थांबणे सोसेल तोवर लागते चालायला (तरही)

Submitted by इस्रो on 29 November, 2014 - 00:22

आपुल्या मरणास जमले ना कुणा चकवायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला

ओळ साधी एक ज्यांनी नीट लिहिली ना कधी
शायरीविषयी मला ते लागले सांगायला

खर्च होते जिंदगी ही पैन-पै जमवायला
का उशीरा खूप पण हे लागते समजायला

भेटलो मी काल जेव्हा मदभर्‍या गझलेस त्या
बाटलीही दूर आता लागलो सारायला

शेवटी त्यांना कळाले मीच आहे तो कवी
नीट माझ्याशी अता ते लागले वागायला

वाटते आहे तुला जर व्हायचे लवकर बरे
औषधांसह पथ्य 'इस्रो' तुज ह्वे पाळायला

- नाहिद नुरुद्दिन नालबंद 'इस्रो'
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान