मायबोली टीशर्ट २०१४- देणगी

Submitted by टीशर्ट_समिती on 14 November, 2014 - 12:02

दर वर्षी मायबोली टीशर्ट आणि बॅग यांच्या विक्रीमधून जमा झालेली रक्कम आपण एखाद्या सामाजिक काम करणार्‍या संस्थेला देतो. या वर्षी, आधीच घोषणा केल्याप्रमाणे 'ग्रीन अंब्रेला' या संस्थेला देणगी द्यायचे ठरले होते. २७ जुलै, २०१४ला वर्षाविहार पार पडल्यानंतर आपले वविसंयोजक नीलवेद,घारूअण्णा,विवेक देसाई, मयूरेश आणि मायबोलीकर जिप्सी २४ ऑगस्ट, २०१४ला 'ग्रीन अंब्रेला' संस्थेत गेले आणि त्यांनी ग्रीन अंब्रेलाचे सर्वेसर्वा श्री. विक्रम यंदे यांच्याकडे रु. २९,७५०/- या रक्कमेचा चेक देणगी म्हणून सुपूर्त केला. या प्रसंगी काढलेली काही छायाचित्र:

Green Umbrella receipt_0.jpggreen umbrella cheque.JPGGreen Umbrella3.jpgGreen Umbrella1.jpgGreen Umbrella2.jpg

(ऑगस्ट महिन्यात देणगी दिल्यावर ही माहिती नोव्हेंबर महिन्यात पोस्ट करत आहोत याबद्दल मनापासून दिलगीर आहोत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users