Submitted by प्रितीभुषण on 21 November, 2014 - 00:05
Dengue treatement>>
लोकहो मला Dengue treatement बद्दल माहिती हवी आहे
नेट वरचे वाचुन ठोडे कन्फ्युजन झालै
घरी घेण्याच्या काळ जी बद्दल पण लिहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पपईच्या पानाचा रस पिणे..
पपईच्या पानाचा रस पिणे..
पपईची कोवळी पाने घेऊन ती गरम पाण्यात उकळायची, मग त्याचा मिक्सरमधून रस काढायचा आणि तो प्यायचा. उकळताना वापरलेले पाणी मिक्स करताना वापरले तरी चालते.. चवीसाठी थोडी साखर घालावी.. कारण रस कडू असतो.
किवी हे फळ खाणे.
खाण्यापिण्याची कोणतीही पथ्ये नाहीत त्यामुळे बिन्धास्त सगळे पदार्थ खायचे.. पण विश्रांती घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.. कारण अशक्तपणा बरेच दिवस जाणवतो.. (घरात दोन पेशन्ट होते त्यामुळे माहिती एकदम पक्की आहे..)
धन्स हीम्स्कुल
धन्स हीम्स्कुल
पपईच्या पानाचा रस पिणे.. किवी
पपईच्या पानाचा रस पिणे..
किवी हे फळ खाणे.
>>
हे उपाय डेंग्यु वरचे नाहीत अन?
फक्त पेशी वाढवायला आहेत ना हे उपाय?
डेन्ग्यु झाला असे डॉ. ने
डेन्ग्यु झाला असे डॉ. ने कन्फर्म केलेय तर त्याच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करा. नेटवरचे वाचुन औषधोपचार करण्याइतका हा आजार साधा नाहीय. बहुतेक लोक जरी लगेच बरे होत असले तरी मरणा-यांची संख्याही काळजी करण्याजोगी आहे.
डेन्ग्यु झाला असे डॉ. ने
डेन्ग्यु झाला असे डॉ. ने कन्फर्म केलेय तर त्याच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करा. नेटवरचे वाचुन औषधोपचार करण्याइतका हा आजार साधा नाहीय.<< १००+
मुळात कोणताही आजार होऊ नये ही काळजी घ्यावी, रोगप्रतीकार शक्ती जेवढी जास्त तेवढा डेंगी चा धोका कमी,
डेंगी वर आजुनही खात्रीलायक औषध उपलब्ध नाहीये.
मला पपई च्या पानांच्या रसाचा खुप उपयोग झाला. सोबत किवी आणी सफरचंद हे सुद्दा खातच होतो.
पाणी जास्त प्यावे. असे देखील
पाणी जास्त प्यावे. असे देखील सांगतात
मुळात डेंग्युला उपचार असा
मुळात डेंग्युला उपचार असा काहीच नाहीये..तो आपोआप बरा होतो. पण त्यादरम्यान प्लेटलेट कमी होणे हे धोकादायक असते. मी आत्ताच यातून बाहेर आलोय त्यामुळे खात्रीशीर सांगू शकतो. हॉस्पीटलमध्येही सलाईन आणि मल्टीव्हिटॅमिनची इंजेक्शन दिली जात होती आणि अँटीबायोटीक्स.
किवीने नक्कीच परिणाम पडला...पपईच्या पानांच्या रसाने पण..अर्थात तो जामच कडूजार होता.
सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याचे प्रमाण - आपण नेहमी पितो त्याच्या किमान दीडपट ते दुप्पट पाणी डेंग्यु झाल्यावर पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सूप, फळांचा रस, नारळपाणी असे द्रवपदार्थही. बाकी कशाहीपेक्षा यानेच लवकर परिणाम दिसून येतो.
विश्रांती तर खूप आवश्यक आहे. अगदी बेडरेस्टच..मी ते जुमानलं नाही त्यामुळे थेट अॅडमिटच करावा लागला. तिकडे सक्तीची विश्रांती मिळाल्यावर मग बरे वाटले.
डेन्ग्यु झाला असे डॉ. ने
डेन्ग्यु झाला असे डॉ. ने कन्फर्म केलेय तर त्याच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार करा. नेटवरचे वाचुन औषधोपचार करण्याइतका हा आजार साधा नाहीय.<< १००+
डॉ चे उपचार तर चालु आहे ,
डॉ चे उपचार तर चालु आहे , लवकर तरतरीत पणा यावा आणि अंग दुखी कमी व्हावी यासा ठी हवे होते
तरी पण पपई च्या पा नांचा शोध करुन हा उपय करुन बघायला काय हरक्त नही असे मला तरी वाटते
माझ्या मैत्रिणीलाही पपईत्या
माझ्या मैत्रिणीलाही पपईत्या रसाने फायदा झाला.
दुसर्या धाग्यावर लिहीलेलं
दुसर्या धाग्यावर लिहीलेलं डकवतेय
नुकतेच मी आणि नवरा डेंग्यू मधून रिकव्हर झाल्याने नक्की सांगू शकेन. सुदैवाने आम्ही ताप, कणकण अंगावर न काढता पहील्याच दिवशी डॉक्टरकडे गेल्याने आणि आमचा डॉ़क्टर खरंच धीर देणारा असल्याने बरेच गैरसमज दूर झाले.
लक्षणे : सांधेदुखी, अंगदुखी, कणकण, डोकेदुखी, अचानक हाय फिवर, ताप चढ उतार त्यामुळे अंगावर न काढता डॉक्टर कडून तपासणी करून घ्यावी.
डेंग्यू पहील्याच दिवशी रक्ततपासणीमध्ये समजत नाही. त्यामुळे दुसर्या दिवसापासून सतत सीबीसी काऊंट तसेच दुसर्या आणि आठ दिवसांनंतर डेंग्यु अँटीजेन टेस्ट करावी लागते. (ही अवांतर माहीती जी डॉक्टरपरत्वे थोडीफार बदलू शकते)
किवीबद्दल माहीत नव्हते पण पपईच्या पानांच्या रसाबद्दल माहीत होते. डॉक्टरला विचारल्यास, तसा ठोस पुरावा नाही की यांनी प्लेटलेट्स वाढतात पण आयुर्वेदिक उपचार असल्याने हार्म नाही. त्यामुळे इतर औषधांसोबत करण्यास हरकत नाही असे सांगितले गेले.
पपईच्या कोवळ्या पानांचा रोज २-३ टाईम २ चमचे रस (शक्यतो काही खाण्याआधी कारण उलटून पडण्याची शक्यता असते.) तसेच फळे खावीत विशेषतः डाळींब. डॉ ने सांगितले की या आजारात अशक्तपणा खूप येतो. त्यामुळे नियमित औषधे, पोषक आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. पंधरा दिवस अशक्तपणा जाणवतो साधारण. त्यामुळे काळजी घ्यावी. मला सहा-सात दिवस लागले रिकव्हर व्हायला पण नवरा पंधरा दिवस झाले तरी अजून अशक्तपणा फील करतो.
हे ही पाहा. http://www.maayboli.com/node/51353
माझ्या मुलाला २००९ मध्ये
माझ्या मुलाला २००९ मध्ये डेंग्यू झाला होता .डेंग्यू च निदान व्हायला बराच वेळ लागला . एक दिवस ताप आल्याने दुसर्या दिवशी डॉक्टर कडे गेलो. चार दिवस औषध चालू होते पण तरी ताप उतरत नव्हता. त्यांनी दुसर्या डॉक्टर ना रिफर करायला चिट्ठी दिली. दुसर्या डॉक्टर नी ताबडतोब पाठीवरचे चट्टे बघून निदान केले. रिपोर्ट मुळे डेंग्यू चे निदान नक्की झाले . हॉस्पिटल मध्ये ठेवा असे सांगितले .पण पहिल्या डॉक्टर ने वाट बघू असे सांगितल्याने हॉस्पिटल मध्ये जाणे वाचले. दर दोन दिवसांनी रक्ततपासणी करून रिपोर्ट्स आणत होते. प्लेटलेट्स वाढल्या आणि महिनाभराच्या बेड रेस्ट मुळे सुधारणा झाली .
सगळ्यांनी सांगितल्या प्रमाणे पथ्य काहीही नाही. फळांचे जूस /सुप्स देत होते. पण दुसर्या डॉक्टर ने रोज दोन तरी पेस्ट्रीज खायचा आवर्जून सल्ला दिला . नव्हे खाच अस सांगितलं . त्याचा परिणाम झाला .प्लेटलेट्स भराभर वाढल्या .
पेस्ट्रीज>> वॉव! डेग्युंतला
पेस्ट्रीज>> वॉव!
डेग्युंतला सगळ्यात सुखद बाब असेल मग ती
पेस्ट्रीज का?
पेस्ट्रीज का?
पपईच्या पानांच्या रसाने
पपईच्या पानांच्या रसाने प्लेट्लेटस वाढतात असे ऐकले आहे. अपाय काही नाही ह्याने तर करुन बघायला काय हरकत आहे?
अजुन किवी चे फळ आणि खजूरही खातात म्हणे.
धन्स सगल्यांना
धन्स सगल्यांना
या मधे १ शंका प्लेट्लेट कमी
या मधे १ शंका
प्लेट्लेट कमी होऊन मग वाधतात का
आणि आई ला काही खाउ नाही वाटत
आज ३ दिवस होस्पिटल मधे आहे
प्लेटलेटस कमी होणे हे
प्लेटलेटस कमी होणे हे डेन्ग्यूचे महत्वाचे लक्षण आहे. ३०००० ते १५०००० एवढे निरोगी व्यक्तिचे प्लेटलेटस असतात. ३०००० पेक्षा जेव्हा प्लेटलेटस कमी होऊ लागतात तसा मृत्यूचा धोका त्या प्रमाणात वाढतो.
प्लेटलेट्स कमी होण्याचा वेग ह्याबाबतीत निर्णायक ठरतो. प्लेटलेट्स कमी होण्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शरीराने आजाराशी लढणे थाम्बवलेले आहे आणि डेन्ग्युचे विषाणू प्रबळ झालेले आहेत.
जेव्हा प्लेटलेटस वाढू लागतात तेव्हा शरीर पुन्हा प्रतिसाद देऊ लागते आणि आजारातून बरे होण्याचा मार्ग सुकर होतो.
कोणताही आजार हा शेवटी शरीरच बरा करते. त्यासाठी लागणारे साहित्य औषधे व अन्न पुरवतात.
आपल्यापैकी बर्याच जणाना डेन्ग्यु ची लागण होऊन सुद्धा गेलेली असू शकते. फक्त रोग प्रतिकार क्षमता त्यावेळी सुदॄढ असल्याने त्याची लक्षणे दिसण्याइतपत आपल्या शरिरात त्या विषाणूचा संसर्ग झाला नव्हता आणि त्याअगोदरच आपल्या शरिराने त्याचा नायनाट केला असेही होऊ शकते.
चु.भू.द्या.घ्या.
आपल्यापैकी बर्याच जणाना
आपल्यापैकी बर्याच जणाना डेन्ग्यु ची लागण होऊन सुद्धा गेलेली असू शकते. फक्त रोग प्रतिकार क्षमता त्यावेळी सुदॄढ असल्याने त्याची लक्षणे दिसण्याइतपत आपल्या शरिरात त्या विषाणूचा संसर्ग झाला नव्हता आणि त्याअगोदरच आपल्या शरिराने त्याचा नायनाट केला असेही होऊ शकते.>>> ह्या वाक्याशी अगदीच सहमत..
कारण माझ्याच बाबतीत असे झाले होते.. प्लेटलेट काऊंट खूप कमी झाला नाही.. पण दोन दिवस बारीक ताप मात्र होता.. म्हणून चेक केले तर दोन दिवसात थोडा फार काऊंट कमी झाला होता.. पण परत लगेच काऊंट वाढायला सुरुवात झाली..
प्रितीभुषण.. आई हॉस्पिटल मध्ये आहे म्हणजे सलाईन नक्कीच चालू असतील.. आणि त्यातून बहुतेक योग्य ती सप्लिमेंट्स शरीरात जातच असतील.. जमेल तेव्हढे खायला नक्की द्या..
काळजी घ्या..
प्रथम डेंग्यु होउ नये याची
प्रथम डेंग्यु होउ नये याची काळजी घ्यावी http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/health-wealth/dangue/ar... याप्रकारे.अगदी जी फेंग्शुई किंवा कुठलेही शोभेची पाणी साठेल अश्या वस्तु देखील नष्ट कराव्यात.
जर डेंग्यु ची जराही लक्षणे दिसली ,जसे की ताप अशक्तपणा तर लगेच डॉक्टर कडे जावे. जराही वेळ न दवडता.
डेंग्युबद्दलची माहीती इथे आहे.-- http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%...
आणि नक्की काय करावे काय करु नये याची माहीती इथे आहे.-- http://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/91594091f91593...
पपईच्या पानांचा रस हा वर दिलेला उपाय आहेच पांढरया पेशी ( प्लेटलेट्स)वाढवायला .
डेंग्यु तसेच इतरही आजार जसे की गेस्ट्रो ,मलेरीया यांमुळे कमी होणारया पांढरया पेशी वाढण्यासाठी एक उपाय पुढे देत आहे.भाज्यांचे सुप (२फोडी दुधी ,२फोडी बीट ,२ फोडी गाजर ,४ पाने पालक ,चवीपुरते मीठ)हे सर्व आपल्या लागेल तीतके घेउन भाज्या शिजे पर्यंत पाण्यात उकळुन(उकळत्या पाण्यात ५/१० मिनिटेच लागतात शिजायला) मग जरा थंड करुन लगेच मिक्सर वर बारीक करायचे आणि लगेच प्यायला द्यायचे .हे सर्व उपाय डॉ च्या सल्ल्यानंतरच करावे.त्याबरोबरच डॉ सांगतील तो आहार औषधे कटाक्षाने घ्यायची .पुढल्या रिपोर्ट मधे पांढरया पेशी वाढलेल्या दिसतील .
हा उपाय मी केलेला आहे त्यामुळे इथे देत आहे.तरीही कोणतीही गोष्ट डॉ च्या सल्ल्यानेच करावी.
काळजी घ्या.
आणि लागल्याच अधिक पांढरया पेशी तर माझ्या घेउन जा कधीही
प्रितीभुषण.. आई हॉस्पिटल
प्रितीभुषण.. आई हॉस्पिटल मध्ये आहे म्हणजे सलाईन नक्कीच चालू असतील.. आणि त्यातून बहुतेक योग्य ती सप्लिमेंट्स शरीरात जातच असतील.. जमेल तेव्हढे खायला नक्की द्या..
काळजी घ्या.>> धन्स हिम्स्कुल
आज सकाळी प्लेट्लेट्स वाढत आहेत असे डॉ म्ह टले
हो सलाईन चालु आहे
खाण्या बाबत अजुनही पोट भर जेवण जात नाही तरी मी ३ दिवस पालेभाजीच चालु ठेवली आहे
अॅलोपथीमध्ये डेंगीला औषध
अॅलोपथीमध्ये डेंगीला औषध नाही. मात्र होमिओपथीमध्ये आहे.
होमिओपथीचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे कित्येक लोक याचा घरी अभ्यास करून औषध देतात त्यामुळे क्वॉलिटी कंट्रोल राहात नाही. असा डॉक्टर शोधायला हवा ज्याच्याकडे होमिओपथीची डिग्री आहे. जर एम. बी. बी. एस. आहे आणि त्यानंतर होमिओपथीची देखील डिग्री आहे असा मिळाला तर सोन्याहून पिवळं.