भट्कन्ति ला प्रोत्सहन

Submitted by जयदीपभोईटे on 18 November, 2014 - 23:52

चला कवटाळू ह्या संह्य कपारी
भल्या सकाळी वा भर दुपारी
चढा मर्दानो देतात किल्ले आव्हान
उगाच का मग थबकता ओ-पैलवान

साथीला तुम्हा ही गोड गुलाबी थंडी
चढवा मोजे न् मस्त उबदार बंडी
लागुद्यात माथ्यावर ती उरी धाप
घडूद्यात छोटाका हा जरी प्रताप

ढकला तो आडोसा कामाचा बिलंदर
सकला खुणावतो हा धुरंदर पुरंदर
दही पोहे न् खायला गर्म भजी
जपा आठवण ही मर्म निजी

'पुण्य'वानच फक्त असती गिरी छन्दी
इतर सामान्य न पडती ह्या फंदी
नका सोडू ही दैवी संधी
नंतर वयच घालेल तुम्हावर बंदी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users