डीश वॉशर कुठला घ्यावा?

Submitted by गोगो on 16 November, 2014 - 10:08

मला बंगळूरूमध्ये डिश् वॉशर घ्यायचं आहे. तरी कुठलं चांगलं आहे? आय एफ बी चे बरेच आहेत मार्केट्मध्ये पण त्यांच्याबद्दल नेटवर रीविव्ज चांगले नाहित. तसेच त्यान्च्या आफ्टर सेल्स सर्विसेसबद्दलही तक्रारी आहेत असं नेटवर वाचण्यात आलं. बॉशचं युरोपात वापरलं आहे पण भारतात वापरायला कसं आहे? आफ्टर सेलस वैगरे? अजुन कुठलं डीवॉ सुचवु शकाल?
भारतात डीवॉ चा कसा अनुभव आहे? घेतल्यावर महिन्याचा खर्च साधारणपणे किती येतो? वीज बिलात किती फरक पडतो? ईत्यादि माहिती हवी आहे. आणखीही काही माहिती असल्यास धावेलच.
आगाऊ धन्यवाद मण्डळी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोगो,
तुझ्या जीवाचा परेश रावल झालाय.
डिश वॉश्र है?
़कौनसी कम्पनी का है?
नही है तो क्यु नही है?
टी वी हैन? मावे हैन? फ्रीज है
डोक्यावर प्रश्नचिन्ह असलेली तु उभी रहिली डोळ्यासमोर :दिवा;