल आणि सात पोल.

IMG_0053_MA_RS.jpgIMG_0059_MA_RS.jpgIMG_0055_MA_RS.jpg

किल्ल्यात हम्मीरमहाल, राणीमहाल, हम्मी बडी कचेरी, छोटी कचेरी, बत्तीस खंबा छत्री, अशा ईमारती आहेत.

IMG_0049_MA_RS.jpgIMG_0071_MA_RS.jpgIMG_0077_MA_RS.jpgIMG_0089_MA_RS.jpgIMG_0091_MA_RS.jpgIMG_0075_MA_RS.jpgIMG_0076_MA_RS.jpgIMG_0092_MA_RS.jpg

किल्ल्यात एकूण २१ हिंदु देवळे, १ जैन मंदिर आणि १ दर्गा आहे. २१ देवळांपैकी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे.
ईथल्या गणेश मुर्तीची खासियत अशी की ही मुर्ती त्रिनेत्री आहे.

IMG_0025_MA_RS.jpg

वरच्या फोटोत दिसणरी चेहर्‍याच्या आकाराच्या शीळेची हकीकत अशी की राजा हम्मीरदेवला अल्लाउद्दीन खिलजीशी झालेल्या युद्धात पराभव स्वीकारावा लागला कारण त्याचे ३ मुख्य सरदार मोगलांना फितुर झाले होते. त्या सरदारांच्या गद्दारीचं प्रतीक म्हणुन हा दगडी चेहरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच आहे. स्थानिक जनतेत अशी प्रथा आहे की किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी ह्या चेहर्‍याला चप्पल हाणायची आणि मगच किल्ल्यात प्रवेश करायचा.

दुसरी कथा अशी सांगतात की राजा हम्मीरदेवच्या पराभवानंतर किल्ल्यातल्या तमाम स्त्रियांनी राजपूत प्रथेप्रमाणे जोहार केला. चितोडला राणी पद्मिनीच्या वेळचा जोहार हा राजपूत ईतिहासातला सर्वात मोठा जोहार, त्याखालोखाल रणथंबोरच्या किल्ल्यात झालेला जोहार हा दुसरा मोठा जोहार समजतात.

रणथंबोर टायगर सफारी करतानाच सवड काढून एकदा तरी भेट देण्यायोग्य हा किल्ला निश्चितच आहे. संपुर्ण किल्ला फिरण्यास २-२.५ तास सहज पुरतात.

IMG_0061_MA_RS.jpgIMG_0078_MA_RS.jpgIMG_0080_MA_RS.jpgIMG_0085_MA_RS.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सहल...

राजस्थानातले किल्ले बघतांना, नकळत माहाराष्ट्रातील किल्ल्यांची पण तुलना होते.

तिथले किल्ले अद्याप टिकून आहेत आणि आपले मात्र ?????????

२००३ मध्ये रणथंबोरला गेलो असताना किल्ल्याची सफर केली होती, त्याची आठवण झाली.
बांधवगडचा किल्लाही असाच सुंदर आहे.

फोटो छान .
सवाई माधोपुरवरून किती दूर आहे ?अभयारण्याच्या आत आहे ?कधी जाता येते आणि प्रवेश किती रुपये ?आणखी कोणती सहल इथून करता येईल ?

मस्तच... चित्रसफर आवडलीच.
१२व्या फोटोत लिहिलेली प्रथा वेगळीच आहे, पण जबरी. Happy

Srd,
सवाई माधोपुरवरून किती दूर आहे ? रणथंबोर नॅशनल पार्क भोवतीची रिसॉर्ट्स सवाई माधोपूरला आहेत. सवाई माधोपूरपासून नॅशनल पार्क चे १ ते ५ झोन्स साधारण ९ किमी आहेत, झोन्स ६ ते १० साधारण ८ किमी आहेत.टायगर सफारींची बूकिंग्स ऑनलाईनही करता येतात.

अभयारण्याच्या आत आहे ? किल्ला झोन्स २ आणि ३ च्या गेटसमोर आहे. किल्ल्यावर जायला नॅशनल पार्कच्या मेन गेटमधुनच जायला लागते.

कधी जाता येते आणि प्रवेश किती रुपये ? सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत किल्ल्यावर कधीही जाता येते. किल्ल्यावर जायला प्रवेश फी नाही.

आणखी कोणती सहल इथून करता येईल ? रणथंबोरला फक्त टायगर सफारी आणि किल्ला. ईथून पुढे जयपूर ( बाय रोड ४ तास ) किंवा भरतपूर ( केवलादेव नॅशनल पार्क ), फतेहपूर्-सिक्री मार्गे आग्रा जाता येतं.