सध्याच्या काळात गुंतवणूकीला पर्याय नाही. सुरक्षित भविष्यासाठी आपले पैसे वेळीच योग्य ठिकाणी गुंतवायला हवेत याची जाणीव बहुतांश जोडप्यांना आहे. त्या दृष्टीने नवरा-बायको मिळून वा एकेकटे अनेक ठिकाणी उपलब्ध पैसे, गरज आणि पर्यायांनुसार गुंतवणूक करत असतात. प्रश्न असा आहे, की अशा गुंतवणूकीची माहिती, त्यांची कागदपत्र कुठे ठेवली आहेत हे एकमेकांना माहित असतात का?
मध्यंतरी व्हॉट्सॅपवर एक मेसेज फिरत होता- नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि बायको सीए. दोघांचे उत्पन्न भक्कम, गुंतवणूकही पुरेशी. परंतु गुंतवणूकीसंदर्भात सर्व काही माहिती नवर्याने कंपनीच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर केली होती. कसल्याही कागद/ पावत्या/ प्रिन्ट आऊट्स नाहीत. नवर्याचा अकस्मात मृत्यू झाला. लॅपटॉप कंपनीच्या ताब्यात गेला. पत्नीला तर मुळात कंपनीमध्ये या संदर्भात कोणाशी बोलायचे हेही ठाऊक नव्हते. सीए असूनही अशा वेळी काहीही उपयोग झाला नाही वगैरे वगैरे.
हे एक उदाहरण झाले. मूळ मुद्दा असा, की पती-पत्नी म्हणून आपण कुटुंबासाठी, मुलांसाठी, आपल्या भविष्यासाठी जी गुंतवणूक केली आहे तिची माहिती, त्या गुंतवणूकीचे कागदपत्र, ते कुठे ठेवले आहेत, तातडीच्या समयी आधी कोणती गुंतवणूक सोडवायची इत्यादी माहिती आपण एकमेकांना देतो का? सर्व गुंतवणूक ही एकत्रित दोघांच्याही नावे आहे ना? नसेल, तर त्याचे नॉमिनेशन व्यवस्थित केले आहे ना? मृत्यूपत्र केले आहे का? त्यातले तपशील एकमेकांना ठाऊक आहेत ना? ते वकिलाकडे अथवा स्नेह्यांकडे सुरक्षित ठेवले आहे ना?- या प्रश्नांचा उहापोह आपण कधी केला आहे का?
आजकाल ऑनलाईन गुंतवणूक, ऑनलाईन बॅन्किंग आपण सर्रास करतो. हे पासवर्ड एकमेकांना माहित असतात का? ते बदलले तर आपण एकमेकांना कळवतो का? गुंतवणूकीसंदर्भात जर आपला एजन्ट असेल तर त्याची ओळख, त्याचा नंबर, त्याचे ऑफिस कुठे आहे हे दोघांनाही माहित आहे का? कोणे एके काळी एक एक्सेल दोघांनी मिळून केली असेल तर ती वेळोवेळी अपडेट केली आहे का? सर्व तपशीलांचे प्रिन्टआऊट्स/ कागदपत्र/ पावत्या या आवश्यक आहेत. त्या आहेत का? कुठे आहेत हे दोघांनाही ठाऊक आहे का? अजून एक साधे उदाहरण- इन्श्युरन्स पॉलिसी जवळपास प्रत्येकाकडे असतात. आपण त्याचे हप्तेही वेळेवर भरतो. पण पॉलिसी डॉक्युमेन्ट आपण कधी वाचून पाहिले तरी आहे का? किमान ते कुठे आहे हे तरी आपल्याला ठाऊक आहे का?- ही माहिती आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं ना?
सध्या तुम्ही एकटे असाल/ अविवाहित असाल/ कुटुंब नसेल तर तुमच्या गुंतवणूकीसंदर्भात तुम्ही व्यवस्थित नॉमिनेशन केले आहे का? त्याची माहिती संबंधितांना आहे का? यापुढे जेव्हा तुम्ही दुकटे व्हाल/ तुमचे कुटुंब अस्तित्वात येईल तेव्हा तुम्हाला गुंतवणूक करताना तुमच्या जोडीदाराचाही विचार घ्यावा लागेल. तसेच नॉमिनेशनही बदलावे लागेल- याची कल्पना तुम्हाला आहे ना?
खरं म्हणजे या विषयाला. अनेक कंगोरे आहेत. धाग्याचा उद्देश हे विचारण्यासाठी आहे, की आपण पुरेसे जागरूक आहोत का? केवळ गुंतवणूक केली म्हणजे जबाबदारी संपत नाही. त्याची संपूर्ण माहिती एकमेकांना देणे आवश्यक आहे. तशी माहिती नसेल तर ती प्राधान्याने करून घ्यायला हवी.
तुम्ही या बाबतीत काय करता, तुमचे अनुभव, सल्ले इथे शेअर करा. तुमच्या टिप्सही तुम्ही इथे इतरांसाठी दिल्या तर अनेकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
.संपादित
.संपादित
लोकहो हे वाचलेत का? राज्य
लोकहो हे वाचलेत का?
राज्य सरकारची 'महा ई-लॉकर' सुविधा
लिंक पहा
>>माझ्या बाबतीत माझे सर्व
>>माझ्या बाबतीत माझे सर्व पासवर्डस मी माझ्या विलमधे लिहून ठेवले आहेत. >>>पण आजकाल सुरक्षिततेसाठी बदलायला सांगतात ना पासवर्ड्स, मग सारखे विलमधले कसे बदलायचे
हो ना.. पार भज होत डोक्याच.
ह्यावर काही उपाय आहे का ? <<
विलमध्ये पासवर्डस म्हणजे उच्च्कोटीची सुरक्षितता परंतु वर म्हटल्याप्रमाणे पास्वर्ड बदल्ण्याचा वेग विल बदलण्याच्या वेगाच्या १०-२०पट असल्याने हा उपाय प्रॅक्टीकल नाहि...
प्रत्यक्षात एव्हढ करायची आवश्यकता नाहि. टेक्नॉलॉजीचा स्मार्टली उपयोग करुन हि प्रक्रिया सुकर होउ शकते.
तुमच्या सोयीच्या फॉर्मेट (वर्ड, एक्सेल, नोट इ.) मध्ये सगळी महत्वाची माहिती ठेउन ती फाइल पास्वर्ड प्रोटेक्ट करता येते. हा पास्वर्ड फक्त तुमच्या जोडिदाराला देउन फाइल घरच्याच शेअर्ड नेट्वर्क/स्टोरेज मध्ये टाका. भविष्यातले सगळे चेंजेस या शेअर्ड कॉपीत केलेत कि आपोआप अप्डेटेड माहिती एकाच जागी राहिल...
उत्तम धागा! <<केवळ गुंतवणूक
उत्तम धागा!
<<केवळ गुंतवणूक केली म्हणजे जबाबदारी संपत नाही. त्याची संपूर्ण माहिती एकमेकांना(नॉमिनी आणि घरातल्या इतर सद्स्यांना) देणे आवश्यक आहे>> एकदम सहमत .म्हणजे नंतरचा शोधाशोधीचा त्रास वाचतो.
पासवर्ड आणि पासबुक, गुंतवणुकीसंबंधी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी सांभाळुन ठेवणे आणि नीट लावुन ठेवणे.हा उपाय सर्वांत योग्य.याचा उपयोग वृद्ध व्यक्ती आणि मेमरी कमी जास्त होत असलेल्या रुग्ण व विसराळु व्यक्तीलाही होउ शकतो.
जर काही कारणाने अपघाती किंवा अकस्मात मृत्यु आला तर मात्र अगदिच शेवटचा उपाय म्हणुन महत्वाच्या गोष्टींचे पासवर्ड ( जसे की सगळे पासवर्ड,मोबाईल पासवर्ड,लॉकर नंबर)घरच्यांकडे नसतील तर कोणाची तरी प्रोफेशनल मदत घ्यावी.मी जास्त सांगु शकत नाही.पण या गोष्टी माहीत असलेले तज्ञ जास्त चांगली माहीती देवु शकतात.जसे की योग्य व्यक्ती पासवर्ड क्रॅक करुन अथवा Certified Ethical Hacker यांची मदत घेउ शकतात. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.हा उपाय वर सुचवलेल्या <<पण आजकाल सुरक्षिततेसाठी बदलायला सांगतात ना पासवर्ड्स, मग सारखे विलमधले कसे बदलायचे ,ह्यावर काही उपाय आहे का ? >> या प्रश्ना साठीही उपयोगी आहे
अगदिच कुणालाच जवळच्या व्यक्तीला याबाबतीत माहीत नसेल तर होतो.
याबरोबरच इतरही महत्वाचे दस्तावेज जे मर्णोत्तर गोष्टींशी निगडित आहेत जसे की मृत्युपत्र ,नेत्र दान ,अवयवदान या संबधीची कागद्पत्रे जवळच्या,विश्वासु व्यक्ती आणि घरच्यांना माहीत असावी व त्याबाबतीतची महत्वाची माहीतीही. तर त्या व्यक्तीच्या मृत्युनंतरच्या सगळ्या इच्छा पुर्ण व्हायला मदतच होते.
माझ्या मते प्रत्येकाने वेळे आधीच मृत्युपत्र केले तर पुढचे संबंधीतांचे वाद अथवा मालमात्ते संबंधी गोष्टी सोयीस्कर रीत्या पार पडतात.
आता करावे म्हणते. 
मी तरी अजुन केले नाही.
रच्याकने मंजूडी, त्याबद्दल
रच्याकने मंजूडी, त्याबद्दल असंदिग्ध शब्दांतलं लिखाण,>> संदिग्ध पाहिजे ना ? स्मित>> होय होय!
आधी 'असंबद्ध' लिहिलं होत, त्यातला अ खोडायचा राहिला
अरुंधती उत्तम धागा !!!>> पूनम
अरुंधती उत्तम धागा !!!>> पूनम गं पूनम.
>> ओह्ह.. सॉरी गं पूनम.
अवांतरः असे उत्तम आणि मुद्देसुद धागे जास्तकरुन अरुंधती काढत असल्याने मी डोळे झाकुन अरुंधती लिहिलं असावं.
आम्ही एकमेकांना सांगून सगळी
आम्ही एकमेकांना सांगून सगळी कागदपत्रे घरात एका जागी ठेवली आहेत. एका कॉमन मेलड्राफ्टमध्ये ऑनलाईन तपशील ठेवले आहेत. तपशील बदलतील तसे तो मेलड्राफ्ट अपडटेड ठेवतो. सगळे ऑनलाईन पासवर्ड्स एका ठराविक कालावधीनंतर बदलतोच.
सुजा, भारीच. पण मला असं वाटतंय तू इतकं तपशीलवार इथे सार्वजनिक धाग्यावर नको लिहूस. तुझ्या स्वतःच्या सेफ्टीसाठी.
स्वाती, पौर्णिमा, फॅमिली मिटींगची कल्पना भारीच.
एक चांगला विषय.खरचं खबरदारी
एक चांगला विषय.खरचं खबरदारी घ्यायलाच हवी.
पूनम, विषयाच्या नावात एक बदल सुचवू का? बघ पटेल असेल तरः 'आर्थिक/स्थावर दस्तावेजांची घरच्यांना माहिती आणि महत्त्व' किंवा 'आर्थिक/स्थावर दस्तावेजांची प्रियजनांना माहिती आणि महत्त्व' किंवा 'आर्थिक/स्थावर दस्तावेजांची स्वकीयांना माहिती आणि महत्त्व' असे नाव जास्त योग्य वाटते.
महाईलॉकरच्या सुविधेबद्दल
महाईलॉकरच्या सुविधेबद्दल वाचलं. पण म्हणजे अजून एक ऑनलाईन अकाऊंट उघडा, त्याचे पासवर्ड सांभाळा
त्यापेक्षा आपलेआपण सांभाळू शकू.
स्थावर मालमत्ता असेल तर त्याचेही कागद आता ऑनलाईन असतात. पण मालमत्ता जुनी असेल, तर त्यासंबंधी संपूर्ण कागदपत्र आपल्या हातातच हवीत. वेळप्रसंगी ती विकायची वेळ आली, तर कागदांविना अडायला नको.
काहीही गृहित न धरता वेळोवेळी एकमेकांना अपडेट करत राहणं हेच अंतिम सत्य!
बी, सध्या आहे तेच नाव राहूदे.
उत्तम धागा
उत्तम धागा
Awareness महत्वाचा!
Awareness महत्वाचा +१
Awareness महत्वाचा
+१
Pages