ऑम्लेट

Submitted by सीमंतिनी on 16 November, 2014 - 10:15

"लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा " हा यक्ष प्रश्न आमच्या फ्रिज मधल्या नऊ अंड्यांना नेहमी पडतो. होत काय की चिपर बाय दि डझन म्हणून मी १२ अंडी घेऊन येते पण माझ्या बेकिंग मध्ये २-३ च वापरली जातात. मग ह्यांना लाईफ मिळणारच असेल तर ह्यातून अँथनी गोन्साल्वीस येऊ दे म्हणून मनातील परवीन रोज फ्रीज समोर गिरकी घेऊन जाते. एक्सपायरी डेट जवळ येते तरी अँथनी कौन है अशीच परिस्थिती राहते. शेवटी विकांताला ब्रंच साठी ऑम्लेट करावे असे ठरते . मी ऑम्लेट करणार हे वाक्य टॉम क्रूझ अॅक्टींग करणार इतकच खर आहे. हॉस्पिटलच्या मेणकापडा सारखं चिवट आणि लाल ऑम्लेट घडू शकत आणि … तव्यावर विशाल आंध्र सारख्या दिसणाऱ्या ऑम्लेटमधून प्लेट मध्ये तेलंगण बाहेर पडू शकत. थोडक्यात एरवी बऱ्यापैकी सैपाक करणारी मी ऑम्लेटपुढे सपशेल शरणागती पत्करते. तेव्हा काही टीप्स ऑर ट्रीक्स द्या. सोबत टोस्ट आणि साईड साठी पण काही सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉस्पिटलच्या मेणकापडा सारखं चिवट आणि लाल
<
त्या(मेणकापडा)ला मॅकिंटॉश म्हणतात. होऽ. तोच तो; अ‍ॅप्पल म्याकिंटॉश वाला. गंदापट्टक Wink

असो. आता घरी जाऊन "नशीबात काय वाढून ठेवलंय?" असा प्रश्न विचारला, तर 'आम्लेट करून घ्या' असं उत्तर येणारे. तेव्हा हा मी निघालो पाकसिद्धी करायला. (पाक-सिद्धी. जंजिर्‍याचा सिद्दी नव्हे. अन पाक=स्वयंपाक. नॉट पाकिस्तान)

लौकरच आम्लेट +/- बैदा राईसचे फोटू टाकतो.

Happy
अंड्यावर सर्च मारून पहा. भर्पूर रेसिपी आणि युक्त्या मिळतील इथंच. अंड्याऐवजी लाजो म्हणून सर्च मारला तरी चालेल Happy ऑम्लेट जमत नसेल किंवा नको असेल तर स्वातीताईची ब्रिटाटा रेस्पी किंवा लालुने पोस्टलेली कॅसरोल उपयोगात आणा.
काही ऐकीव युक्त्या: अंडी नीट फेटणे. फेटल्यावर त्यात थोडे क्रीम घालावे. परत फेटावे. ऑम्लेट सॉफ्ट आणि फ्लफ्फी व्हायला काही लोक्स पीठही अ‍ॅड करतात फेटतांना. चिवट होउ नये म्हणून झाकण ठेवतात काही सेकंद. फक्त कडा सेट झाल्या असतांना आणि तव्यावरचा मधला भाग रनी असतांनाच उलटवावे, यानेही ऑम्लेट चिवट होत नाही.

एक करून पाहा - तयार पराठा/पोळी घ्यायची. तव्यावर आधी थोडं तेल गरम करून घ्यायचं. त्यावर डायरेक्ट अंड फोडून घालायचं. जरा होत आलं की त्यावरच हवं असेल ते सिझनिंग घालायचं (मीठ, तिखट्/काळीमीरी पूड. कांदा/टो/को/हिमी/ लाड करायचे असतील तर बेल पेपर्स/ एक्झॉटिक अर्ब्स इ.इ.) तव्यावरच हे सगळं होउ द्यायचं. त्यावरच मग पराठा/ पोळी ठेवायची अन/सगळं उलटायचं. पोळी छान गरम झाली की लगेच काढायचं अन गट्ट्म करायचं. स्वजबाबदारीवर बटर/ तेल घालता येईल अजून!

ऑम्लेट करतेवेळेस एका अंड्याला एक ते दोन चहाचा चमचा दूध/पाणी घालून मग फेटायचं.

कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर ,मीठ एकत्र करून त्यात अंडे फोडावे.ऑम्लेट हलके होण्यासाठी त्यात अर्धा चमचा (छोटा) पाणी घालावे.तवा चांगला तापला की थोडेसे तूप टाकून तवाभर पसरावे.त्यावर वरील मिश्रण घाला.गॅस मध्यम राहू द्यावा.मिश्रण दाट झाले की परता.

तवा मध्यभागी किंचित खोलगट हवा. ऑम्लेटचे मिश्रण घातले की ते एका जागी गोलाकार राहायला हवे तर ते चांगले होते. तसा नसेल तर तव्याचे हँडल धरुन ऑम्लेट सेट होईपर्यंत मिश्रण पसरणार नाही हे पाहावे.
तसेच तवा बर्‍यापैकी तापलेला हवा - म्हणजे घातल्याघातल्या जळण्याएवढा नाही पण मिश्रण ओतले की लगेच छान फुलून आले पाहिजे म्हणजे एकदम फ्लफी होते ऑम्लेट.

अंडे फेटताना दूध घातले तर ते जास्त फ्लफी होत जाते. केक बनवताना 'रायझिंग एजंट' म्हणून असे अंडे फेटून वापरायची पद्धत आहे.

ऑम्लेट करताना अंडे फेटले, म्हणजे कादा, कोथिंबीर तिखट मीठ घालून चमच्याने भर्पूर हलवले तर ते फ्लफी अन पसरट होते. याउलट जास्त फेटले नाही तर आम्लेट छोटं होईल, पण चव वेगळी येते.

फेटल्याने अंड्यातल्या प्रोटीन्सच्या स्ट्रक्चरमधे फरक पडतो, त्याने चवीत अन टेक्स्चरमधेही.

*

बैदा राईस = अंड्याच्या भुर्जीत फोडणीस घातलेला भात. किंवा फोडणीच्या भातात परतताना फोडून घातलेले अंडे. खालच्या फोटूत गायब असलेला आम्लेटचा भाग बैदा राईसमधे इन्क्लूडेड आहे Wink

कोथिंबीर, मिरची, उक्कूसं आलं, एक पाकळी लसूण, मीठ अन जिरं वाटीतच कुटून त्यात अंडे फोडून घालावे. थोडा बारिक चिरलेला कांदा घालून माफक प्रमाणात हलवावे. तव्याला तेलाचा हात लावून मग गॅसवर ठेवावा. गरम तव्यावर थोडा कांदा परतायला टाकून वरून अंड्याचे हे मिश्रण घालून पसरावे. ही झाली आत्ता केलेल्या आम्लेटची कृती.

हे आम्लेट ताटात काढून त्याच तव्यावर आधी कांदा परतावा. त्यात सकाळच्या उरलेल्या भातात तिखट मीठ मिक्स करून कुस्करून परतायला घ्यावा. तब्येतीनुसार त्यात अधिक तेल्/तूप्/लोणी टाकावे. चवीनुसार मघाच्या आम्लेटचे पार्ट त्यात टाकून चायनीज गाडीवाल्याच्या स्टाईलने चमचे आपटत मिक्स करावेत.

खूऽप भूक लागलेली असली तरीही, चव हवी असेल, तर "मंद आचेवर" हे शब्द कोणत्याही स्वयंपाकात अत्यंत महत्वाचे असतात हे ध्यानी ठेवावे.

omlette.jpg

या! जेवणं करणं गच्छामी.

ईब्लिस कसला खत्री फोटो टाकलायत.. पोटाला तडका दिलात..

नशीब घरी मटण आहे आज, नाहीतर तुम्हाला मनातल्या मनात माझ्या पोटातल्या कावळ्यांची हाय लागली असती..

अंडे फेटताना दूध घातले तर ते जास्त फ्लफी होत जाते.
>>>>
फ्लफी या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही, पण अंडे+दूध वरून एक आवडीचा प्रकार आठवला..

दूध+अंडे+मसाला (+बहुतेक मीठही असेलच, आईच जाणे)
असे एकत्र फेटून घ्यायचे, आणि पावाच्या कडा काढलेल्या स्लाईसचे दोन-किंवा चार तुकडे करून त्यात डुबूक डुबूक करून मस्त तव्यावर तळायच्या.. आणि गरमागरम सॉस बरोबर खायच्या..
आई तळत जाते मी खात जातो.. कधी थांबायचे ते समजत नाही..

एकेकाळी ऑम्लेट प्रचंड आवडायचं. एस्पेशली कॉलेज कॅन्टिनमधलं. भारतातल्या अंड्यांची चवही थोडी वेगळीच असते असं वाटतं. हल्ली अंडंच विशेष आवडत नाही. (हे बॉईल्ड एग खातानाच लिहिते आहे)

त्येच्यायला , उद्याच्या प्याथॉलॉजीकल टेस्ट्स करायच्यात म्हणून रात्री जेवणाला दांडी मारली , तर इब्लुशा हे दाखिवतोय होय?

तुझे तळकट ऑम्लेट होवो !! ::फिदी:

रुणझुण पाखरा, आमच्या भरवशाच्या मासेवाल्याला पापलेट ऐवजी टोणगा झाला आज, म्हणून अंड्यावर निभावलं. नैतर तंदूरी पापलेटचा बेत होता.. 123.gif

राहू, तुम्ही श्या घातल्यात तरी त्या प्रेमाचा हायेत हे समज्तंय हो. जितकी जास्त कडक शिवी तितका जास्त चांगला दोस्त, अशी होस्टेलची डेफिनिशन होती. तेव्हा एडिट वॉज नॉट इण्डिकेटेड, पण नवं एडीट जास्त खंग्री आहे Wink

माझे लहानपणापासून ब्रेड ऑम्लेट कम्फर्ट फुड आहे.
मी कांदा, मिरची, कोथिंबीर (सगळं भरपूर) बारीक चिरून घेते. मग त्यात अंडी फेटून मीठ व सगळ्यात शेवटी पाव चमचा दूध घालून तेलाचा हात लावलेल्या गरम तव्यावर भाजून घेते. फार भूक लागली असेल तर तव्यावर टाकल्यावर वरून चीज टाकते. दोन्ही बाजू भाजून ऑम्लेटचे ४ तुकडे करून (आवडते टोमॅटो केचप लाऊन) दोन ब्रेडच्या स्लाईसमध्ये टाकून गट्टम. Happy

खरंच काहीही लागत नाही विशेष. मला बेसिक मीठ मिरची इतपतच स्पायसेस लागतात. पण व्हेरिएशन हवे असेल तर पावभाजी मसाल्यापासून बाल्झामिक व्हिनेगर पर्यंत काहीही टाकता येते. व चांगले लागते. भाज्या पण अ‍ॅड करता येतात. मी नेहेमी करत नाही परंतू हा एक फोटो सापडला ज्यात रंगीत कॅप्सिकम्स टाकल्या आहेत. Happy

135378_10150115181432018_5039188_o.jpg

ऋन्मेऽऽष , तुम्ही सांगितलेल्या कृतीप्रमाणे माझ्या शाळेतिल एक वर्गमैत्रीण डब्यात आणायची . चविष्ट लागते ते प्रकरण .

ऋन्मेष तुम्ही म्हणताय ते फ्रेंच टोस्ट. मस्त लागतात! Happy क्लासिक फ्रेंच टोस्ट गोड असतात. तेही मस्त. Happy

'ते' प्रकरण म्हणजे तिखटाचे फ्रेंच टोस्ट.

भूक लागलेली असताना फोटू काढला यात समाधान मानावे. प्रेझेंटेशनच्या नानाची टांग 10.gif

बस्के फोटो कलरफुल असल्यामुळे मस्त दिसतो आहे.
मलाही कांदा मिरची कोथिंबीर भरपुर असलेल ऑम्लेट खुप आवडत. इब्लिस च्या फोटो सारख (थोड अजुन हिरव). ब्रेड पेक्श्या मला आदल्या रात्रीची उरलेली पोळी त्याच तव्यावर थोड तेल लाउन खरपुस गरम करुन घेतलेली आवडते. भुक लागली. व्हाईट च खाल्यामुले १२ अंडी पट्कन संपतात.

सीमंतिनी,
एवढ्यात थँक्स नका बोलू कोणाला, अजून या धाग्यावर बरेच यायचे आहे, अर्थात अंड्याचे प्रकार.. मी सुद्धा लक्ष ठेऊन आहे.. मला आवडणार्‍यापैकी आणि वेळप्रसंगी स्वतालाही जमू शकणार्‍या पाकृंच्या कच्च्या पदार्थांमध्ये अंड्याचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

बस्के,
ते लाल लाल तुकडे पण सिमला मिर्ची आहे का? कारण ते टॉमेटो प्रकरण माझ्या डोक्यात जाते, आंबूस गोडूस चव होऊन जाते ऑमलेटची..
सिमला मिरचीची आयडीया भारी आहे बाकी, मला आवडते ती. ट्राय करायला हवे.

एकेकाळी ऑम्लेट प्रचंड आवडायचं. एस्पेशली कॉलेज कॅन्टिनमधलं. भारतातल्या अंड्यांची चवही थोडी वेगळीच असते असं वाटतं. हल्ली अंडंच विशेष आवडत नाही. (हे बॉईल्ड एग खातानाच लिहिते आहे).

+१००००

कॉलेजमध्ये खाल्लेल्या टेस्टी ऑम्लेट सँडविचची चव आजही आठवते आहे. इथे फार आवडीने ऑम्लेट खाल्लं जात नाही.

ऑम्लेट हे माझं सुद्धा कंफर्ट फूड आहे. वर्षानुवर्षे वर लिहिलेल्या पद्धतीनेच ऑम्लेट करत आलेय पण मध्यंतरी टर्कीत एक वेगळी पद्धत बघितली जी सध्याची फेव्हरीट आहे. कांदा, सिमला मिरची , हिरवी मिरची बारीक चिरुन घ्यायची. तव्यावर/ पॅनमध्ये तेल घालून , गॅस मोठा करून हे सर्व १-२ मिनिटं परतायचं. मग त्यावर फेटलेलं अंडं घालायचं आणि शिजू द्यायचं. मस्त खमंग ऑम्लेट तयार होतं :).
खास टीप - भाज्या तव्यावर आधीच असल्याने ऑम्लेट तव्याला न चिकटता काढणं स्कील आहे :).

दोन अंडी+(कांदा, दोन ही मी, बेबी स्पिनेच १०_१२ पाने) बारीक चिरून + चवीपुरते मीठ. सगळे मस्त फेटुन तव्यावर तुप घालून त्यावर ऑमलेट घातले. वरुन चीज़ चे तुकडे पेरले. दोन्ही बाजुनी खमंग होऊ दिले. ब्रेड गरम करून त्यासोबत हे जबरदस्त ऑमलेट आत्ताच चापले. वरुन वअफळती कॉफी. सुख सुख म्हणतात ते हेच असा विचार करत माबोवर आले तर इथे लगेच शेयर करायला ही
मिळाले! छोट्या गोष्टीतला मोठा आनंद! Happy
सिमंतीनी, एकदा वरील रेसिपीज ने अगदी मन लावून ऑमलेट करून बघ १२ च्या १२ अंडी एजक एक करत तव्यावरच जातील बघ!

हॉस्पिटलच्या मेणकापडा सारखं चिवट आणि लाल ऑम्लेट घडू शकत आणि … तव्यावर विशाल आंध्र सारख्या दिसणाऱ्या ऑम्लेटमधून प्लेट मध्ये तेलंगण बाहेर पडू शकत.>>
ऑम्लेट चिवट होतं अशी तक्रार आहे का?
तवा गरजेपेक्षा जास्त तापलेला असतो का? ऑम्लेट घातल्यावर आच खूप मोठी असते का? या कारणांचा शोध घ्या.

ऑम्लेटचा आकार बिघडतो अशी तक्रार असेल तर ऑम्लेटसाठी वेगळा छोटा तवा घ्या, ज्याचा आकार ऑम्लेटला येईल. माझ्याकडे सध्या ब्रेडच्या स्लाईसएवढा चौकोनी आकाराचा नॉनस्टिक तवा आहे. त्यातलं ऑम्लेट ब्रेड स्लाईसमधे परफेक्टली बसतं.

ऑम्लेट खुप भाजलं, खुप कमी आचेवर असलं तरी चिवट होतं.. २-३ मिन खुप व्हावेत ऑम्लेट नीट भाजायला.. वाटल्यास घरी जाउन घड्याळ लाउन नीट वेळ सांगता येइल..

मी ऑम्लेटसाठी नॉनस्टिक गोल तवा वापरतो. तो खोलगट नसून प्लेन असतो. व मिश्रण टाकल्यावर तवा वाकडातिक्डा करून कडेपर्यन्त पांगवून घेतो. त्याने एकदम परफेक्ट गोल ऑम्लेट मिळतेब्व जाडी युनिफॉर्म राहते.

माझ्या लेकाला आवडणारा प्रकार. थोडाफार मुघलई पराठ्यासारखा. पण जर्रासे स्कील आणि थोड वेळखाउ काम आहे!

कणकेचा एक गोळा घेउन, घडीची पोळी करतो तशी करायची. त्यासाठी आधी कणकेचा गोळा तसाच लाटुन मोठा गोल करायचा...आता तेल चान्गल पसरवुन, त्यावर थोडे कोरडे पीठ भुरभुरवुन मग कडा त्रिकोणी चिटकावयच्या.. त्या अशा रितीने...की त्रिकोणातल्या एका बाजुला अगदी एकावर एक न येता थोडे सरकवुन. आणी मग अगदी हळुवार लाटणे फिरवत पोळी गोल करायची. तव्यावर टाकली की एका बाजुने शेकुन, ती बाजु उलटवली की हळुवर उलथण्याने/ चाकुने (जिथे कडा एकावर एक नव्हती तिथे) थोडीशी उलगडायची. त्यात आमलेटसाठी बनवलेल मिश्रण (मी तर फक्त अन्डे फेटुन त्यात तिखट आणी मीठ घालते) ओतायच. परत वरची कडा जराशी उलथण्यानेच दाबुन ठेवायची. पोळीच्या कडेकडेने तेल सोडायच... मन्द आचेवर पोळीमधल आमलेट घट्ट होईल इतपत शेकायची. पोळी दुसर्या बाजुने उलटवुन तेल सोडुन पुन्हा थोडी शेकायची. आणि गरमागरम ताटात वाढायची.
आमलेट पोळीमधेच राहिल्याने त्याचा वास आतल्याआत रहातो.आणि अधिकच रुची वाढवतो.

रच्याकने, मी मोठ्या आकाराच्या तव्याबद्दल लिहिलंय. जिथे एक-दोन अंड्यांचं आम्लेट पूर्ण तव्याचा आकार घेणं शक्य नसतं तिथे आम्लेट वेडवाकडं पसरु न देणं महत्त्वाचं.

ऑम्लेट चिवट म्हणजे कसं होतं?( खरच माहिती नाही). ज्यास्त शिजवत असाल. दुसरे काही नाही.

एक खोलगट लोखंडी तवा घेवा. त्याला चांगला तापवून घेवून तेल सढळ हाताने घालून भरपूर फेटलेले व इतर काय काय जिन्नस एकत्रच घातलेले अंड्याचे मिक्स ओतावे.
सरर्र.. असा आवाज आला पाहिजे. मग आच कमी करा व झाकण ठेवून २ मिनिटं एका बाजूला तर २ मिनिटं दुसर्‍या बाजूला.

मस्त देशी पोळी होते. कांदा, हिरवी मिरची भरपूरच जरा, कोथिंबीर जरा ज्यास्तच,बीया काढलेले बारीक चिरलेले टोमॅटो. आणि भाजलेला ब्रेड. आवडता नाश्ता आहे आपला. कधीच फेल नाहि झालीय हि रेसीपी. घरात काहीच नसेल तर हा फेव प्रकार. टोमॅटो केचअप घालून नाहितर हिरवी चटणी, जी असेल ती. रोज खावो अंडा यही अपना फंडा.(असे उगाच लहानपणी म्हणायचो खाताना)

बाहेर बेसन घालतात थोडेसे बैदा पाव मिळतो ना काही ठिकाणी.

हायला, या आर्याने माझी रेसेपी पळवली.:फिदी::दिवा:

सिमन्तिनी, ऑम्लेटमध्ये बारीक चिरलेला मश्रुम, हि. मिर्ची टाकुन मस्त ऑम्लेट बनते.

डॉ. मालती कारवारकरान्चे दोन-तीन प्रकार लिहीतेय, मी ट्राय केलेले नाहीये, पण ओळखीतल्यानी केलेत. ओके वाटलेत.

इटालीयनः- २ अन्डी,१ मो. चमचा पाणी, ब्रेड क्रम्ब्ज, १ मो. चमचा किसलेले चीज, २ मो. चमचे शिजवुन सुकवलेला खीमा, मीठ, मिरीपुड.

अन्डी फोडुन त्यात पाणी घालुन चान्गले फेटावे. बाकी जिन्नस घालावे. पॅनवर तेल पसरवुन ऑम्लेट टाकावे. दोन्ही बाजू मन्द आन्चेवर शिजवाव्यात. मग वर चीज घालावे.

जपानी पद्धत : दोन छोटे चमचे तेल, २ अन्डी, शिजवुन सुके केलेले खीमा किन्वा सॉसेजेस, १ कान्दा, १ टीस्पुन सोया सॉस, मीरपुड, मीठ, अर्धा तीस्पुन तिखट पावडर.

एका पसरट पॅनमध्ये तेल तापवुन त्यावर कान्दा परतुन मग खीमा वा सॉसेजेस चे तुकडे टाकुन मन्द आन्चेवर शिजवावे. वरुन मग सोया सॉस, मीरपुड, तिखट, मीठ घालुन मिश्रण जरा पसरुन सारखे करावे. त्यावर अन्डी फोडुन घालावी, पिवळा बलक मोडु देऊ नये. झाकण ठेऊन अन्डी शिजवावीत.

सर्वच सुरेख! (घरटे - खीमा वा सॉसेजेस प्रकाराशी सख्य नसल्याने करुन नाही बघणार, पण मस्तच!)

ऑम्लेटवर पुस्तक निघेल इतकी विविधता!! माबो रॉक्स.

घोसला...
>>>
यम्म यम्म यम्म.. अगदी असाच दिसणारा नाही, पण असाच एक प्रकार ऑफिसमधील एक मैत्रीण आणते. त्यातही ती असेच कांदा वगैरेच्या थरावर अंडे सोडून त्याचा केक शेप करते. खालून मस्त फ्राय मसालेदार कांद्याचा बेस आणि वरून अंडे.. भारी लागते. माझ्या विशेष आवडीचे म्हणून जास्त आणते.

मी ऑम्लेट एका छोट्या कास्ट आयर्नच्या गोल आकाराच्या खोलगट तव्यात करते.
बाकी पद्धत वरच्या अनेकांसारखीच. कांदा, हि मिरची,कोथींबीर आणि चमचाभर दूध आणि भरपूर फेटणे.

चंद्रूभौ कस्काय नै आले अजून या धाग्यावर?
आम्लेटात दूध?? बाप्रे! तेही तिखटमिठासोबत?? विरुद्धान्न! विरुद्धान्न!! Wink

अंडे मिक्सर मधुन काही सेकंद फिरवले की मस्त फ्लफी होत.

आम्लेटात दूध?? बाप्रे! तेही तिखटमिठासोबत?? विरुद्धान्न! विरुद्धान्न!! << चमचा भर चालेल ना? की नाही?

इब्लिस, सीमंतिनी, ऋन्मेऽऽष, धन्यवाद!

>>(घरटे - खीमा वा सॉसेजेस प्रकाराशी सख्य नसल्याने करुन नाही बघणार, पण मस्तच!)
यात खीमा किंवा सॉसेजेस नाहीत. फक्त कांदा, हिरवी मिर्ची, सिमला मिर्ची, मश्रूम्स आणि कोथिंबीर आहे. या सगळ्या भाज्या खमंग परतून घेऊन त्यात तिखट, मीठ किंवा इटालियन स्पाइस ब्लेंड घालून त्याचं खळगं करून त्यात अंड फोडून घालायचं. त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजवायचं. बलक नको असेल तर तो ऑम्लेट सेट झाल्यावर काढून टाकता येतो. नुस्त्या एगव्हाइटचंही करता येईल.

Pages