प्रेम उणे स्वार्थ हाच प्रेमाचा अर्थ

Submitted by विनायक. दि.पत्की. on 24 November, 2014 - 09:21

प्रेम म्हणजे प्रेम असते ..........तुमचे आमचे सेम असते ........
प्रेमा बद्दल एकच सत्य आहे ते म्हणजे .....फुलात फुल जाईचे ,जगात प्रेम आईचे.........करण ते निस्वार्थच असते
तसे गुरुचे शिष्यावर हि खरे प्रेम असते मात्र त्यासाठी शिष्याला आपली पात्रता सिद्ध लागते तर फक्त आईच्या पोटी जन्म घेतला कि तिच्या प्रेमाचा हक्कदार आपण होत असतो.
........... पण प्रेम जरूर करावे मात्र प्रेमात स्वार्थ नसावा आणी आला कि प्रेम संपलेच ते पुन्हा पुनर्वत होणे कठीणच असते.मग ते नाते बाप लेकाचे-लेकीचे असो कि भावा भावाचे-बहिणीचे असो कि पती पत्नी असे कोणतेही असो .

मी प्रेम वेडा,बनतो कधी कधी प्रेमिक
गोळा करतो कांगऱ्या,सोडून हिरे माणिक

एकटा जीव सदाशिव मग आधार कशाला?
स्वार्था नंतर तिरस्कार नेहमीच असतो उशाला

मनोमन इच्छा आहे शुद्ध मैत्रीची
राहून राहून ती दाखवते वाट प्रीतीची

भावना माझ्या करतात मला मंद
विरहात हि ती घेते प्रीतीचा सुगंध

वागणे तिचे हे असते नेहमीच भलते
तिची हि चेष्टा मला मनोमन सलते

हे विचारच मला करतात सुन्न
बेफाम हे मन मग होते उद्विग्न

मनस्ताप वाढतो विनाकारण
चालूच तिचे तिरस्कारी राजकारण

मन माझे भोळे तर कधी लंपट
कल्पना न कशाची काय येईल संकट

कोऱ्या प्रेमपत्राने करते ती एप्रिल फुल
हाती माझ्या भोपळा काय करावे वसूल

दोष पूर्ण दृष्टी माझी निर्मिते शंका
सभोवती असते तिच्या पार्वतीची लंका

लटकेची म्हणते मला का रे हा डाव घातला
अरे तू तर सिंह, पण मेंढ्यांच्या कळपातला

का झालास रे घायाळ ? सावर तुझी आयाळ.
शिकार सोडून व्यर्थ आहे, क्रीयेविन वाचाळ | ||

सिहासारखे असून मेंढयात राहणे स्वार्थ
तिच्या निष्पाप प्रेमाचा उशिरा कळला अर्थ

स्वार्थ आणि निस्वार्थ त्याचे तेच जाणती
प्रेमाने साधावी प्रगती, टाळून अधोगती

प्रगती आणि अधोगती नशीब नसते
स्वार्थामुळेच दिशा ठरलेली नसते

प्रगतीसाठी स्वार्थ वगळावा प्रेमातून
प्रगती होत असते फक्त मनोमिलनातून

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे येथे दोघांचा स्वार्थ एकच असणे अपेक्षीत आहे
वेगवेगळा स्वार्थ विभक्त करणारच