ट्रॅफीक दुर्दैवाचे दशावतार

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

आज ट्रॅफीक मध्ये अडकलो. त्यामुळे उद्वेगान असल काहीतरी लिहून काढलेल इकडे डकवल Proud
.
१) ट्रॅफीक जाम अवतार : आपल्याला कुठेतरी वेळेत पोहोचायच असत. नेमका तेव्हाच हा अवतार प्रकट होतो. आणि तुम्ही बाजूच्या खिडकीतले रडणारे/ केकाट्णारे पोर (जर मुंबईकर असाल तर) नायतर शेजारच्या स्कुटी/ कायनेटीक वरची बुरखाधारी व्यक्ती (जर पुणेकर असाल तर ) न्याहा़ळत बसता.
.
२) सिग्नल डाऊन अवतार : आपण सिग्नलपाशी क्रॉसींगला आलो रे आलो की सिग्नल पडतो (पडतो म्हणजे जागच्याजागीच लाल होतो) . जर पादचारी असाल तर हिरवा होतो ('हिरवा होणे' ह्याचा दुसरा कुठलाही शाब्दिक अर्थ येथे अभिप्रेत नाही)
.
३) कंडक्टर/ मास्तर अवतार: आपण ४ रुपयाचे तिकीट मागीतले असताना, संपूर्ण बस ला ऐकू जाईल इतपत 'सौम्य' आवाजात आपण काढलेल्या १०० रुपयाच्या कोर्‍या करकरीत नोटेला 'इस्त्री करुन व्यवस्थीत घडी करुन कपाटात ठेवा' अशी प्रेमळ मौलीक सुचना करतो.
.
४) ताटी बंद अवतार : आपण तासभर वाट बघून तिकीट खिडकीपाशी पोहोचतो न पोहोचतो तोच खिडकी बंद होते. आपली 'ताटी उघडा तिकीटेश्वरा' अशी आर्त साद आतमध्ये पोहोचत नाही.
.
५) बस लेट अवतार : तुम्ही एखादे दिवशी 'बस' ची वाट बघत 'उभे' असता. आणि तुम्हाला हवी असलेल्या सोडून इतर सर्व बशी (बस चे अनेकवचन) तुम्हाला खीजवत निघून जातात.
.
६) ट्रेन बंद अवतार : तुम्हाला अगदी चुकून खिडकी जवळची सीट आणि खिडकीतून येणारा फुकटचा वारा मिळालेला असतो. आणि बरोबर तेंव्हाच तुमची लोकल बांद्रा खाडीपाशी उभी रहाते. शेजारचे 'भाऊ' लोक तुम्हाला खिडकी बंद करु देत नाहीत. आणि तुम्ही बाहेरुन येणारा खाडीचा सुवास आणि शेजारचा 'राईच्या तेलाचा' सुवास ह्या दोन्हीतून येणारा मिश्र गंध हुंगत बसता.
.
७) चौथी सीट अवतार : तुम्हाला कुणीतरी 'प्रेमळ' सहप्रवासी उदार मनाने लोकल मधली चौथी सीट देतो. आणि डब्यात शिरणारा प्रत्येक प्रवासी तुमच्या पायपुसण्या प्रमाणे उपयोग करतो. जमल्यास एखादा नाजुकसा लत्थाप्रहार करुन जातो.
.
८) रिक्षा बंद अवतार : तुम्ही महत्कष्टाने मिळवलेली रिक्षा आजुबाजूला कोणतेही वहान अथवा प्रवासी नाही ह्याची खातरजमा करून बंद पडते.
.
९) भिक्षाम देही अवतार : तुम्ही सिग्नलला ताटकळत असताना , तुमचा भिकारी, तृतीय पंथी , फुलवाले, खेळणी वाले, चणे शेंगदाणे वाले असा चहाता वर्ग जमा होतो आनि तुमच्याशी संवाद साधू इच्छीतो
.
१०) डुलकी सहप्रवासी अवतार : तुम्हाला लोकल अथवा बस मध्ये झोप अनावर झालेली असताना , तुमच्या शेजारील सहप्रवासी हक्काने तुमच्या खांद्यावर (झोपेतली) मान टाकतो आणि तुम्ही उजाड डोळ्याने ' कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके' गुणगुणत रहाता.
.
इती श्री ट्रॅफीक दुर्दैवाचे दशावतार पुराण समाप्त.

चू भू द्या घ्या.
**********************************************************

विषय: 
प्रकार: 

केदार,
बरेच दिवसांनी काही तरी लिहायला घेतलस, ट्रॅफिक आणि दशावतार हे कॉम्बीनेशन कसल भन्नाट वाटतय, अवतारपण चांगलेत, यातले काही अनुभवलेत काही नाही Happy

चणे शेंगदाणे वाले असा चहाता वर्ग >>> Lol

धन्यवाद : रुनी , चिनू , सींड्रेला Happy
.
आणिक कुण्णाला आवडलेल दिसत नाय वाटत Sad Sad

चांगलं लिहिलं आहेस केदार. Happy

केदार, कुण्णाला आवडलं नाही काय म्हणतोस. मी आत्ताच बघितलं व वाचलं आणि आवडलं. प्रत्येकालाच हा अनुभव येतो Happy

------------------------------
पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती | सगुण रुपाने येऊन स्वामी स्विकारा आरती ||

>>> 'इस्त्री करुन व्यवस्थीत घडी करुन कपाटात ठेवा'
Lol

  ***
  The geek shall inherit the earth (BILL 24:7)

  आवडल नाही काय विचारतोस? इतके काय आमी अरसिक नाही काय!
  लेका इमेज ऐवजी आता मजकुर टायपलास ना? आता नीट वाचता आले! Happy
  व्हेरी गुड्ड
  फक्त त्या बान्द्रा खाडीऐवजी माहिमची खाडी अस लिहिल तर जास्त योग्य होईल! Happy चु. भु. दे. घे.
  ...;
  आपला, लिम्बुटिम्बु

  केदार, 'इस्त्री करुन व्यवस्थीत घडी करुन कपाटात ठेवा' प्रेमळ मौलिक सुचना.. अगदि अगदि.. स्वानुभव.. Happy
  तुम्ही उजाड डोळ्याने ' कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके' Lol
  धमाल लिहिलं आहेस. Happy

  आवडलं, आवडलं रे केदारा...! छान लिहीलं आहेस...

  धन्यवाद गजा, अश्विनी, स्लार्टी , लिंबू, भावना , मी योगी, श्यामली Happy
  लिन्बूदा : तीच ती. कुणी बांद्रा खाडी म्हणा कुणी माहीम खाडी म्हणा Happy

  केदार भन्नाट लिहिले आहेस..

  या पार्श्वभुमीवर मला माझ्या एका मैत्रिणीने पाठवलेलं कंटाळ्यावरची एक गंम्मत आठवली.. अर्थात त्याचा इथे काहीच संबंध नाहीये.. पण एक गम्मत म्हणुन देतेय.

  कंटाळ्याचे प्रकारः--
  1) Kutryapeksha bekaar kantala
  2) Toofani kantala
  3) Bekaar kantala
  4) Lai kantala
  5) Ashakya kantala
  6) Asankhya kantala
  7) Jarasa kantala
  8) Jabri kantala
  9) Jalim kantala
  10) Julmi kantala
  11) Jahal kantala
  12) Behaal kantala
  13) Hukmi kantala
  14) Jeshtha kantala
  15) Shreshtha kantala
  16) Vikrut kantala
  17) Chirkoot kantala
  18) Mast kantala
  19) Vishal kantala
  20) Meta-kantala ( mhanje kantalyacha kantala)
  --------------------------------------------------------------------------------

  ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
  अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
  रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
  धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

  तिसरा अन नववा मस्त रे केदारा.. Happy

  --
  आतली पणती, तेवायला अशी;
  अंधाराची कुशी, लागतेच..!!

  धन्यवाद अनघा , साजीरा Happy
  अनघा : लिस्ट मस्तच Happy

  मस्त केदार.. Happy रंगीबेरंगी पहायच लक्षात रहात नाही, म्हणून वाचायचं राहिलं..

  धन्यवाद अनघा आवर्जून वाचून प्रतिक्रीया दिल्याबद्दल Happy
  धन्यवाद भाग्यश्री आणि जाईजुई Happy

  अरे मस्त आहे हे!! पाहीलंच नव्हतं मी!! सहीच..

  मी पण पाहिलं नव्हतं, आत्ता तुझ्या ब्लॉगवरून पाहिलं! लैच भारी!

  >>> 'इस्त्री करुन व्यवस्थीत घडी करुन कपाटात ठेवा'
  मी तर त्याची बत्ती बनवून (नाकात) घुसवा असही ऐकलय....