का एकटेच जगताना

Submitted by कमलेश पाटील on 29 November, 2014 - 04:11

का एकटेच जगताना आयुष्य पिसाटून जाते
का उरला सुरला श्वास धाय मोकलून गातो

आकाश गवसले तेव्हा पंख साधती डाव
गरुड्झेप घेणारा मी पाकोळी होउन जातो

डोळ्यात सुन्या गावाचे नाव सापडून जाता
वेडेच उगा दाटावे आकाश खुळ्या स्वप्नांचे

हातात तुझ्या देण्याचे उपकार अपरिमीत होते
ओंजळ भरुनी सुद्धा अश्रू डोळ्यांशी दाटे.

हे भोवतीस जमलेले माझेच लोक नात्याचे
मीच एकटा वेडा स्वत:ला फसवत जातो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users