पहिला प्रयत्न....

Submitted by Sakshi M on 2 December, 2014 - 00:27

नमस्कार मायबोलिकर,

मायबोलिवर लोकरिपासुन नव नविन वस्तु बनवलेल्या पाहुन माझ्याहि मनात आले कि आपणहि काहितरि करण्याचा प्रयत्न करावा..

घरात तसेहि खुप दिवसांपासुन लोकर पडुनच होते, मग ठरवले काहि तरी बनवण्याचा प्रयत्न करावाच... तेव्हा हे लोकरिपासुन बनवलेले मोबाईल कव्हर (जे मि माझ्या मनानि केले आहे).. आणि फुल (जे मला माझ्या आईने शिकविलेले आहे).. काहि चुकले असेल तर संभाळुन घ्यावे..

IMG-20141127-WA0023.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चुकायचंय काय त्यात! मस्त झालेत दोन्ही!
असेच अजून फुलं बनवून पंगतीच्या ताटाभोवती ठेवता येतील, सोपी अन सुटसुटीत रांगोळी! Happy

सर्वांचे मनापासुन धन्यवाद...

असेच अजून फुलं बनवून पंगतीच्या ताटाभोवती ठेवता येतील, सोपी अन सुटसुटीत रांगोळी!>> खुप छान आयडिया आहे..

कॉम्बीनेशन मलाही फार आवडले. बेज कलर पण जांभळ्यासोबत खूप छान दिसतो. मस्त जमलंय!

अशीच छोटी फुले करून अ‍ॅक्सेसरीज करता येतील, जसे वुलन इयर रिंग्ज, नेक लेस, हेअर किंवा वेस्ट बेल्ट ला, छोट्या मुलांच्या ड्रेस वर, कुर्ती/टिशर्ट वर, पर्सेस किंवा मोबाईल कव्हर वर शो म्हणून चिकटवण्यासाठी, सोफा कुशन्सच्या कॉर्नरला छोटी छोटी फुले!

बघा किती आयडीयाज... पुढील प्रयत्नांसाठी!!! इथे जरूर पोस्ट करा. शुभेच्छा!

सुंदर झाल आहे ग. अजुन यु ट्युबवर, नेटवर बघ भरपूर वेगवेगळ्या डिझाइन्सही मिळतील.

dreamgirl, जागुताई, बी, शानु, धन्यवाद....

अशीच छोटी फुले करून अ‍ॅक्सेसरीज करता येतील>> dreamgirl खुप छान आयडीयाज आहेत...

पांढरे मोबाईल कवर वापरल्यावर लवकरच वेगळ्या रंगाचे होते +१>> +१