मोबाईल कव्हर आणि इतर

Submitted by हर्ट on 17 November, 2014 - 01:58

नमस्कार, माझ्या पुतणीने क्रोशाची सुई आणि लोकर वापरुन काही वस्तू बनवल्यात त्या मी इथे कलाप्रेमींना दाखवत आहे. तिला पेपर क्विल्सपासून वस्तू बनवण्यात सुद्धा खूप छान गती आहे. त्या मी नंतर इथे टाकेन. पेंन्टीग्स पण खूप छान करते. मध्यंतरी पुण्यात एका प्रदर्शनामधे तिने तिच्या वस्तू ठेवल्यात काही युरोपीयन लोकांनी त्या विकत घेतल्यात आणि तिचे भरपुर कौतुक केले. पेपर क्विल्सपासून बनवलेले कानतले जोड तिने १५० रुपयाला एक विकले. युरोपिअन लोकांनी तिला स्पष्ट सांगितले की आमच्याकडे पाहून दुकानदार भाव अव्वाच्या सव्वा लावतात तू अगदी भारतीय दरात आम्हाला हे विकत आहे. असो. धन्यवाद.

photo 2_3.JPGphoto 1_3.JPGphoto 3_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती हे कसे व कुठे शिकली ते पण लिहा की. वाचायला आवडेल.

छान आहे.(तिला हे कळवा)
जरा आणखी वेगळ्या रंगसंगती मध्ये सुद्धा बनवून मस्त वाटेल.

सायली ती 'एम. बी. ए.' च्या शेवटच्या वर्षाला आहे.

झंपी, हे सर्व ती खूप शिकली नाही पण अकोल्याला असताना शेजारीच क्रोशाचे वर्ग असत तिथे बघता बघता बोलता बोलता तीच तिचे शिकली. तिला मुळात कलेची आवड आहे. फावला वेळ मिळाला की काहीनाकाही करतच राहते. मी तिच्या कलेबद्दल इथे लिहिन. बाटिकबद्दल तर नक्कीच!

छान आहे रे बी. कळव तुझ्या भाचीला. नेटवर बरेच नमुने उपलब्ध असतात, इथे मायबोलीवर पण आहेत. तिला मायबोली का जॉईन करायला लावत नाहीस?

देवकी, तिसरा फोटो बहुतेक मफलर किंवा हिवाळी स्कार्फचा असावा. ती त्याला पुर्ण करत होती. आता झाला असेल.

धन्यवाद सर्वांचे.