स.न. वि. वि. ,
आपला नवीन चित्रपट पाहिला. आपला इन्सेप्शन हा जहबहरीही सिनेमा आमच्या टॉप टू मध्ये आहे तसेच अंतराळ प्रवास हा ऑल्टाइम फेवरिट विषय असल्याने चित्रपट बघायची फार उत्सुकता मनी होती. आय म्याक्स मध्ये बघू शकलो नाही पण त्याने काही बिघडत नाही अशीच भावना शेवटी झाली. ( केथ्रीजी नावाच्या इंटरजनरेशनल हिंदी चित्रपटात काजोलनामे सुंदरी " ले!!? " असे म्हणते त्या प्रकारचे काही वाटले. ). इंटरस्टेलर अर्थात तार्यांच्या पलिकडे बघून काही प्रश्न मनात उद्भवले आहेत त्यांची कृपया उत्तरे द्यावीत. आमचे दिग्गज दिग्दर्शक चित्रपटाची प्रमोशनस संपली व १०० कोटी ब्यांकेत जमा झाले कि युरोपात किंवा मकावला सुट्टीला जातात. तुमच्यात काय करतात? परत आल्यावर पत्रास उत्तर द्यावे.
१) उत्तर अमेरिका सोडून इतर सर्व खंडात देखील अनेक प्रकाराने शेती केली जाते. प्रयोग शील शेतकरी सर्व जागी आहेत. त्यां चे काम अभ्या सावे असे वाटले नाही का? किमान पक्षी ताजमहालच्या मागच्या बाजूला तांदुळाची शेती करणारा भारतीय शेतकरी, जयपूरला पॅलेस हॉटेलच्या मागे असलेल्या मोन्सांटोच्या दुकानातून बियाणे घेणारी व पेरणी साठी अधीर झालेली राजस्थानी फ्यामिली आपल्यास दिसली नाही काय? चीन, सुदान ऑस्ट्रेलिया येथील शेतकर्यांचा अनुल्लेख का केला?
२) जैववैविध्याचा अनुल्लेख काय म्हणून केला? चित्रपटात एकही प्राणी नाही. झाडे पण नाहीत. फुलपाखरे , सुरवंट, किडे हत्ती व इतर सर्व प्राण्यांचे काय झाले ? जंगले पण नामशेष झाली आहेत का? ह्याचा काही उल्लेख नाही. परग्रहावर वसती करतानाही फक्त सिलेक्टिव ब्रँडेड एम्ब्रियोजच का नेले? पण मग शेव्टी हिरवे ग्रास कोठून आणले?
३) अॅन हॅथवे कोणत्याही बाजूने किंवा डायमेन्शन मध्ये शास्त्रज्ञ वाटत नाही. गोड हसले की झाले हे आम्हा जुन्या पठ्डीतल्या फेमिनिस्टास पटले नाही. काही झाले तरी सुपरनानी सदृश्य हिरॉइनला वयस्क होउच द्यायचे नाही ही प्लॉट ची आवश्यकता आपल्याला का वाटावी? त्यात ती प्रेम अमर असते ग्रहांच्या पलीकडे असते वगैरे फेकते ते तर आम्हाला बॉलीवूड मध्ये राहून राहून आधीच पाठ आहे. कुच नया डायलॉग दे देते?
४) जग संपत चालले असताना नासा मधील शास्त्रज्ञ फुल नीट प्रेस केलेला थ्री पीस सूट व टाय कसे घालतात?
५) मायकेल केनची आधि इन्सेप्शन व मग ह्या चित्रपटात वाइज ओल्ड म्यानची क्लिशेड व्यक्तिरेखा बघून वैताग झाला. त्याला पुढील चित्रपटात घेउ नका. सॅम्युअल जॉनसन किंवा इतर तत्सम लोक्स आहेत ना. यानातील दोन डिस्पोजेबल लोक एक दाढीवाला व दुसरा हे मरणार हे आधीच कळते कारण अमेरिकेतील कॉलेज सुंद्र्या व दांडगट मुले तळ्याकाठी सोज्वळ पिक निक करायला जातात व मॉनस्टर च्या अलगद हातात सापडतात अश्या अनंत चित्रपटात हीच ट्रिक वापरलेली असते नाही का? फिर तुम ठहरे इत्ते बडे डायरेक्टर!?
६) चित्रपटातील साडेसातीचा प्रवास अगदी दोन मिनिटात उरकला आहे. तो अधिक स्पेक्टॅक्युलर करता आला असता ना? आउटर स्पेस म्हणजे किती पोटेन्शैअल लोकेशन आहे? तुम्हाला मंगळ आहे का? गुरू मंगळ , मधील क्लाउड, अॅस्टरोईड वगिअरे दाखविलेच नाही त्यामुळे अंमळ निराशा झाली. झथुरा, फिफ्थ एलिमेंट व तत्सम सिनेमात आउटर स्पेस छान दिसते तसेच हिस्टरी ऑफ द युनिवर्स, कॉसमॉस आदि सीरीअल्स बघितल्या नाहीत का?
७) चित्रपटातील इमोशनल अँगल( हा असावाच लागतो!!!!) अगदी पिक्चर बाय नंबर्स प्रमाणे आहे. फारच सामान्य. गोड मुलगी, कायमची ताटातूट इत्यादी मसाला लारा क्रॉफ्ट सिनेमात जास्त चांगला वठला आहे. डॉक्टर हूच्या कथानकांत जास्त बिलीव्हेबल व इनोव्हेटिव कनेक्ट असते. असे का केले?
८) हिरो प्रत्येक वाक्यास एकेक प्रकाश वर्ष एव्ढा वेळ का घेतो? लिओची अनुपस्थिती जाणवली. अगदी
भावनाशून्य चेहरा आहे. त्यापरीस टार्स व केस मस्त आहेत. पन नथिंग टू बीट आर्टू डीटू. व सी थ्रीपीओ.
९) संगीत दिग्दर्शक परग्रहावरून आला आहे का? संगीत फारच आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. मस्त. क्लायमॅक्स पण.
१०) शेवटच्या दृश्यात अमेरिकन झेंडा बघून फारच निराशा झाली. वर्ल्ड फ्लॅग असायला हवा होता असे नाही का वाटले आपल्याला? गॅलेक्सीच्या बाहेर जाउनही मानसिकता बदलत नाही ह्याची प्रचिती आली. असो.
११) डॉ. मानचे पूर्ण प्रकरण उगीचच आले आहे. वेळ घालवायला त्यात अंतराळी ढिशुम ढिशूम? अगदी फराळी मिसळ झाली आहे.
१२) काटे साहेबांचे नक्की काँट्रिब्युशन काय आहे हो?
घरी येउन उतारा म्हणून मेन इन ब्लॅक बघितला. आपल्याला उत्तेजनार्थ शिरीश कुंदर दिग्दर्शित जोकरची सीडी पाठवत आहे. पोच द्या. आपल्या पुढील चित्रपटाच्या प्रतीक्षेत.
आपली विनम्र
ताराबाई शनीचले.
(No subject)
सही!
झक्कास लिहीलय. घोर निराशा
झक्कास लिहीलय. घोर निराशा झाली पिक्चर पाहून.
मजेदार लिहीले आहेत अमा.
मजेदार लिहीले आहेत अमा. चित्रपत पाहिल्यावरच खरे संदर्भ लागतील पण सध्या नुसती वाक्ये सुद्धा वाचायला मजा आली
१०) शेवटच्या दृश्यात अमेरिकन
१०) शेवटच्या दृश्यात अमेरिकन झेंडा बघून फारच निराशा झाली. वर्ल्ड फ्लॅग असायला हवा होता असे नाही का वाटले आपल्याला? गॅलेक्सीच्या बाहेर जाउनही मानसिकता बदलत नाही ह्याची प्रचिती आली. असो.
>>>>>>>
हे असे असेल तर काही गरज नाही चित्रपट बघायला जायची.. माझे कॅनसल !!!!
चित्रपटाबद्दल काहीही माहित
चित्रपटाबद्दल काहीही माहित नाहीये...तरी हे वाचायला मजा आली.
हे सगळे लक्षात ठेवूनच बघणार
हे सगळे लक्षात ठेवूनच बघणार चित्रपट. मस्त लिहिलेय.
रिट्रो थ्रस्टर्स!!!
रिट्रो थ्रस्टर्स!!!
धमाल परिक्षण अमा! चित्रपट
धमाल परिक्षण अमा!
चित्रपट पाहिला नाहीये पण फार अपेक्षा ठेवून पाहण्यात अर्थ नाही हे कळलं.
<<अॅन हॅथवे कोणत्याही बाजूने किंवा डायमेन्शन मध्ये शास्त्रज्ञ वाटत नाही. गोड हसले की झाले हे आम्हा जुन्या पठ्डीतल्या फेमिनिस्टास पटले नाही. >>
+१
ती हॅथवे म्हणजे दिया मिर्झाची जुळी बहीण वाटते. आणि खरंच, ती या चित्रपटात आहे आणि ते पण सायंटिस्ट आहे हे ऐकून मलाही गंमत वाटली होती. Sandra Bullock किंवा तत्सम कोणी जरा जास्त convincing वाटू शकतात.
ती हॅथवे म्हणजे दिया मिर्झाची
ती हॅथवे म्हणजे दिया मिर्झाची जुळी बहीण वाटते +११११
शास्त्रज्ञ म्हणजे भोंगळट,
शास्त्रज्ञ म्हणजे भोंगळट, स्वतःचे शारिरीक सौंदर्य न जपणारी व्यक्ती तुम्हाला अपेक्षित आहे का? चित्रपटात हॅथवेचे कॅरॅक्टर बायोलॉजिस्ट असल्याचे दाखवले आहे. ते दाखवण्यासाठी तिने काय बेडूक कापून दाखवले पाहिजे का?
(No subject)
क्ष चा प्रश्न व्हॅलिड आहे.
क्ष चा प्रश्न व्हॅलिड आहे. मला अॅन हॅथवे आवडते म्हणून तो जास्तच व्हॅलिड वाटला. हॉलीवूड मधे अत्यंत रेअर असणारा हसरा चेहरा, pleasing personality वगैरे
चित्रपटाबद्दल काहीही माहीत
चित्रपटाबद्दल काहीही माहीत नाही. तरी हे वाचायला मजा आली.
शास्त्रज्ञ म्हणजे भोंगळट,
शास्त्रज्ञ म्हणजे भोंगळट, स्वतःचे शारिरीक सौंदर्य न जपणारी व्यक्ती तुम्हाला अपेक्षित आहे का?
मला तरी हे अजिबातच अपेक्षित नाही. कॅरेक्टरचे लुक्स चांगले असले तर तो drawback होत नाही पण तेव्हढंच पुरेसं नाही तर कास्टिंग पण करेक्ट व्हायला पाहिजे. इतकंच म्हणायचं आहे. उदाहरणार्थ जॉर्ज क्लूनी खूपच जास्त गुड-लुकिंग आहे आणि तो gravity मध्ये खूपच convincing होता आपल्या रोलमध्ये.
मला अॅन हॅथवे आवडते म्हणून
मला अॅन हॅथवे आवडते म्हणून तो जास्तच व्हॅलिड वाटला. हॉलीवूड मधे अत्यंत रेअर असणारा हसरा चेहरा, pleasing personality वगैरे >> +१ अॅन हॅथवे मला तरी नीट वाटली त्या रोलमधे. मूळात त्या कॅरॅक्टरच्या रोल ला अजिबात establish केलेले नसल्यामूळे कोणीही असते तरी फरक पडला नसता. For that matter, बाप लेक वगळता सगळे characters पूरक आहेत फक्त.
हिरो प्रत्येक वाक्यास एकेक
हिरो प्रत्येक वाक्यास एकेक प्रकाश वर्ष एव्ढा वेळ का घेतो?
आपल्याला उत्तेजनार्थ शिरीश कुंदर दिग्दर्शित जोकरची सीडी पाठवत आहे. पोच द्या.
<<

आपल्याला उत्तेजनार्थ शिरीश
आपल्याला उत्तेजनार्थ शिरीश कुंदर दिग्दर्शित जोकरची सीडी पाठवत आहे. पोच द्या. > बरोबर हमशक्ल आणि रा.गो.आ ची देखील बाय वन गेट टु फ्री ऑफर वर द्या. त्रासच द्यायचा आहे तर पुर्ण द्यावा या मताचा मी आहे.
दिवाकरा, अरे माझे लॉजिक इतके
दिवाकरा, अरे माझे लॉजिक इतके भंजाळलेले नाही बघ, अंत्राळातली फिल्म म्हणून जोकरची सीडी. डायनासोर्वर बनवली तर हमशकल्स, टावरिग इन्फर्नो( ही १८५७ मध्ये आलेली माझ्या बालपणी बघितलेले डिझास्टर मुव्ही आहे. सर्व हाटॅलाला आग लागते बाबौ आणि लिफ्टला पण!!!! आणि बंबात पाणी पण असते!!!!!! काय भन्नाट!!) बनवली तर रागोवची आग. पण सजेशन नोटून ठेवते.
९) संगीत दिग्दर्शक
९) संगीत दिग्दर्शक परग्रहावरून आला आहे का? संगीत फारच आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. मस्त. क्लायमॅक्स पण. >>
तो 'हान्स झिमर' नावाचा प्राणी आहे, तब्बल १५० सिनेम्यांना त्याने मुझिक दिलय (ह्यातल्या अनेकांना अॅवार्डसही मिळालेत),
रच्याकने 'Inception' 'iron man' मादागास्कर मधलं 'zoosters breakout' चं म्युझिक पण ह्यानेच दिलय
बॅकग्राउंड म्युझिक बहुतेक
बॅकग्राउंड म्युझिक बहुतेक अजुन आले नाही बाहेर
दिवाकर, यू ट्यूबवर आहे काही
दिवाकर, यू ट्यूबवर आहे काही पार्श्वसंगीत.
अग्निपंख आहो मला झिमर माहीत आहे . मी इथे इन्सेप्शन चे परीक्षण सिनेमा बघून आल्यावर मग लि हीले आहे. तो संगीतात गणिती करामती करतो. खरेच ग्रेट आहे तो.
किशोरकुमारला एक चतुर नार
किशोरकुमारला एक चतुर नार म्हणताना ऐकणार्या महमूदची जशी अवस्था होते तशी माझी अवस्था झाली. ये टाईम, ग्रॉव्हीटी, टाईम, ग्रॉव्हीटी,टाईम, ग्रॉव्हीटी, एक पे रहना... या टाईम बोलना या ग्रॉव्हीटी बोलना, ये गडबड जी, ये श्टोरी किधर जी... ये अमको भटकाता जी, हम छोडेगा नई जी...
सीमंतिनी, तुमचे खरेच बरोबर
सीमंतिनी, तुमचे खरेच बरोबर आहे. यूट्यूब वर एक १२ मिनिटाचा रिव्यू पोस्ट केलेला आहे त्यात म्ह्टले आहे कि, ह्या सिनेमाची कथा दोन कथांना एकत्रित करून लिहीली आहे. व ते लगेच कळून येते आहे. तुम्ही खरेच विनोदी लेखनाचे मनावर घ्या. मला वरील पोस्ट वाचून इतके हसू आले काय सांगू.
ये अमको भटकाता जी, हम छोडेगा
ये अमको भटकाता जी, हम छोडेगा नई जी... >>>
सिनेमा ब्रीलीयंट आहे हे
सिनेमा ब्रीलीयंट आहे हे निर्विवाद पण तो ब्रीलीयंस खरोखर किशोरकुमारच्या जात कुळीचा आहे. जिथे शास्त्रात लूपहोल्स होते तिथे चक्क 'लव्ह' हे गायडींग प्रिन्सिपल आहे अस सांगितल. यशजीं (चोप्रा) ना ह्या पेक्षा कुठलीच मोठी श्रद्धांजली असू शकणार नाही.
अमा त्या रिव्ह्यूची लिंक द्या
अमा त्या रिव्ह्यूची लिंक द्या प्लीज.
इथेच द्या लिंक. आम्हाला का
इथेच द्या लिंक. आम्हाला का वंचित ठेवता?